N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

अमित शहांचा बंगाल दौरा; दलित, मटुआ कुटुंबासोबत घेणार भोजन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
कोलकाता: केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते () बुधवारी दोन दिवसीय दौऱ्यावर पश्चिम बंगालमध्ये () पोहोचले आहेत. शहांच्या या दौऱ्याचा उद्देश पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षाच्या राज्यातील तयारीचा आढावा घेणे हा आहे. शहा बंगालमध्ये ज्या दिवशी पोचले, त्या दिवशी भारतीय जनता पक्षाने कोलकात्यात सेंट्रल एव्हेन्यू येथे मोर्चा काढला होता. तेथे पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली होती. हे पाहता पक्ष आतापासूनच लढाईच्या पवित्र्यात असल्याचे भाजप भासवत असल्याचे स्पष्ट होत आहे. पुढील वर्षीच्या निवडणुकीसाठी अमित शहा हेच पक्षाचे नेतृत्व करतील असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे. कोविड-१९ नंतर शहा यांचा पश्चिम बंगालमधील हा पहिलाच दौरा आहे. या पूर्वी ते येथे १ मार्चला आले होते. बुधवारी रात्री शहा कोलकात्यात थांबले. आज ते सर्वप्रथम बांकुडा येथे जातील. तेथे जंगलमहल येथे ते पक्षाचे कार्यकर्ते आणि समाजातील विविध नेत्यांच्या भेटी घेतील. येथे आदिवासी नागरिकांची संख्या मोठी आहे. तेथे एकेकाळी माओवाद्यांचा मोठा प्रभाव होता. शहा पश्चिम बंगालच्या दक्षिणी भागातील विधानसभेच्या ७० मतदारसंघांमधील कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. या व्यतिरिक्त ते बांकुडा जिल्ह्यातील चतुर्धी गावातील एका दलित कुटुंबासोबत दुपारचे जेवण करतील. शुक्रवारी शहा समुदायाच्या एका कुटुंबासोबत भोजन करतील. मटुआ समुदाय पूर्वी पाकिस्तानातून आला होता. आम्हाला नागरिकता दुरुस्ती कायद्यांतर्गत नागरिकता देण्यात यावी, अशी या समाजाची मागणी आहे. या समुदायाने सन २०१९ मध्ये भाजपलाच मतदान केले होते. मात्र सध्या त्यांचे युवा खासदार शांतनु ठाकूर या कायद्याला लागू करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत तक्रार करत आहेत. मटुआ कुटुंबासोबत भोजन घेत आपले तुमच्या समस्यांकडे लक्ष असून बंगलाच्या निवडणुकीच्या मैदानात सीएए हा मुद्दा सर्वात पुढे ठेवणार असल्याचे संकेत शहा देणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कायद्याला जोरदार विरोध दर्शवला होता. अमित शहा यांचा हा राजकीय स्टंट असल्याचे तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी म्हटले आहे. अमित शहा यांनी यापूर्वी देखील एका दलित कुटुंबासोबत आणि २०१६ मध्ये एका आदिवासी कुटुंबासोबत भोजन घेतले होते. त्यांच्या या दौऱ्यात काही विशेष आहे, असे मला वाटत नाही. केवळ काही भाजप नेत्यांना बंगालमध्ये कलम ३५६ ची मागणी करण्याची संधी मिळेल, इतकेच, असे रॉय म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- या मुद्द्यावर देखील भारतीय जनता पक्षात दुमत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष याविरुद्ध आहेत, असेही रॉ म्हणाले. अमित शहा स्थानिक भाजपात बिघडलेल्या गोष्टी सरळ करण्यासाठी प्रयत्न करतील असे वाटते. मात्र, आपल्या पक्षात कोणताही वाद नसल्याचे भाजपने म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
November 05, 2020 at 11:29AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा