N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

बोअरवेलमध्ये अडकला ३ वर्षांचा चिमुकला, सेनेकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
निवारी, : मध्य प्रदेशातील टिकामगढ जिल्ह्यातील निवारी या तालुक्यात एक चिमुरडा बोअरवेलमध्ये अडकल्याची माहिती मिळतेय. तीन वर्षांचा हा मुलगा खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला. सहायक पोलीस अधीक्षक (ASP) प्रतिभा त्रिपाठी यांनी मीडियाशी बोलताना दिलेल्या माहितीत, हा चिमुरडा निवारीतल्या गावचा रहिवासी असल्याचं म्हटलंय. मुलाला वाचवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच सेनेचीही मदत घेण्यात आलीय. सेनेनं घटनास्थळी दाखल होत मुलाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. वाचा : वाचा : राज्याचे मुख्यमंत्री यांनी मुलगा सुखरुप बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केलाय. 'ओरछाच्या सेतपुरा गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या लहानग्या प्रल्हादला वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत सेनाही बचावकार्यात सहभागी झालीय. लवकरच प्रल्हादला सहीसलामत बाहेर काढण्यात येईल, असा मला विश्वास आहे. ईश्वर मुलाला दीर्घायुष्य प्रदान करो, आपण सगळेच यासाठी प्रार्थना करू' असं ट्विट मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलंय. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
November 05, 2020 at 11:24AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा