N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रुग्णवाहिकेसाठी दोन किलोमीटरची धाव, लेकीनं पित्याचं असं केलं कौतुक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
: तेलंगणाच्या हैदराबादमध्ये वाहनांच्या गर्दीत रस्त्यावर अडकून पडलेल्या करून देण्यासाठी एका पोलीस कॉन्स्टेबलनं तब्बल दोन किलोमीटरची धाव घेतली. हा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होतानाच संबंधित पोलिसावर कौतुकाची उधळण होतेय. यांना हैदराबाद पोलिसांकडूनही सन्मानित करण्यात आलं. परंतु, एक शुभेच्छा त्यांच्यासाठीही खास ठरली... ती म्हणजे, लेकीनंच आपल्या पित्याचं केलेलं कौतुक! जी बाबजी यांचा हा सोमवारी सायंकाळी ६ - ७ वाजल्याच्या सुमाराचा आहे. शहरात असतानाच जी बाबजी यांनी एका रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण मृत्यूशी लढाई देत असताना नजरेस पडला. रुग्णवाहिकेचा चालक वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. परंतु, समोर दिसणाऱ्या ट्राफिकमुळे तोही हताश होता. वाचा : वाचा : हे पाहताच जी बाबजी यांनी लगेचच रुग्णवाहिकेसाठी रस्ता खुला करायला सुरूवात केली. तब्बल दोन किलोमीटरपर्यंत लोकांना आणि वाहनांची रांग बाजुला करत त्यांनी रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला. रुग्णवाहिकेत बसलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी जी बाबजी यांचा हा प्रामाणिक प्रयत्न व्हिडिओद्वारे रेकॉर्ड केला. 'रुग्णवाहिकेला पाहिल्यावर मला काहीतरी करायला हवं, हे लक्षात आलं. मी पुढे झालो आणि वाहन चालकांना गाड्या बाजुला घेण्याची विनंती केली. याला वाहन चालकांनीही प्रतिसाद दिला. अनेकांनी माझ्या पाठिवर शाबासकीची थापही दिली' असं सांगताना जी बाबजी यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. परंतु, बाबजी यांना यापेक्षाही मोठा आनंद घरी पोहचल्यानंतर मिळाला. अवघ्या काही वेळातच जी बाबजी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्या सात वर्षीय चिमुरडीनंही आपल्या पित्याचा हा व्हिडिओ पाहिला. रात्री ११ वाजेपर्यंत ती वडिलांची वाट पाहत जागीच राहिला आणि जी बाबजी घरात आल्यानंतर तिनं वडिलांना एक कागद हातात दिला. आपल्या वहिच्या एका पानावर 'कॉन्ग्रॅच्युलेशन्स डॅडी' असं या चिमुरडीनं लिहिलेलं होतं. आपल्याच मुलीकडून झालेलं हे कौतुक जी बाबजी यांच्यासाठीही खास होतं आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू उभे राहिले. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
November 06, 2020 at 12:03PM

'विवाहासाठी धर्मांतरा'च्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली : 'केवळ विवाहासाठी केलेले धर्मांतर अपात्र आहे,' या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीला कुठलाही धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य नसेल, तर त्याच्या मूलभूत हक्कांवरील ती गदा असेल, असं या याचिकेत म्हटलं गेलंय. वकिल यांनी ही याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एक रिट याचिकेद्वारे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलंय. हा निर्णय चुकीचा आदर्श समोर ठेवत असल्याचा आक्षेप याचिकाकर्त्यानं घेतलाय. सोबतच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला रद्द करण्याची मागणीही करण्यात आलीय. केवळ विवाहाच्या उद्देशानं केलेलं धर्मांतर अपात्र ठरवत एका भिन्न धर्मीय विवाहीत जोडप्याला पोलीस संरक्षण देण्यास नकार देऊन उच्च न्यायालयानं 'चुकीचं उदाहरण' समोर ठेवल्याचं याचिकाकर्ते अल्दानिश रीन यांनी म्हटलंय. भिन्न धर्मीय विवाह करणाऱ्या या जोडप्याला त्यांच्या कुटुंबीयांच्या घृणेसमोर न्यायालयाकडून मदतीविना सोडून देण्यात आलंय. अशा परिस्थितीत कोणत्याही एका व्यक्तीनं धर्मांतर करून आंतरधर्मीय विवाह केला जाऊ शकत नाही, असं चुकीचं उदाहरण न्यायालयानं समोर ठेवलंय. वाचा : वाचा : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयानं गेल्या महिन्यात एका विवाहीत जोडप्याला पोलीस सुरक्षा देण्यात नकार दिला होता. या निर्णया दरम्यान, एखाद्या व्यक्तीनं एखाद्या भिन्न धर्म केवळ सांसारिक लाभ किंवा फायद्यासाठी स्वीकारला असेल तर ही धार्मिक कट्टरता असेल, या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा उल्लेख केला होता. या प्रकरणात याचिकाकर्ता आणि त्याची बहिण दोन्हीही मुस्लीम धर्माशी संबंधित आहेत. विशेष विवाह कायद्यानुसार, दोघांनीही संबंधित हिंदू पती-पत्नीशी विवाह केलेला आहे. 'लव्ह जिहाद रोखणार' दुसरीकडे, कर्नाटकात 'लव्ह जिहाद' रोखण्याचा निर्धार मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी व्यक्त केला. लग्नासाठी सक्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्यात ठोस उपाय योजल्या जातील, असं येडियुरप्पा यांनी म्हटलंय. मंगळुरूमध्ये ते भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
November 06, 2020 at 10:32AM

लष्करप्रमुख नरवणेंनी स्वीकारली नेपाळची मानद जनरल रँक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
वृत्तसंस्था, काठमांडू : असलेले जनरल यांना नेपाळ सरकारने मानद जनरल रँक देऊन सन्मानित केले. नेपाळच्या राष्ट्रपती यांनी गुरुवारी नरवणे यांचा सन्मान केला. यामुळे दोन्ही देशांच्या लष्करातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. राष्ट्रपतींच्या 'शीतलनिवास' या सरकारी निवासस्थानी झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात नरवणे यांना मानद जनरल रँक प्रदान केले गेले. या वेळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओलि, भारताचे राजदूत विनय एम. क्वात्रा आणि दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यानंतर नरवणे यांनी भंडारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा केली, असे भारतीय दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नरवणे तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी नेपाळचे लष्करप्रमुख जनरल यांची भेट घेऊन त्यांच्याशीदेखील चर्चा केली. दोन्ही देशांच्या लष्करातील परस्परसहकार्य वाढविण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. नरवणे यांनी युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकलादेखील भेट दिली; तसेच नेपाळ लष्कराच्या मुख्यालयात त्यांना मानवंदनादेखील देण्यात आली. नरवणे यांनी नेपाळ सैन्याच्या दोन रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका आणि अन्य काही वैद्यकीय उपकरणांची मदत केली. वाचा : वाचा : या वर्षाच्या सुरुवातीला नेपाळ सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नरवणे यांच्या भेटीस महत्त्व प्राप्त झाले आहे. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवारी) नरवणे नेपाळचे पंतप्रधान ओली यांची भेट घेणार आहेत. १९५० पासूनची परंपरा उभय देशांच्या लष्करप्रमुखाचा सन्मान करण्याची परंपरा सन १९५० पासून भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांनी जपली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात नेपाळचे लष्करप्रमुख जनरल थापा यांचा यांनी मानद जनरल रँक प्रदान करून सन्मान केला होता. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
November 06, 2020 at 04:00AM

भाजप नेत्याची दिल्लीत 'आणीबाणी'; उद्धव ठाकरे-इंदिरा गांधींचे एकत्रित पोस्टर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे संपादक () यांना अन्वय नाइक प्रकरणी अलिबाग पोलिसांनी अटक केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्यापासून ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस () यांच्यासह राज्यातील इतर नेत्यांपर्यंत महाराष्ट्रात आता आणीबाणीची परिस्थिती आल्याची टीका केली. आता भाजप नेते तेजिंदरपालसिंह बग्गा () यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर उद्धव ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचे पोस्टर लावले आहे. या पोस्टरवर आपातकाल २.० मध्ये () तुमचे हार्दिक स्वागत आहे, असे लिहिले आहे. भाजप नेते तेजिंदरपाल बग्गा यांनी महाराष्ट्र सदनाबाहेर हे पोस्टर लावल्यानंतर अनेकांनी या पोस्टरचे छायाचित्र ट्विट करत त्यावर भाष्य केले आहे. आणीबाणी-०.२ मध्ये आपले स्वागत आहे असेही काहींनी पोस्टर ट्विट करत लिहिले आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केल्यानंतर महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडताना आणीबाणी या शब्दाचा प्रयोग केला आहे. ही अटक म्हणजे इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीची आठवण करून देणारी असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. हेच दाखवण्यासाठी तेजिंदरपालसिंह बग्गा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचा फोटो माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत लावला आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अलिबाग पोलिसांनी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना काल ५ नोव्हेंबर या दिवशी अटक केली. अन्वय नाईक यांचा वास्तुसजावटीचा व्यवसाय होता. ५ मे २०१८ साली अलिबागमधील कावीर येथे त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मृतदेहासोबत चिठ्ठी देखील सापडली होती. अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्काय मीडियाचे फिरोझ शेख आणि स्मार्टवर्क्सचे नीतेश सारडा या तिघांनी आपले पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्या चिठ्ठीत लिहिलेले होते. क्लिक करा आणि वाचा- नाईक यांची पत्नी अक्षता यांनी अलिबागमध्ये तक्रार नोंदवली नाही. मात्र तपासात काहीही आढलले नसल्याचे म्हणत पोलिसांनी हे प्रकरण बंद केले होते. मात्र या प्रकरणी पुन्हा तपास करावा अशी विनंती नाईक यांच्या पत्नी आणि मुलाने राज्य सरकारकडे केली होती. त्यानंतर हा तपास पुन्हा सुरू करण्यात आला. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
November 05, 2020 at 12:43PM

'फालतू बात'... नितीश कुमारांनी या मुख्यमंत्र्यांना झापले!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
पाटणा : दरम्यान मुख्यमंत्री आणि त्यांचा सहकारी पक्ष भाजपमध्ये मतभेद असल्याचं आता स्पष्टपणे समोर येऊ लागलंय. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे स्टार प्रचारक यांच्या जाहीर सभांतील वक्तव्यांमुळे तर या गोष्टीवर शिक्कामोर्तबच झालंय. काही दिवसांपूर्वी भाजचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कटिहारच्या एका जाहीर सभेत बांग्लादेशी घुसखोरांना देशातून 'बाहेर फेकण्याचं' वक्तव्य केलं होतं. यावरच निशाणा साधत जनता दल युनायटेड (JDU) चे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी योगींच्या वक्तव्याला '' म्हटलंय. 'कुणातही इतका दम नाही की ते आपल्या लोकांना देशाच्या बाहेर काढू शकतील', असंही नितीश कुमार यांनी म्हटलंय. बिहार विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आता बाकी आहे. याच दरम्यान एका जाहीर जनसभेला संबोधित करताना नितीश कुमार यांनी हे वक्तव्य केलंय. या भाग मुस्लीमबहुल भाग म्हणून ओळखला जातो. या भागात बोलताना मुख्यमंत्र्यांनी अल्पसंख्यांक कल्याणासाठी आपल्या कार्यकाळातील कार्यांचा उल्लेखही केला. वाचा : वाचा : आपल्या या भाषणातील एक छोटा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवरून शेअर केलाय. 'सर्वांना सोबत घेऊन जाणं हाच आमचा धर्म आहे. हीच आमची संस्कृती आहे. सगळे एकत्र येणार तेव्हाच बिहार पुढे वाटचाल करेल' असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. आपल्या भाषणात 'नागरिकत्व संशोधन कायद्या'विरोधात निशाणा साधला. 'हा दुष्प्रचार कोण करत राहतं, फालतू बात करत राहतो. कोण कुणाला देशाच्या बाहेर करणार आहे? सगळे हिंदुस्तानाचे आहेत, सगळे भारताचे आहेत, कोण कुणाला बाहेर करणार साहेब? या देशात कुणातही इतका दम नाही. हे काय बडबड करत राहतात. जेव्हापासून तुम्ही संधी दिलीत तेव्हापासून आम्ही समाजात प्रेम, बंधूभाव आणि सद्भावनेचं वातावरण तयार केलंय. सर्वांना एकत्र आणण्याचाच आमचा प्रयत्न राहिलाय. समाजात भांडणं सुरू राहावीत, यासाठी काही जणांकडून जाणून-बुजून प्रयत्न केले जात आहेत, त्यामुळे काही कामं करण्याचीच गरज पडणार नाही असं त्यांना वाटतंय. मात्र, आम्ही तर काम करतच राहतो आणि सर्व लोक एकत्र राहावेत, समाजानं पुढे वाटचाल करावी, प्रगती करावी हाच आमचा उद्देश आहे' असं नितीश कुमार यांनी आपल्या या भाषणा दरम्यान म्हटलंय. बिहार निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ७८ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीत एआयएमआयएम पक्षानंही सीएए आणि एआरसीचा मुद्दा उचलून धरलाय. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
November 05, 2020 at 12:40PM

अमित शहांचा बंगाल दौरा; दलित, मटुआ कुटुंबासोबत घेणार भोजन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
कोलकाता: केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते () बुधवारी दोन दिवसीय दौऱ्यावर पश्चिम बंगालमध्ये () पोहोचले आहेत. शहांच्या या दौऱ्याचा उद्देश पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षाच्या राज्यातील तयारीचा आढावा घेणे हा आहे. शहा बंगालमध्ये ज्या दिवशी पोचले, त्या दिवशी भारतीय जनता पक्षाने कोलकात्यात सेंट्रल एव्हेन्यू येथे मोर्चा काढला होता. तेथे पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली होती. हे पाहता पक्ष आतापासूनच लढाईच्या पवित्र्यात असल्याचे भाजप भासवत असल्याचे स्पष्ट होत आहे. पुढील वर्षीच्या निवडणुकीसाठी अमित शहा हेच पक्षाचे नेतृत्व करतील असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे. कोविड-१९ नंतर शहा यांचा पश्चिम बंगालमधील हा पहिलाच दौरा आहे. या पूर्वी ते येथे १ मार्चला आले होते. बुधवारी रात्री शहा कोलकात्यात थांबले. आज ते सर्वप्रथम बांकुडा येथे जातील. तेथे जंगलमहल येथे ते पक्षाचे कार्यकर्ते आणि समाजातील विविध नेत्यांच्या भेटी घेतील. येथे आदिवासी नागरिकांची संख्या मोठी आहे. तेथे एकेकाळी माओवाद्यांचा मोठा प्रभाव होता. शहा पश्चिम बंगालच्या दक्षिणी भागातील विधानसभेच्या ७० मतदारसंघांमधील कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. या व्यतिरिक्त ते बांकुडा जिल्ह्यातील चतुर्धी गावातील एका दलित कुटुंबासोबत दुपारचे जेवण करतील. शुक्रवारी शहा समुदायाच्या एका कुटुंबासोबत भोजन करतील. मटुआ समुदाय पूर्वी पाकिस्तानातून आला होता. आम्हाला नागरिकता दुरुस्ती कायद्यांतर्गत नागरिकता देण्यात यावी, अशी या समाजाची मागणी आहे. या समुदायाने सन २०१९ मध्ये भाजपलाच मतदान केले होते. मात्र सध्या त्यांचे युवा खासदार शांतनु ठाकूर या कायद्याला लागू करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत तक्रार करत आहेत. मटुआ कुटुंबासोबत भोजन घेत आपले तुमच्या समस्यांकडे लक्ष असून बंगलाच्या निवडणुकीच्या मैदानात सीएए हा मुद्दा सर्वात पुढे ठेवणार असल्याचे संकेत शहा देणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कायद्याला जोरदार विरोध दर्शवला होता. अमित शहा यांचा हा राजकीय स्टंट असल्याचे तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी म्हटले आहे. अमित शहा यांनी यापूर्वी देखील एका दलित कुटुंबासोबत आणि २०१६ मध्ये एका आदिवासी कुटुंबासोबत भोजन घेतले होते. त्यांच्या या दौऱ्यात काही विशेष आहे, असे मला वाटत नाही. केवळ काही भाजप नेत्यांना बंगालमध्ये कलम ३५६ ची मागणी करण्याची संधी मिळेल, इतकेच, असे रॉय म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- या मुद्द्यावर देखील भारतीय जनता पक्षात दुमत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष याविरुद्ध आहेत, असेही रॉ म्हणाले. अमित शहा स्थानिक भाजपात बिघडलेल्या गोष्टी सरळ करण्यासाठी प्रयत्न करतील असे वाटते. मात्र, आपल्या पक्षात कोणताही वाद नसल्याचे भाजपने म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
November 05, 2020 at 11:29AM

बोअरवेलमध्ये अडकला ३ वर्षांचा चिमुकला, सेनेकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
निवारी, : मध्य प्रदेशातील टिकामगढ जिल्ह्यातील निवारी या तालुक्यात एक चिमुरडा बोअरवेलमध्ये अडकल्याची माहिती मिळतेय. तीन वर्षांचा हा मुलगा खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला. सहायक पोलीस अधीक्षक (ASP) प्रतिभा त्रिपाठी यांनी मीडियाशी बोलताना दिलेल्या माहितीत, हा चिमुरडा निवारीतल्या गावचा रहिवासी असल्याचं म्हटलंय. मुलाला वाचवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच सेनेचीही मदत घेण्यात आलीय. सेनेनं घटनास्थळी दाखल होत मुलाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. वाचा : वाचा : राज्याचे मुख्यमंत्री यांनी मुलगा सुखरुप बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केलाय. 'ओरछाच्या सेतपुरा गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या लहानग्या प्रल्हादला वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत सेनाही बचावकार्यात सहभागी झालीय. लवकरच प्रल्हादला सहीसलामत बाहेर काढण्यात येईल, असा मला विश्वास आहे. ईश्वर मुलाला दीर्घायुष्य प्रदान करो, आपण सगळेच यासाठी प्रार्थना करू' असं ट्विट मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलंय. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
November 05, 2020 at 11:24AM

'केंद्रशासित' जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणुकीची घोषणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधून आणि ३५ ए हटवून घोषित करण्यात आल्यानंतर जम्मू - काश्मीरमध्ये पहिल्याच करण्यात आली. बुधवारी निवडणूक आयोगानं २० ( - ) जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली. २८ नोव्हेंबरपासून आठ टप्प्यांत जिल्हा विकास परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. ( to vote first after district development) सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा विकास परिषद स्थापन करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये जम्मू-काश्मीर पंचायत राज कायद्यात सुधारणा करण्यात आली होती. यामध्ये आता थेट निवडून आलेले सदस्य असतील. राज्य निवडणूक आयुक्त के.के. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायत आणि नगरपालिका रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक एकाच वेळी घेण्यात येणार आहेत. २८ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी जारी केली जाईल. तर, आठ टप्प्यांतील या निवडणुकीचा शेवटचा टप्पा १० डिसेंबर रोजी पार पडेल. त्यानंतर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. वाचा : वाचा : यात जम्मू मधील १० तर काश्मीर मधील १० जागांचा समावेश आहे. जिल्हा विकास परिषदेत १४ मतदारसंघ असतील. डीडीसी आणि पंचायत पोटनिवडणुकीसाठी मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. तर नगरपालिका पोटनिवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे (ईव्हीएम) पार पडेल. जिल्हा विकास परिषद निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होणार आहेत मात्र पोटनिवडणुकीत पक्षाच्या चिन्हांचा वापर होणार नाही. पश्चिम पाकिस्तानी शरणार्थी, वाल्मिकी आणि गोरखा या निवडणुकीत पहिल्यांदात आपल्या मताधिकाराचा वापर करणार आहेत. काश्मीरमधील प्रमुख पक्षांनी मात्र अद्याप या निवडणुकीत सहभाग घेणार की नाही? याबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. राज्यात रिक्त असलेल्या सरपंच व पंचायत जागांसाठीही निवडणुका याच वेळी पार पडतील, अशी माहिती के.के. शर्मा यांनी दिलीय. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे (ईव्हीएम) होणाऱ्या या मतदानात कोविड १९ रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग रुग्णांना टपाल मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा देण्यात येणार आहे. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
November 05, 2020 at 09:58AM

बॅगेत ५ महिन्यांचे मूल, पित्याची चिठ्ठी, 'काही महिने सांभाळा, पैसे पाठवतो'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
अमेठी: ज्या पित्याला आपल्या अवघ्या ५ महिन्यांच्या चिमुकल्याला बेवारसा सोडण्याची पाळी येत असेल तर त्याची असहायता किती असेल याची कल्पना केलेली बरी. कोणालाही आपल्या काळजाच्या तुकड्याला असे स्वत:पासून वेगळे करणे सोपे नाही. काळजावर दगड ठेवून असे करावे लागते. एका पिता असहाय होता, परिस्थितीपुढे हारलेला होता. त्याला कोणताही मार्ग दिसत नव्हता. अखेर या पित्याने आपल्या चिमुकल्याला एका बॅगेत पॅक केले. काही पैसे ठेवले आणि एक लिहिले. मी पैसे पाठवत राहीन, काही महिन्यांसाठी माझ्या मुलाचा सांभाळ करा. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. अमेठी पोलिसांनी एका पाच महिन्यांच्या चिमुकल्याला झोले येथून ताब्यात घेतले. मुंशीगंज भागातील त्रिलोकपूर परिसरात पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले. बॅगेतून रडण्याचा आवाज आल्यानंतर पीआरव्हीला याबाबतची माहिती दिली. या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मुलाला ताब्यात घेतले. खरे तर उत्तर प्रदेश पोलिसांच्या हेल्पलाइन ११२ वर बुधवारी एक मुलगा बॅगेत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश पोलिसाचे एक पथक मुंशीगंज क्षेत्रातील त्रिलोकपूर भागात राहणाऱ्या आनंद ओझा यांच्या निवासस्थानी पाहोचले. एका बॅगेत मुलाचा आवाज ऐकू आल्यानंतर लोकांनी कंट्रोलरुमला फोन केला. त्यानंतर पोलिस तेथे दाखल झाले. पोलिसांनी बॅग उघडल्यानंतर त्यात एक मूल, कपडे, बूट, ५ हजार रुपये आणि इतर गरजेच्या वस्तू निघाल्या. तसेच बॅगेत एक चिठ्ठी देखील होती. ही चिठ्ठी कथित स्वरुपात मुलाच्या पित्याने लिहिली आहे. 'माझ्या कुटुंबात याला धोका आहे... आणखी पैसे हवे असल्यास कळवणे' या चिमुकल्याच्या पित्याने पत्रात लिहिले, 'हा माझा मुलगा आहे, याला मी तुमच्याकडे सहा-सात महिन्यांसाठी सोडत आहे. आम्ही तुमच्याबद्दल बरेच काही ऐकले आहे. यामुळे मी माझ्या मुलाला तुमच्याजवळ सोडत आहे. मी दरमहा ५००० रुपये पाठवत जाईन. मी आपणास हात जोडून विनंती करतो की, कृपा करून त्याचा सांभाळ करा. माझी काही असहायता आहे, या मुलाची आई नाही आहे. माझ्या कुटुंबात मुलाला धोका आहे, म्हणून याला तु्म्ही तुमच्याकडे सहा- सात महिन्यांसाठी ठेवा. सर्व काही व्यवस्थित करून मी तुम्हाला भेटेन आणि मुलाला घेऊन जाईन. तुम्हाला आणखी पैशांची गरज असेल तर कळवा.' क्लिक करा आणि वाचा- मुलाला सोडणाऱ्याचा आणि कुटुंबीयांचा शोध घेत आहेत पोलिस या मुलाला देखरेखीसाठी ज्याने फोन केला त्याच्याकडेच ठेवण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. या व्यतिरिक्त हा मुलगा कोणाचा आहे, त्याला येथे कोणी सोडले, तसेच बॅगेतील पत्राचे सत्य काय आहे, या गोष्टींचा तपास आता पोलिस करत आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
November 05, 2020 at 09:44AM

रसायनांच्या गोदामात भीषण स्फोट; १२ मजूर ठार, ९ जखमी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
अहमदाबाद: गुजरातमधील (Ahmedabad) येथील एका गोदामात पहाटे झालेल्या भीषण स्फोटात १२ मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर ९ मजूर जखमी झाले आहेत. या स्फोटात गोदामाचा अर्धा भाग कोसळला आहे. अहमदाबाद शहराबाहेर असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील पिराना-पिपलाज रोडवर असलेल्या इमारतीत हा स्फोट झाला. या गोदामात रसायनांचे ड्रम ठेवण्यात आले होते. ( at chemical godown claims 12 lives 9 injured) बुधवार सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत असे सुमारे ९ तास शोध आणि बचाव कार्य चालवले गेले. शहरातील अग्रिशमनदलाने ढिगाऱ्याखालून १२ मृतदेह काढले. तर इतर ९ लोकांचे प्राण वाचवले. हे अभियान रात्री सुमारे साडेआठ वाजता संपले. जखमी मजुरांना अहमदाबादमधील पालिकेच्या एलजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोदामात सकाळी ११ वाजता झालेल्या स्फोटामुळे इमारतीचा भाग कोसळला आणि ही आग बाजूच्या गोदामांमध्येही पसरली. या ठिकाणी मजूर तयार कपडे पॅकिंग करण्याचे काम करत होते. आमचे अभियान आता संपले असून आम्ही ढिगाऱ्याखालून १२ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्याने दिली. आम्ही ९ लोकांना वाचवले असून आगीवर अर्ध्यातासाच्या आतच नियंत्रण मिळवळे. हे अभियान प्रामुख्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठीच असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले. संध्याकाळी एनडीआरएफच्या पथकाने देखील काम सुरू केले होते. मजुरांचा मृत्यू स्फोटामुळे झाला आणि इतर नुकसानही स्फोटामुळेच झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येथे लागलेली आग तशी किरकोळच होती, इमारतीचा भाग हा स्फोटामुळेच कोसळल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी प्रकट केला शोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. मोदी ट्विटमध्ये म्हणतात, 'अहमदाबादमधील गोदामात आग लागून मनुष्यहानी आणि मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून मी व्यथित झालो आहे. मृतांना श्रद्धांजली आणि जखमीं लवकरच बरे होवोत. अधिकारी सर्व पीडित लोकांना मदत पोहोचवत आहेत.' क्लिक करा आणि वाचा- राष्ट्रपतींचे ट्विट, मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा अहमदाबादमधील गोदामात आग लागून लोकांचे प्राण गेले हे ऐकून आपण दु:खी असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. या बरोबरच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
November 05, 2020 at 08:55AM

अर्णब गोस्वामी अटक : गृहमंत्री अमित शहांचा ठाकरे सरकारवर निशाणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली : व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणात '' चॅनेलचे संपादक यांना एका अटक करण्यात आल्यानंतर भाजपकडून महाराष्ट्रातील सरकारवर टीका केली जातेय. याच दरम्यान आता गृहमंत्री अमित शहादेखील अर्णब गोस्वामींच्या मदतीसाठी धावून आले आहेत. अर्णब गोस्वामी यांची पाठराखण करताना अमित शहा यांनी हा '' असल्याचं सांगत महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. या घटनेवरून अमित शहा यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. इतकंच नाही तर या घटनेची तुलना गृहमंत्री अमित शहा यांनी इंदिरा गांधी यांच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या आणीबाणीच्या घटनेशी केली आहे. 'काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लज्जित केलं आहे. रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात राज्यात शक्तीचा प्रयोग व्यक्तीगत स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट हल्ला आहे. आम्हाला यामुळे आणीबाणीच्या दिवसांची आठवण करून दिली. स्वतंत्र पत्रकारितेवर अशा प्रकारच्या हल्ल्याचा विरोध व्हायला हवा आणि होणार', असं ट्विट गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही टीका करत घेरण्याचा प्रयत्न केलाय. हा 'स्वतंत्र पत्रकारितेवर हल्ला' असल्याची टीका भाजपकडून करण्यात येतेय. दुसरीकडे, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा आणि पत्रकारितेचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात येतंय. संबंधित बातम्या: वाचा : वाचा : काय आहे प्रकरण इंटेरिअर डिझायनर प्रकरणात गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मे २०१८ मध्ये नाईक यांना आत्महत्येला भाग पाडल्याचा आरोप गोस्वामींवर करण्यात आला होता. अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडिओच्या इंटेरियर डिझाईनचं काम केलं होतं. त्यासाठी त्यांना अर्णब यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपयांचा मोबादला मिळणं बाकी होतं. परंतु वारंवार बिल मागूनही गोस्वामी यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या अन्वय नाईक यांनी मानसिक तणावात अलिबागजवळच्या कावीर गावात आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आईनंदेखील आत्महत्या केली. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या तक्रारीनंतर अलिबाग पोलिसांनी ३०६ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा हिनं मे महिन्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणाची नव्यानं सीआयडी चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांकडून देण्यात आले होते. वाचा : वाचा : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये येऊन जबाब नोंदवण्यासाठी अर्णब यांना पोलिसांनी अनेकदा नोटिसा पाठवल्यानंतरही 'मी पोलिसांशी बोलणार नाही' अशी भूमिका घेणाऱ्या गोस्वामींवर आज पोलिसांनी थेट कारवाई केली. आता, या प्रकरणी चौकशीसाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वरळी येथील घरातून आज (बुधवारी) सकाळी गोस्वामी यांना ताब्यात घेतलं. या अगोदर अर्णब गोस्वामी टीआरपी घोटाळ्यातही चर्चेत आले होते. गोस्वामींसोबत इतर दोघांनाही अटक मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अन्वय नाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासहीत तिघांवर पैसे थकवल्यामुळं आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचा म्हटलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतलंय. यातील, नितेश सारडा यांच्यावर ५५ लाख रुपयांच्या थकबाकीचा तर फिरोज शेखवर ४ कोटी रुपयांच्या थकबाकीचा आरोप मृत्यूपूर्वी अन्वय नाईक यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला होता. इतर बातम्या : वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
November 04, 2020 at 01:29PM

विग लावून लग्न केले; पहिल्याच रात्री पतीचे फुटले बिंग, भडकली पत्नी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मेरठ: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका विवाहीत महिलेने आपल्या पतीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या पतीने लावून केले आणि त्याचे असल्याचे सत्य त्याने लपवून ठेवले असा आरोप पत्नीने लावला आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री आपल्या पतीच्या डोक्यावर केस नाहीत हे सत्य आपल्यापुढे उघड झाले, असे पत्नीचे म्हणणे आहे. पतीच्या डोक्यावर केस नाहीत, हे आपल्याला अगोदर माहिती असते, तर अशा व्यक्तीशी आपण लग्नच केले नसते, असे महिलेचे म्हणणे आहे. सध्या महिलेच्या सासरकडील मंडळी महिलेची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र महिला आपल्या निर्णयावर ठाम आहे. हे प्रकरण मेरठमधील नोचंडी पोलिस ठाणे क्षेत्रातील आहे. या भागातील सम्राट हेवन येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची दोनच महिन्यांपूर्वी व्यवसायाने अकाउंटंट असलेल्या महिलेशी लग्न झाले. या व्यक्तीने डोक्याला विग लावूनच लग्न केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. यामुळे पत्नीचा पारा चढला आणि आपण पतीपासून वेगळे व्हायचे, असा निर्णय तिने घेतला. इतकेच नाही, तर अकाउंटट पत्नीने पतीच्या विरोधात फसवणू आणि मानहानी करणे या आधारे खटला दाखल करण्याची धमकी देखील दिली. फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी लग्नापूर्वी जर आपल्याला या व्यक्तीच्या डोक्यावर केस नसल्याचे माहीत पडले असते, तर अशा व्यक्तीशी आपण लग्नच केले नसते असे महिलेचे म्हणणे आहे. रागावलेल्या पत्नीने पतीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. क्लिक करा आणि वाचा- लोकलाजेस्तव पतीने घाबरून पत्नीची माफी मागितली. मात्र पत्नी पतीला माफ करण्यास तयार नाही. दोन्ही कुटुंबीय एकमेकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. कसेतरी महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
November 04, 2020 at 12:52PM

coronavirus in india: पाहा, देशात अशी आहे करोना संसर्गाची ताजी स्थिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: भारतासह जगभरात १८० हून देशांमध्ये करोनाचे (Coronavirus) संकट घोंघावत आहे. आतापर्यंत ४.७३ कोटींहून अधिक लोकांना करोनाची लागण झालेली आहे. करोनामुळे आतापर्यंत १२.१३ लाखांहून अधिक लोकांचा बळी गेलेला आहे. भारतात देखील करोनाचे रुग्ण वाढतच आहेत. देशात बाधितांची संख्या ८३ लाखांहून अधिक झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ८३ लाख १३ हजार ८७६ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे ४६ हजार २५३ इतके नवे रुग्ण वाढले आहेत. गेल्या २४ तासांत ५३,३५७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५१४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण ७६,५६,४७८ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ लाख २३ हजार ६११ इतकी झाली आहे. सध्या कोरोनाच्या संक्रिय रुग्णांची संख्या ५.५ लाखांपेक्षा कमी आहे (). २ ऑगस्टनंतर ही संख्या प्रथमच खाली आली आहे. सध्या देशात ५ लाख ३३ हजार ७८७ सक्रिय रुग्ण आहेत. रिकव्हरी दराबद्दल बोलायचे झाल्यास त्यात थोडीशी वाढ होत तो ९२.०९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर पॉझिटिव्हीटीचा दर ३.८२ टक्के आहे. मृत्युदर १.४८ टक्के आहे. ३ नोव्हेंबर रोजी १२,०९,६०९ कोरोनाच्या नमुना चाचण्या घेण्यात आल्या. तर आतापर्यंत एकूण ११,२९,९८,९५९ नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा- करोना संसर्गात भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर प्रथम स्थानी आहे अमेरिका. अमेरिकेत आतापर्यंत एकूण ९३,७९,६०० रुग्ण आहेत. तेथे सक्रिय रुग्णांची संख्या आहे ५४,४१,९१७. आतापर्यंत २,३२,५५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलचा क्रमांक तिसरा आहे. तेथे ५५,६६,०४९ रुग्ण आहेत. आतापर्यंत १,६०,४९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारत, अमेरिका आणि ब्राझील या तीन देशांमध्ये करोना रुग्णांची संख्या ५० लाखांहून अधिक झाली आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
November 04, 2020 at 11:52AM

नितीश कुमारांवर भरसभेत कांदे फेकले, तेजस्वींकडून निंदा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
पाटणा : (Bihar Assembly Elections 2020) मध्ये आता दोन टप्प्यांतील मतदान पार पडलंय. आता केवळ तिसऱ्या टप्प्यातील मतदान बाकी असतानाच मंगळवारी मुख्यमंत्री यांच्या अंगावर भरसभेत कांदे फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना मधुबनीमध्ये घडली. या घटनेचा एनडीएसोबतच आणि नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदासाठी टक्कर देणारे आरजेडी नेते यांनीही निंदा केलीय. 'एक निवडणूक सभेत कुणीतरी आदरणीय मुख्यमंत्री श्री नितीश कुमार यांच्या दिशेने . ही घटना निंदनीय, लोकशाहीविरोधी आणि अनिष्ट घटना आहे. लोकशाहीमध्ये विरोधाची अभिव्यक्ती केवळ मतदानामध्ये असायला हवी आणि याशिवाय इतर कोणतीही पद्धत स्वीकार्य असू शकत नाही' असं ट्विट तेजस्वी यादव यांनी केलं. मधुबनीच्या हरखाली भागात आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कांदे फेकण्यात आल्याची घटना घडली. मुख्यमंत्री नोकऱ्यांबद्दल बोलत असतानाच गर्दीतून अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या दिशेनं कांदे भिरकावले. यावर नितीश कुमार यांनी मंचावरूनच नाराज व्यक्त केली. 'खूप फेक, फेकत राहा, यामुळे कोणताही फरक पडणार नाही' असंही त्यांनी म्हटलं. नितीश कुमार यांच्या दिशेनं कांदे फेकणाऱ्याला सभेतील जमावानं पकडल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी 'त्याला जाऊ द्या, त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही' असं म्हणत त्याला सोडून देण्याची विनंती जमावाला केली. वाचा : वाचा : दरम्यान, बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान २८ ऑक्टोबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातलं मतदान ३ नोव्हेंबर पार पडलं. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान २३ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. मंगळवारी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १७ जिल्ह्यातील ९४ मतदारसंघांचा समावेश होता. सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत जवळपास ५४ टक्के मतदान पार पडलं. आता उरलेल्या तिसऱ्या टप्प्यात १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांचा समावेश आहे. १० नोव्हेंबर रोजी या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
November 04, 2020 at 10:11AM

'सरकार नामर्द... मला अरब देशात पाठवा, पाकिस्तानात नाही'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
लखनऊ: कोणीतरी साधारण शिक्षण घेतलेली व्यक्ती येते आणि मला पाकिस्तानात जा असे म्हणते. हे मर्दांचे नाही, नामर्दांचे सरकार आहे. अन्यथा त्या व्यक्तीने सिद्ध करावे की पाकिस्तानी आहे. मला जर सरकारला कोठे पाठवायचेच असेल तर अरबस्थानात पाठवावे, तेथूनच आम्ही आलो आहोत. पाकिस्तानशी आमचा काही संबंध नाही. पाकिस्तानशी संबंध हाच की तो भारताचा भाग होता आणि या भागाचे राजकीय मूर्खपणामुळे तुकडे-तुकडे झाले, अशा शब्दांत प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फ्रान्समधील हिंसेचे समर्थन केल्याप्रकरणी मुनव्वर राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर बोलताना त्यांनी उत्तर प्रदेश पोलिस, उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्र सरकरवर टीकेचे जोरदार प्रहार केले. 'आम्ही आग विझवणाऱ्यांपैकी आहोत' मुनव्वर राणा म्हणाले की, 'या गुन्ह्याचा माझ्या वक्तव्याशी काहीही संबंध नाही. जर माझ्या वक्तव्यात कोणता दोष असला असता तर योग्य व्यक्तीने माझ्या विरोधात तक्रार दाखल केली असती. नक्कल करून जो उत्तीर्ण झाला असेल अशा एका पोलिस निरीक्षकाने माझ्या विरोधात तक्रार दाखल केली. गेल्या ५० वर्षांच्या माझ्या अनुभवावर जर तो गुन्हा दाखल करत असेल तर हे लज्जास्पद आहे. आमचे डीजीपी आणि पोलिस आयुक्त यांच्यासाठी देखील ते लज्जास्पद आहे. तू तक्रार दाखल करण्यासाठी कोठून आलास, हे त्याला विचारायला हवे होते. अशी तक्रार दाखल करणे हे त्याचे काम नाही. त्याच्या मागे त्याचे वरिष्ठ, त्यांच्यापेक्षा मोठे अधिकारी, या अधिकाऱ्यापेक्षाही मोठे अधिकारी अनेक लोक आहेत. अशा प्रकारे मला झुकवले जाऊ शकत नाही. माझे व्यक्तिमत्व वादग्रस्त नाही. मी आयुष्यात प्रेमाची कविता केली. आईच्या कविता केल्या, मात्र मी खरे बोललो. तुम्ही हे तपासून पाहा. आम्ही आग विझवणाऱ्यांपैकी आहोत.' क्लिक करा आणि वाचा- 'मी मुसलमान आहे हे माझे दुर्दैव' धर्माची आग मोठी असते, या आगीत हात टाकता कामा नये. भारतात गायीच्या नावावर इतके लोक मारले गेले, मग किती लोकांना तुम्ही फाशी दिले?. तुमच्या केंद्रातील 'वजीर' खुन्यांना हार घालतो. माझे वक्तव्य वादग्रस्त वाटते. कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर यांनी कशा प्रकारची वक्तव्ये केलेली आहेत. दिल्ली जाळून टाकली. दिल्ली जाळणाऱ्यांवर खटला दाखल झाल्यानंतर न्यायाधीशांचीच बदली केली गेली. तुम्ही कोणत्या तमाशात बसलात? एका कवीचे दुर्दैव हे आहे की, तो मुसलमान आहे, असे राणा म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
November 04, 2020 at 09:50AM

हायप्रोफाइल व्यक्तींना जाळ्यात ओढणाऱ्या 'हनी ट्रॅप' गँगचा पर्दाफाश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
: बड्या व्यक्तींना जाळ्यात ओढून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणाऱ्या '' टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधील पोलिसांनी या टोळीतील तिघांना गजाआड केले आहे. हे तिघे जण राजस्थानमधील एका छोट्याशा गावातून नेटवर्क चालवत असल्याची बाब उघडकीस आली आहे. आरोपींकडून १७ हजारांची रोकड आणि तीन मोबाइल जप्त केले आहेत. त्यांचे साथीदार साहिल आणि रफिक खान हे फरार असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमधील अनेक बड्या व्यक्तींनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय साहनी यांच्याकडे ब्लॅकमेलिंगबाबत माहिती दिली होती. त्यानंतर सर्व्हिलान्स सेल आणि सिव्हिल लाइन पोलिसांनी या टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सोमवारी भैंसाली बस स्टॅण्डजवळ तिघा आरोपींना अटक करण्यात आली. हनीफ खान, कल्लू खान आणि मौसम अशी तिघांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, तिघेही आरोपी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. 'अशी' करायची शिकार! ब्लॅकमेलिंग करणारी टोळी तीन गटांमध्ये काम करत होते. पहिला गट फेसबुकवर देशातील विविध भागांतील हायप्रोफाइल लोकांचा शोध घेत होते. तर दुसरा गट एखाद्या सुंदर मुलीचा फोटो प्रोफाइलवर ठेवून बनावट अकाउंटद्वारे संबंधित व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचे. त्यानंतर त्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यांच्याशी अश्लील चॅटिंग करून अश्लील फोटो किंवा व्हिडिओ परस्परांना पाठवायचे. ते फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करायचे. तर तिसरा गट हा आपल्या आजूबाजूच्या गावातील सर्वसामान्य व्यक्तींचे अकाउंट नंबर आणि पेटीएम नंबर मिळवायचे. त्या अकाउंटवर ब्लॅकमेलिंगमध्ये अडकलेल्या व्यक्तींकडून पैसे मागवले जायचे. अकाउंट असलेल्या व्यक्तींनाही त्यातील काही रक्कम दिली जायची. आतापर्यंत या आरोपींनी मुंबई, गुजरात, पंजाब, आणि हरयाणासह अनेक राज्यांतील हायप्रोफाइल व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढले आहे. ते राजस्थानमध्ये बसून नेटवर्क चालवायचे.

https://ift.tt/3fcy07h
November 03, 2020 at 01:34PM

'बिहारी लोकांनी जंगलराज, डबल-डबल युवराजांना नाकारले आहे'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीतील (Bihar Assembly Election 2020) दुसऱ्या टप्प्यातील (2nd Phase voting) मतदान सुरू आहे. तर दुसरीकडे () फारबिसगंज येथे सभेत संबोधित करत आहेत. या नव्या दशकात बिहारला एका नव्या उंचीवर पोहोचवण्याचा संकल्प बिहारच्या पवित्र भूमीने केला आहे, असे सांगताना बिहारच्या लोकांनी जंगलराज आणि डबल-डबल युवराजांना पूर्णपणे नाकारले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज एनडीएच्या विरोधात जे लोक उभे आहेत, ते इतके सर्व खाल्ल्यानंतरही पुन्हा बिहारकडे लोभी नजरेनेच पाहत आहेत. मात्र बिहारच्या विकासासाठी कोण वचनबद्ध आहे, आणि कोण आपल्या कुटुंबाच्या विकासासाठी वचनबद्ध आहे हे बिहारचे लोक चांगलेच जाणून असल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. 'बिहारमध्ये गुंडगिरीचा पराभव होत आहे. कायद्याचे राज्य आणणाऱ्यांचा विजय होत आहे' आज बिहारमध्ये अहंकाराचा पराजय होत आहे आणि परिश्रम पुन्हा विजयी होत आहे, असे मोदी म्हणाले. आज बिहारमध्ये घोटाळे पराभूत होत आहेत, लोकांचे हक्क विजयी होत आहे. आज बिहारमध्ये पुन्हा गुंडगिरी पराभूत होत आहे आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करणारे पुन्हा विजयी होत आहे. या लोकांनी निवडणूक म्हणजे एक गंम्मत बनवून ठेवली होती. यांच्यासाठी निवडणुकीचा अर्थ होता- चारही बाजूंना हिंसा, हत्या, बूथ कॅप्चरिंग. या लोकांनी बिहारच्या गरिब लोकांचा मतदानाचा हक्कच हिरावून घेतलेला होता. तेव्हा मतदान होतच नव्हते, ‘मत छीन लिया जाता था, वोट की लूट’ होत होती, गरिबांचे हक्क लुटले जात होते. बिहारमधील गरिबांना खऱ्या अर्थाने मतदानाचा हक्क एनडीएनेच मिळवून दिला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. करोनासारख्या कठीण काळात देखील इतक्या काळजीसह निवडणूक आयोगाने उत्तम प्रकारे निवडणूक घेतली, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक आयोगाला शुभेच्छा दिल्या. मी बिहारच्या धरतीवरून निवडणूक आयोग, प्रशासनाचे कर्मचारी आणि सुरक्षादलाच्या जवानांचे अभिनंदन करत आहे, असे मोदी म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- भाषणाची सुरुवात करताना मोदी म्हणाले, अररियासह पूर्णिया, किशनगंज आणि कटिहारसह अनेक जिल्ह्यांमधील लोक येथे उपस्थित आहेत. येथे उपस्थित असलेल्या लोकांपेक्षा अधिक लोक विविध ठिकाणी डिजिटल माध्यमातून या सभेला जोडले गेले आहेत. मी सर्वांना आदरपूर्वक नमन करतो. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
November 03, 2020 at 12:44PM

व्यावसायिकाची अमेरिकेत हत्या, पीडित कुटुंबीयांची मदतीसाठी याचना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
: अमेरिकेच्या भागात राहणाऱ्या एका भारतीय तरुणाची करण्यात आल्याचं समोर येतंय. हा व्यक्ती मूळचा हैदराबादचा रहिवासी आहे. मृताच्या कुटुंबीयांपर्यंत ही बातमी पोहचल्यानंतर पीडिताच्या अंत्यसंस्कारात सहभागी होता यावं, यासाठी पीडित कुटुंबीयांनी सरकारकडे केलीय. मृताचं नाव मोहम्मद आरिफ मोहिउद्दीन असल्याचं समजतंय. गेल्या १० वर्षांपासून मोहम्मद जॉर्जियामध्ये किराना स्टोअर चालवत होता. मोहम्मदचा मृतदेह त्याच्याच घरासमोर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला सापडला. त्याच्या शरीरावर भोसकण्याच्या अनेक खुणा आहेत. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय. या व्हिडिओमध्ये ग्रोसरी स्टोअरमध्ये काही हल्लेखोरांसोबत एका कर्मचारीही दिसून येतोय. दुसरीकडे, मोहम्मदच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आपल्याला अमेरिकेत जाण्यासाठी मदत केली जावी, अशी मागणी मोहम्मदची पत्नी मेहनाज फातिमा यांनी केलीय. मला आणि माझ्या वडिलांना इमर्जन्सी व्हिजावर अमेरिकेला जाण्यासाठी मदत करण्याची विनंती मी सरकारला केली आहे, असं फातिमा यांनी म्हटलंय. वाचा : वाचा : रविवारी सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास आपण आरिफला फोन केला होता. तेव्हा आरिफनं अर्ध्या तासात फोन करतो असं सांगून फोट ठेवला. परंतु, नंतर काही तास उलटल्यानंतरही आरिफकडून कोणताही कॉल आला नाही. त्यानंतर पतीच्या बहिणीकडून काही अज्ञातांनी पतीची चाकू भोसकून हत्या केल्याचं आपल्याला समजल्याचं फातिमा यांनी म्हटलंय. तेलंगणाच्या मजलिस बचाओ तहरीक (एमबीटी) पक्षाचे प्रवक्ते उल्लाह खान यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेतील भारतीय दूतावास यांना पीडित कुटुंबाच्यावतीनं पत्र लिहून मदतीची मागणी केली आहे. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
November 03, 2020 at 12:40PM

करोना संक्रमणाचा वेग घटतोय, पण निष्काळजीपणा नको!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांत भारतात करोना संक्रमणाच्या परिस्थितीत सुधारणा दिसून येतेय. नव्यानं संक्रमित आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटल्यानं तसंच करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यानं उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या संख्येत कमालीची घट दिसून येतेय. अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३० जुलैनंतर सर्वात कमी आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात करोना संक्रमितांची एकूण संख्या ८२ लाख ६७ हजार ६२३ वर पोहचलीय. तर देशात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या साडे पाच लाखांवर आहे. सध्या देशात ५ लाख ४१ हजार ४०५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. गेल्या २४ तासांत (शनिवारी सकाळी ८.०० पासून रविवारी सकाळी ८.०० वाजेपर्यंत) करोनाचे ३८ हजार ३१० नवीन करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर याच २४ तासांत तब्बल ५८ हजार ३२३ रुग्णांनी करोनावर मात केल्याचंही दिसून येतंय. वाचा : वाचा : तर सोमवारी ४९० जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागलेत. आत्तापर्यंत देशात १ लाख २३ हजार ०९७ जणांना कोविड १९ मुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशाचा (बरे झालेले रुग्ण) ९१.९६ वर पोहचलाय. पॉझिटिव्हीटी रेट (चाचणीत एकूण नमुन्यांपैंकी संक्रमित आढळलेले रुग्ण) ३.६६ क्के तर डेथ रेट (मृत्यू दर) १.४८ टक्क्यांवर आहे. अॅक्टिव्ह रुग्णांचा दर ६.५४ टक्क्यांवर आहे. २ नोव्हेंबर रोजी १० लाख ४६ हजार २४७ करोना नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आत्तापर्यंत एकूण ११ कोटी १७ लाख ८९ हजार ३५० नमुन्यांची तपासणी पार पडल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आलीय. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
November 03, 2020 at 11:24AM

मध्य प्रदेश पोटनिवडणूक : २८ जागांसाठी मतदान, सत्तेचं चक्र फिरणार?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीत २८ जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरु झालेलं मतदान सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत पार पडेल. प्रशासनाकडून यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आलीय. मध्य प्रदेशच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत विधानसभा जागांवर फेरनिवडणूक पार पडतेय. १० नोव्हेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. राज्यात कोणत्या पक्षाचं वर्चस्व आणि सत्ता राहील, याचा निकाल या निवडणुकीत लागणार आहे. या उपनिवडणुकीत काँग्रेसचा राजीनामा देत भाजपच्या गोटात शिरलेल्या २५ आमदारांची प्रतिष्ठाही या निवडणुकीत पणाला लागलीय. विधानसभा निवडणुकीत ज्या जागांवर ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले त्याच जागांवर आता पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर हे उमेदवार उभे आहेत. यातील बहुतांश ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आहेत, आणि त्यांच्याचसोबत ते भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे याच वर्षी मार्च महिन्यात भाजपमध्ये सामील झाले होते. वाचा : वाचा : मध्य प्रदेशात काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा देत भाजपचा मार्ग पत्करल्यानं सरकार अल्पमतात आलं होतं. त्यामुळे २० मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. २३ मार्च रोजी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या आणखीन चार आमदारांनी राजीनामा देत भाजपची वाट धरली होती. उल्लेखनीय म्हणजे, आज (मंगळवारी) देशातील १० राज्यांच्या ५४ विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक पार पडतेय. यातील २८ मतदारसंघ मध्य प्रदेशातील आहेत. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
November 03, 2020 at 10:08AM