N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

India News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पाठदुखी, अतिसार आणि उलट्याही, करोनाची नवीन लक्षणं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली : अगोदर कोरडा खोकला, ताप इत्यादी समजली जात होती. परंतु, त्यात यात तब्बल ११ लक्षणांचा समावेश करण्यात आलाय. उल्लेखनीय म्हणजे, पाठीचं दुखणं हेदेखील करोनाचं लक्षण असू शकतं, असंही समोर येतंय. ताप, कोरडा खोकला, श्वासोच्छवासास अडथळा, थकवा, शरीरदुखी, डोकं दुखी, स्वाद किंवा गंधाची क्षमता नष्ट होणं आणि घश्यात त्रास अशी एकूण नऊ करोना संक्रमणाची लक्षणं जाहीर करण्यात आली होती. त्यात आता आणखीन तीन लक्षणंही जोडण्यात आली आहेत. (CDC) नं या तीन लक्षणांचा करोनाची लक्षणं म्हणून समावेश केलाय. यामध्ये वाहतं नाक, उलटी आणि अतिसार यांचा समावेश आहे. वाचा : वाचा : वाचा : पाठदुखीही ठरू शकते धोकादायक उल्लेखनीय म्हणजे, पाठीच्या दुखण्याची तक्रार घेऊन आलेले अनेक लोक टेस्टिंगमध्ये आढळले आहेत. जर तुमची कंबर दुखतेय, पोटात दुखतंय किंवा पायाच्या पोटऱ्या दुखत असतील, तर ही करोनाची लक्षणंही असू शकतात, असं मुंबईच्या सीनियर डॉक्टर जलील पारकर यांचं म्हणणं आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णावर उपचार करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जवळपास २०० रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यानंतर त्या स्वत: करोना पॉझिटिव्ह आढळल्या. जलील यांच्या म्हणण्यानुसार, पाठीचं दुखणं हे त्यांच्यात आढळलेलं पहिलं लक्षणं होतं. रक्तातील शर्करेचं प्रमाण अचानक वाढणं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांना असेही काही रुग्ण आढळत आहेत ज्यांना अगोदर डायबेटीजचा त्रास नव्हता. परंतु, आता मात्र त्यांची शुगर लेव्हल अचानक ४०० चा टप्पा सहज पार करते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, करोना रुग्णांमध्ये शुगर लेव्हल अचानक वाढत असल्याचं दिसून येतंय. करोनाची आकडेवारी दरम्यान, देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ वर पोहचलीय. यातील ३ लाख ४७ हजार ९७९ जण करोनामुक्त झालेत. तर अद्याप २ लाख २० हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोना संक्रमणामुळे आत्तापर्यंत १७ हजार ४०० जणांनी आपले प्राण गमावलेत. वाचा : वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
July 01, 2020 at 10:19AM

आजपासून देशात अनलॉक २.० सुरू; पाहा, काय आहे नवी नियमावली?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: देशभरात करोनाचा संसर्ग तीव्र गतीने वाढत असताना आजपासून देशात ची सुरुवात होत आहे. यासाठी केंद्र सरकारने नवी जारी केली आहे. हा टप्पा १ जुलै पासून ते ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. देशात तब्बल ४ महिन्यांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक लागू करण्यात येत आहे. अनलॉक १ च्या काळात नागरिकांना अनेक प्रकारच्या सूट देण्यात आली होती. त्यानंतर अनलॉक २.० वाढवण्यात आला आहे. अनलॉक २.० मध्ये होणार हे मोठे बदल, पाहुयात... > आजपासून विमान आणि ट्रेनची संख्या वाढवणार. आतापर्यंत मर्यादित संख्येत या सेवा सुरू राहणार. आता तीच संख्या दुप्पट होऊ शकते. > आता रात्री १० वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू असणार. पूर्वी ही वेळ रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत होती. > दुकानात एकाचवेळी ५ लोक जाऊ शकतात. मात्र यासाठी शारीरिक अंतराचा नियम पाळणे बंधनकारक. > १५ जुलैपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये कामकाज सुरू होऊ शकेल. 'या' गोष्टी राहणार आताही बंदच > शाळा आणि महाविद्यालये ३१ जुलैपर्यंत राहणार बंद. याबाबतचा पुढील निर्णय राज्य सरकारांशी चर्चा करून घेतला जाईल. > मेट्रो रेल्वे बंदच राहणार > चित्रपटगृहे बंदच राहणार > स्वीमिंग पूल बंद राहणार >एंटरटेनमेंट पार्क > बार > ऑडिटोरियम >असेम्बली हॉल वाचा: या व्यतिरिक्त सरकारने आताही प्रतिबंधित क्षेत्रात कडक नियम सुरूच ठेवले आहेत. या क्षेत्रात केवळ अत्यावश्यक व्यवहारासाठीच मंजुरी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कमीतकमी लोकांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. या बरोबरच प्रतिबंधित क्षेत्रात करोनाच्या चाचण्याही वाढवल्या जाणार आहेत. दरम्यान, या पूर्वी अनलॉक-१ मध्ये धार्मिक स्थळे, मॉल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. वाचा: अनलॉक-१ मध्ये नागरिकांनी निष्काळजीपणा दाखवल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात चिंता व्यक्त केली आहे. आपण जराही निष्काळजी राहता कामा नये आणि करोनाचा पराभव करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे. वाचा:

https://ift.tt/3fcy07h
July 01, 2020 at 10:14AM

आजच्या ठळक बातम्यांवर एक नजर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
पंढरपूरः दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत अगदी उत्साहात साजरा केला जाणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढी एकादशीची महापूजा यांनी सपत्नीक केली. यंदा मानाचे वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला. आषाढी एकादशीपासून करोनाचे संकट नष्ट होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी घातले. मुंबई : जागतिक बाजाराशी सुसंगत असूनही देशात आणि डिझेलच्या किमती जूनमधील तीन आठवडे वाढत होत्या. मात्र सोमवार आणि मंगळवार देशभरात झालेल्या आंदोलनाची दखल पेट्रोलियम कंपन्यांना घ्यावी लागली आहे. एकीकडे देश करोना संकटाशी झुंज देत असताना पेट्रोल-डिझेल दरवाढीने जनतेत निर्माण झालेला असंतोष शांत करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच आज बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी कंपन्यांनी दरवाढ टाळली आणि पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे ठेवले. मुंबई : स्थानिक कमॉडिटी बाजारात मंगळवारी झालेल्या नफावसुलीनंतर आज सोने आणि चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४८५५९ रुपये झाला. त्यात २५ रुपयांची वाढ झाली. तर चांदीमध्ये ४४ रुपयांची वाढ झाली असून प्रती किलो ४८६०० रुपये झाला. पंढरपूर: यात्रेच्या इतिहासात यंदा प्रथमच करोनामुळे आषाढ शुद्ध दशमीला नगरी वारकऱ्यांविना ओस पडल्याचं वेदनादायी चित्र पाहायला मिळालं. म्हटलं की ज्या मंदिर परिसरात यात्रेच्या आदल्या दिवसापासून मुंगी शिरायलाही जागा नसायची त्या संपूर्ण परिसरात मंगळवारी शुकशुकाट पसरला होता. नवी दिल्लीः फेमस शॉर्ट व्हिडिओ ला भारतात गुगल आणि अॅपल वरून हटवले आहे. गुगल आणि अॅपल ने हा निर्णय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातल्यानंतर घेतला आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, या अॅप्समुळे भारताची सुरक्षा आणि समाजाला धोका आहे. बंदी घालण्यात आलेल्या अॅप्समध्ये टिकटॉक शिवाय यूसी ब्राउजर, शेअरइट आणि कॅम्स स्कॅनर यासारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे.

https://ift.tt/3fcy07h
July 01, 2020 at 08:40AM

काश्मीर: सीआरपीएफ गस्ती पथकावर मोठा दहशतवादी हल्ला, ३ जवानांसह १ नागरिक जखमी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे () ३ जवान जखमी झाले आहेत. तर या दहशतवादी हल्ल्यात सोपोरमधील एका नागरिकही जखमी झाला आहे. सोपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पथक गस्तीसाठी आपल्या वाहनातून खाली उतररत असताना दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक सीआरपीएफच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार करणे सुरू केले. यात सीआरपीएफचे ३ जवान जखमी झाले. जवानांनी परिसराला घेरले आज बुधवारी सकाळी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पथक गस्तीसाठी निघाले होते. हे पथक रेबन येते आपल्या वाहनातून खाली उतरत होते. त्या वेळी अचानक हा हल्ला करण्यात आला. ही माहिती मिळताच सीआरपीएफची दुसरे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लागलीच या भागाला घेराव घालण्यात आला असून या दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. काल मंगळवारी अनंतनाग जिल्ह्यातील वाघमा भागात सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २ दहशतवादी ठार झाले होते. या भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम हाती घेतली. या पूर्वी सोमवारी सुरक्षा दले आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अनंतनागमधील खुलचोहर भागात ३ दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यानंतर डोडा जिल्हा दहशतवाद मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. ३० दिवसांमध्ये १८ चकमकी आणि ५१ दहशतवादी ठार गेल्या महिन्याभराच्या काळात जम्मू आणि काश्मीरमधील विविध भागांमध्ये सुरक्षादले आणि दहशतवाद्यांमध्ये १८ चकमकी झाल्या. यात एकूण ५१ दहशतवादी मारले गेले. १ जून या दिवशी नौशेरा भागात ३, २ जूनला पुलवाम्यातील त्राल भागात २, ३ जूनला पुलवाम्यातील कंगन भागात ३, ५ जूनला राजौरीच्या कालाकोट भागात १, ७ जूनला शोपियानच्या रेबन भागात ५, ८ जूनला शोपियानच्या पिंजोरा भागात ४, १० जूनला शोपियानच्या सुगू भागात ५, १३ जूनला कुलगामच्या निपोरा भागात २, १६ जूनला शोपियानच्या तुर्कवंगम भागात ३, १८ आणि १९ जूनला अवंतीपोरा आणि शोपियानमध्ये ८, २१ जूनला शोपियान येथे ३, २३ जूनला पुलवाम्याच्या बंदजू येथे २, २५ जूनला बारामुल्लाच्या सोपोर येथे २, २५ आणि २६ जूनला पुलवाम्याच्या त्राल येथे ३, २९ जूनला अनंतनागच्या खुलचोहर येथे ३ आणि आज ३० जूनला अनंतनागच्या वाघमा येथे २ दहशतवादी ठार झाले. या प्रमाणे एकूण महिन्याभराच्या काळात एकूण ५१ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

https://ift.tt/3fcy07h
July 01, 2020 at 08:38AM

कोरोनिलवर पतंजलीचा यू-टर्न; नोटिशीला दिले 'हे' उत्तर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
हरिद्वार: करोनिल औषधाच्या मुद्द्यावर पतंजली आयुर्वेदने आता यू-टर्न घेतला आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचे करोनावरी औषध तयार केलेले नाही, असे उत्तराखंड आयुष विभागाने धाडलेल्या नोटिशीला उत्तर देताना पतंजली आयुर्वेदने स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी योगगुरू आणि आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत औषधाचे लॉन्चिंग करण्यात आले होते. आयुष मंत्रालयाची नोटीस मिळाल्यानंतर करोनावरील औषध बनवण्याचा दावा करणाऱ्या पतंजली आयुर्वेदने आम्ही करोनावर औषध बनवले आहे असा दावा केला नसल्याचे म्हटले आहे. आम्ही कधीही करोनावर औषध बनवल्याचा दावा केलेला नसून आम्ही बनवलेल्या औषधामुळे करोनाचे रुग्ण बरे झाले आहेत, असे आमचे म्हणणे असल्याचे पतंजली आयुर्वेदने उत्तराखंडच्या आयुष मंत्रालयाच्या नोटिशीला उत्तर देताना म्हटले आहे. गेल्या २३ जूनला पतंजली आयुर्वेने राजस्थानच्या निम्स विद्यापीठाच्या सहकार्याने करोनावर औषध तयार करण्याचा दावा केला होता. या औषधाचे नाव कोरोनिल आणि श्वासारी बटी असे ठेवण्यात आले होते. योगगुरू बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण आणि निम्स विद्यापीठाचे चेअरमनच्या उपस्थितीत हरिद्वारमध्ये कोरोनिल हे औषध लॉन्च केले होते. या औषधाची करोनाच्या रुग्णावर क्लिनिकल टेस्टही करण्यात आल्याचा दावा पत्रकार परिषदेत पतंजली आयुर्वेदने केली होती. वाचा: या नंतर आरोग्य मंत्रालयाच्या आयुष विभागाने पतंजली आयुर्वेदचा हा दावा नाकारला होता. अशा प्रकारचे औषध तयार करण्यासाठी पतंजली आयुर्वेदने आमच्याकडून परवाना घेतला नसल्याचे आयुष मंत्रालयाने म्हटले होते. तर पतंजली आयुर्वेदने आमच्याकडून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध बनवण्याचा परवाना घेतला होता, असे उत्तराखंडच्या आयुष विभागाने म्हटले होते. याबरोबरच या प्रकरणी एका आठवड्यात या प्रकरणावर उत्तर देण्याचे आदेश आयुष विभागाने पतंजली आयुर्वेदला नोटीस पाठवत दिले होते. याच नोटीशीला उत्तर देताना पतंजली आयुर्वेदने आपल्या दाव्यापासून घुमजाव केले आहे. आम्ही करोनावर औषध बनवण्याचा कोणताही दावा केलेला नसून, औषधाने करोनाचे रुग्ण बरे झाले असे उत्तर पतंजली आयु्र्वेदने दिले आहे. वाचा: वाचा:

https://ift.tt/3fcy07h
June 30, 2020 at 12:13PM

दहशतवादासोबत भूकंपानंही हादरतंय जम्मू काश्मीर!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
जम्मू : जम्मू काश्मीरच्या भागात मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचं हादरे जाणवले. या ४.० रिश्टर स्केलवर मोजण्यात आली. सकाळी लोक गाढ निद्रेत असताना अचानक आलेल्या या भूकंपानं रहिवाशांचा थरकाप उडवला. जीव वाचवण्यासाठी लोक आपल्या घराच्या बाहेर धावत आले. सकाळी जवळपास ८ वाजून ५६ मिनिटांनी हा भूकंपाचा हादरा बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू कटरापासून पूर्वेत जवळपास ८४ किलोमीटर दूर होता. 'नॅशनल सेंटर फॉर सिस्मलॉजी'च्या म्हणण्यानुसार, भूकंपाचं केंद्र जमिनीपासून जवळपास १० किलोमीटर खोलवर होता. 'भारतीय मानक ब्यरो'नं वेगवेगळ्या एजन्सीकडून प्राप्त झालेल्या वैज्ञानिक माहितीच्या आधारे संपूर्ण भारताला चार भूकंपीय झोनमध्ये विभागलं आहे. यामध्ये सर्वात धोकादायक '' असल्याचं सांगितलं जातं. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, या क्षेत्रात ९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसू शकतो. 'झोन ५'मध्ये संपूर्ण ईशान्य भारत, जम्मू काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरातचं कच्छ, उत्तर बिहारचा काही भाग आणि अंदमान निकोबार बेटांचा समूह यांचा समावेश होतो. या क्षेत्रात अनेकदा जाणवत राहतात. वाचा : वाचा : एका महिन्यात सहा भूकंपाचे धक्के उल्लेखनीय म्हणजे, जून २०२० या एका महिन्यात जम्मू काश्मीरला बसलेला हा सहावा भूकंपाचा धक्का आहे. गेल्या १५ जून आणि १६ जून रोजी दोन दिवसांच्या आत जम्मू काश्मीरनं चार भूकंपाचे धक्के सहन केले आहेत. याआधीही एका महिन्यात भारतात तब्बल ११ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते. हे भूकंपाचे धक्के दिल्ली - एनसीआर परिसरात बसले होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिमालयाच्या जवळपास धरतीच्या खाली खूप बदल होत आहेत. त्यामुळे हे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तज्ज्ञांकडून मोठ्या भूकंपाची चेतावणीही देण्यात आली आहे.
तारीख तीव्रता केंद्र
१३ एप्रिल २.७ दिल्‍ली
१६ एप्रिल २ दिल्‍ली
३ मे ३ दिल्‍ली
६ मे २.३ फरीदाबाद
१० मे ३.४ दिल्‍ली
१५ मे २.२ दिल्‍ली
२८ मे २.५ फरीदाबाद
२९ मे ४.५ आणि २.९ रोहतक
१ जून १.८ आणि ३ रोहतक
३ जून ३.२ फरीदाबाद
८ जून २.१ गुरुग्राम
वाचा : वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
June 30, 2020 at 11:49AM

टिकटॉक स्टार तरुणीची गळा आवळून हत्या, दोन दिवसांनी...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
सोनीपत: हरयाणाच्या सोनीपतमध्ये एका टिकटॉक TikTok स्टार शिवानीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिवानीचा मृतदेह दोन दिवसांनी तिच्या ब्युटी पार्लरमधील बॉक्स बेडमध्ये आढळून आला. कुंडली येथे राहणाऱ्या आरिफवर तिच्या हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून, विच्छेदनासाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवानीच्या बहिणीच्या मित्राने ब्युटी पार्लरमधील बॉक्स बेड उघडल्यानंतर तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याने कुटुंबीयांना कळवले. त्यांनी याबाबत पोलिसांनाही माहिती दिली. शिवानी ही खोबियान कुंडलीमध्ये पार्लर चालवायची. टिकटॉकवर तिचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. कुंडलीतच राहणाऱ्या आरिफने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. कारण तो घटनेनंतर बेपत्ता झाला होता. पोलिसांनी तपास केला असता, आरिफ २६ जून रोजी शिवानीच्या ब्युटी पार्लरला आला होता. शिवानीने याबाबत आपली बहीण श्वेता हिला सांगितले होते. जेव्हा शिवानी रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही, तेव्हा श्वेताने तिला व्हॉट्सअॅप मेसेज केला. त्यावर मी हरिद्वारमध्ये आहे, तीन-चार दिवसांनी परत येईल, असा रिप्लाय तिला मिळाला. मारेकरी शिवानीचा फोन घेऊन गेला होता आणि त्यावरूनच तो शिवानीला रिप्लाय देत होता, असे लक्षात आले. २ दिवसांनी हत्या झाल्याचे उघड घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी श्वेताचा मित्र नीरज याने ब्युटी पार्लर उघडले. पार्लरमध्ये दुर्गंधी येत होती. पार्लरमधील बेड बॉक्स उघडून पाहिला असता, त्यात शिवानीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती नीरजने कुटुंबीयांना दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांना माहिती दिली. आरिफ तीन वर्षांपासून शिवानीला त्रास देत होता. त्यामुळे ते कुंडलीत राहायला आले. शिवानीने आरिफविरोधात पोलिसांतही तक्रार केली होती. शिवानीच्या हत्येनंतर दोन दिवसांनी तिच्या टिकटॉक अकाउंटवरून एक व्हिडिओही अपलोड करण्यात आला होता. त्या रात्री तो शिवानीच्या कुटुंबीयांशी चॅटिंग करत होता.. पोलिसांना आरिफचा संशय आल्यानंतर त्यांनी त्याचा शोध सुरू केला. कुंडली पोलिसांनी आरिफला अटक केली. आरिफने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने शिवानीची हत्या केल्यानंतर त्याच रात्री तो तिच्या कुटुंबीयांशी चॅटिंगद्वारे संवाद साधत होता. कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याची कोविड चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानीची हत्या शुक्रवारी संध्याकाळी किंवा रात्री करण्यात आली. नीरज हा त्या दिवशी बाहेरगावी गेला होता. आरिफने ओढणीने तिचा गळा आवळला आणि पार्लरमधील बेडमध्ये तिचा मृतदेह ठेवला. पार्लरमधून दुर्गंधी येत असल्याने नीरजने बेड खोलला, त्यावेळी त्याला शिवानीचा मृतदेह दिसला.

https://ift.tt/3fcy07h
June 30, 2020 at 11:44AM

'मोदी विरुद्ध मनमोहन'; चीनच्या मुद्द्यावर राहुल गांधीनी काढले 'हे' अस्त्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: भारत आणि चीनदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सतत यांना घेरत आहेत. ते दररोज ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. दरम्यान चीनच्या ५९ अॅपवर भारतात बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या आज दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज संध्याकाळी ४ वाजता पंतप्रधान मोदी देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी आज ट्विट करत सरकारच्या काळात चीनशी होणारा व्यापार आणि सामान खरेदीचा तुलनात्मक ग्राफ शेयर केला आहे. राहुल गांधी यांनी या ग्राफ द्वारे माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालाची तुलना करत चीनकडून खरेदी करण्या येणाऱ्या सामानाचा ग्राफ शेयर केला आहे. राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणतात, 'संख्या खोटे बोलत नाही. भाजप म्हणतो: मेक इन इंडिया, मात्र भाजप कृतीतून दाखवते- बाय फ्रॉम चायना (चीनमधून खरेदी करा)' वाचा: राहुल गांधींचा मोदी सरकारवर नित्याचा हल्ला राहुल गांधी गेल्या अनेक दिवसांपासून मोदी सरकारवर सतत हल्ले करत आहेत. भारतीय भूमीत चीनने आक्रमण केले असून त्यांच्यासमोर पंतप्रधान मोदी यांनी आत्मसमर्पण केले आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली होती. चीनने भारतीय भूमीत कोणत्याही प्रकारची घुसखोरी केलेली नाही, अशा पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांनी ही टीका केली होती. वाचा: राहुल गांधींना इतर विरोधी पक्षांचा पाठिंबा नाही राहुल गांधी सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असताना इतर विरोधी पक्षांचे राहुल गांधी याना मात्र सहकार्य मिळताना दिसत नाही. चीनच्या मुद्द्यावर देशातील प्रमुख पक्षांनी एक-दुसऱ्यावर आरोप करता कामा नयेत असे बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे. या आपसातील लढाईमुळे सर्वात जास्त देशातील जनतेचे नुकसान होत असते. या मुद्द्यावर बहुजन समाज पक्ष केंद्र सरकारच्या सोबत आहे, असे मायावती यांनी स्पष्ट केले आहे. वाचा:

https://ift.tt/3fcy07h
June 30, 2020 at 11:14AM

'लॉकडाऊन'चा ९८ वा दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय बोलणार?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली : करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात २४ तारखेला सायंकाळी उशिरा पंतप्रधानांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. आज या लॉकडाऊनचा ९८ वा दिवस आहे. लॉकडाऊनचा पाचवा टप्पाही आता संपत आलाय. याच दरम्यान, आज सायंकाळी ४.०० वाजता पुन्हा एकदा आहेत. त्यामुळे, आज पंतप्रधान काय घोषणा करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. पंतप्रधान मोदी आज आपल्या भाषणातून अभियानावर आणखी भर देणार का? देशात करोनाचे रुग्ण ५ लाखांवर गेले आहेत. यामुळे जनतेला करोनाच्या संसर्गाबाबत अधिक जागरूक करणार का? लॉकडाऊनमध्ये आणखी सूट मिळणार का? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. वाचा : वाचा : वाचा : ३० जून रोजी करोना आकडेवारी करोनाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार सध्या २ लाख १५ हजार १२५ रुग्णांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. देशभरात केवळ गेल्या २४ तासांत करोनाचे १८ हजार ५२२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांत एकूण ४१८ रुग्णांचे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलीय. त्यामुळे देशातील एकूण मृत्यूंची संख्या आता १६ हजार ८९३ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत ५ लाख ६६ हजार ८४० रुग्ण करोनाच्या तावडीत सापडले आहेत. यातील ३ लाख ३४ हजार ८२२ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले. वाचा : वाचा : वाचा : एका दिवसात २,१०,२९२ चाचण्या गेल्या २४ तासांत २ लाख १० हजार २९२ चाचण्या पार पडल्या. आतापर्यंत देशभरात घेतलेल्या एकूण करोना चाचण्यांची संख्या ८६ लाख ०८ हजार ६५४ इतकी आहे. करोना चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या आता १०४९ झाली असून त्यात ७६१ सरकारी, तर २८८ खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. वाचा :

https://ift.tt/3fcy07h
June 30, 2020 at 10:14AM

अनंतनागमध्ये २ दहशतवादी ठार; २४ तासांत ५ दहशतवाद्यांचा खात्मा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
अनंतनाग: जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्यातील वाघमा भागात सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २ दहशतवादी ठार गेले आहेत. या भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम हाती घेतली. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाने सुरक्षा दलाचा जवान आणि एका मुलाला मारले होते. या पूर्वी सोमवारी सुरक्षा दले आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अनंतनागमधील खुलचोहर भागात ३ दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यानंतर डोडा जिल्हा दहशतवाद मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. ३० दिवसांमध्ये १८ चकमकी आणि ५१ दहशतवादी ठार गेल्या महिन्याभराच्या काळात जम्मू आणि काश्मीरमधील विविध भागांमध्ये सुरक्षादले आणि दहशतवाद्यांमध्ये १८ चकमकी झाल्या. यात एकूण ५१ दहशतवादी मारले गेले. १ जून या दिवशी नौशेरा भागात ३, २ जूनला पुलवाम्यातील त्राल भागात २, ३ जूनला पुलवाम्यातील कंगन भागात ३, ५ जूनला राजौरीच्या कालाकोट भागात १, ७ जूनला शोपियानच्या रेबन भागात ५, ८ जूनला शोपियानच्या पिंजोरा भागात ४, १० जूनला शोपियानच्या सुगू भागात ५, १३ जूनला कुलगामच्या निपोरा भागात २, १६ जूनला शोपियानच्या तुर्कवंगम भागात ३, १८ आणि १९ जूनला अवंतीपोरा आणि शोपियानमध्ये ८, २१ जूनला शोपियान येथे ३, २३ जूनला पुलवाम्याच्या बंदजू येथे २, २५ जूनला बारामुल्लाच्या सोपोर येथे २, २५ आणि २६ जूनला पुलवाम्याच्या त्राल येथे ३, २९ जूनला अनंतनागच्या खुलचोहर येथे ३ आणि आज ३० जूनला अनंतनागच्या वाघमा येथे २ दहशतवादी ठार झाले. या प्रमाणे एकूण महिन्याभराच्या काळात एकूण ५१ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. वाचा: सोमवारी अनंतनागमधील खुलचोहर येथे ३ दहशतवादी ठार होण्यापूर्वी काश्मीरमध्ये ठार करण्यात आलेल्या एका दहशतवाद्याच्या आईला रायफलसह फोटो काढणे आणि लोकांना दहशतवादी संघटनेत कथित भरती करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या व्यतिरिक्त पोलिसांनी कुलगाममध्ये सक्रिय असलेल्या एका दहशतवाद्याच्या बहिणीलाही दहशतवाद्यांना भरती करण्याच्या कथित सहभागामुळे अटक करण्यात आली आहे. वाचा: जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. दहशतवादी अब्बास शेख याची बहीण आणि ठार करण्यात आलेला दहशतवादी तौसीफ याची आई नसीमा बानो यांना २० जून या दिवशी अटक करण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. ही महिला युवकांना दहशतवादी संघटनेत भरती करण्याचे काम करत होती अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी माहिती देताना सांगितले. ही महिला आपल्या मुलासह हत्यारे चालवत असल्याचा एक फोटोही आढळला असल्याची माहितीही एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. त्यावेळी तिचा मुलगा सक्रिय दहशतवादी होता. वाचा:

https://ift.tt/3fcy07h
June 30, 2020 at 09:13AM

वाचा: आजच्या ठळक बातम्या अगदी मोजक्या शब्दांत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई : जागतिक बाजाराशी सुसंगत असूनही देशात पेट्रोल आणि डिझेलमधील दरवाढीला मंगळवारी पुन्हा एकदा ब्रेक लागला. आज पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नाही. याआधी गेल्या रविवारी कंपन्यांनी इंधन दर 'जैसे थे'च ठेवले होते. नवी दिल्लीः भारत सरकारने ५० हून अधिक चीनी अॅप्स बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला. बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सच्या यादीत प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. यात , आणि ShareIt यासारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. या अॅप्सवर बंदी घालण्यामागे केवळ हे अॅप्स चीनी अॅप्स आहेत. म्हणून त्यांच्यावर बंदीवर घातली नाही. देशाची सुरक्षा आणि एकता राखून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे लवकरच ५९ अॅप्स गुगल प्ले स्टोर आणि अॅपल प्ले स्टोरवरून हटवण्यात येतील. मुंबई : मागील आठवड्यात सोन्याच्या किंमतींत वाढ झाली होती. हीच तेजी या आठवड्यात कायम राहणार असून सोने विक्रमी स्तर गाठेल, अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. देशातील कमॉडिटी बाजारात सोमवारी सोन्यावर दबाव दिसून आला. सोन्याच्या दरात ०.१३ टक्के घसरण झाली. मात्र सोन्याचा भाव ४८००० वर कायम आहे. सोने ४८२४४ रुपयांवर बंद झाले. ०.५० टक्क्याने कमी झाला आणि ४८१२३ रुपयांवर बंद झाला. दरम्यान मुंबईत सराफा बाजारात सोने ४९ रुपयांनी वधारले. सोन्याचा भाव प्रती दहा ग्रॅमला ४८४५० रुपये झाला. तर चांदीचा भाव ४८५०० रुपये प्रती किलो होता. नवी दिल्लीः केंद्र सरकारने अनलॉक- २ साठी आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार ३१ जुलैपर्यंत शाळा-कॉलेजेस बंदच राहणार आहेत. करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण संस्था आता जुलैनंतरच उघडणार आहेत. हैदराबादः देशात करोनाचे रुग्ण ५ लाखांवर गेले आहेत. यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अशा स्थितीत एक चांगली बातमी आहे. भारतात करोनावरील लस तयार झाली आहे. भारत बायोटेकने ही लस बनवली आहे. यातील आनंदाची बाब म्हणजे या लसीच्या मानवी चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेकला सोमवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय ) दिली आहे. मुंबई: 'देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करून पालख्या नेत विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात. मागील आठ शतकांपासून चालत आलेली ही परंपरा खंडित होऊ देऊ नये आणि करोनाचे संकट असले, तरी सुरक्षित वावरचे सर्व नियम पाळून अवघ्या १०० वारकऱ्यांना वाखरी ते पंढरपूर हा केवळ सहा कि.मी.चा प्रवास संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत करण्यास परवानगी द्यावी', असे आर्जव करत वारकऱ्यांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

https://ift.tt/3fcy07h
June 30, 2020 at 08:54AM

काश्मीर: सुरक्षा दलांना मोठे यश; चकमकीत ३ दहशतवादी ठार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील जिल्ह्यात आज सोमवारी सकाळी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत झाले आहेत. ठार करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांनी एक एके रायफल आणि दोन पिस्तुली हस्तगत केल्या आहेत. हे दहशतवादी नेमक्या कोणत्या दहशतवादी संघटनेचे आहेत हे अद्याप कळू शकलेले नाही. सुरक्षा दलांनी अनंतनागमधील खुलचोहर या परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्याविरोधातील शोध मोहीम सुरू आहे. अनंतनागमधील खुलचोहर भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. या परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार करणे सुरू केले. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनीही प्रत्युत्तर देणे सुरू केले. या चकमकीत ३ दहशतवादी मारले गेले. मारले गेलेले हे दहशतवादी कोणत्या गटाचे आहेत याचा शोध घेणे सुरू आहे. या संपूर्ण परिसरात सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू आहे. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाचा: या पूर्वी काश्मीरमध्ये ठार करण्यात आलेल्या एका दहशतवाद्याच्या आईला रायफलसह फोटो काढणे आणि लोकांना दहशतवादी संघटनेत कथित भरती करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या व्यतिरिक्त पोलिसांनी कुलगाममध्ये सक्रिय असलेल्या एका दहशतवाद्याच्या बहिणीलाही दहशतवाद्यांना भरती करण्याच्या कथित सहभागामुळे अटक करण्यात आली आहे. वाचा: पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. दहशतवादी अब्बास शेख याची बहीण आणि ठार करण्यात आलेला दहशतवादी तौसीफ याची आई नसीमा बानो यांना २० जून या दिवशी अटक करण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. ही महिला युवकांना दहशतवादी संघटनेत भरती करण्याचे काम करत होती अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी माहिती देताना सांगितले. ही महिला आपल्या मुलासह हत्यारे चालवत असल्याचा एक फोटोही आढळला असल्याची माहितीही एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. त्यावेळी तिचा मुलगा सक्रिय दहशतवादी होता. वाचा:

https://ift.tt/3fcy07h
June 29, 2020 at 09:03AM

वाचा: ठळक बातम्या अगदी मोजक्या शब्दांत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. रविवारी एक दिवस इंधन दरवाढीला ब्रेक लागला होता. मात्र आज पुन्हा सोमवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहे. इंधन दरवाढीविरोधात आज काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईः मुंबईत अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना पश्चिम रेल्वेने दिलासा दिला आहे. पश्चिम रेल्वेने उद्यापासून लोकलच्या ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास आणि कामावार जाण्यास अधिक सोयीचं होणार आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा विरोध केल्याने पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी यावर संयत प्रतिक्रिया दिली आहे, मात्र भाजप अडचणीत आला की पवार मदतीला कसे काय धावून जातात, असा प्रश्न काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकजण विचारत आहेत.

https://ift.tt/3fcy07h
June 29, 2020 at 08:32AM

संसदेत चर्चेला या, दोन हात होऊन जाऊ द्या; अमित शहांचे राहुल गांधींना आव्हान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

नवी दिल्ली: लडाखच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री यांनी पलटवार केला आहे. आम्ही चर्चा करण्यासाठी घाबरत नाही. राहुल गांधी केव्हाही संसदेत येऊन आमच्याशी चर्चा करू शकतात. मात्र, जवान सीमेवर लढत असताना पाकिस्तानला आनंद होईल अशा प्रकारची वक्तव्ये करणे गैर असल्याचे शहा म्हणाले. राहुल गांधी यांनी भारत-चीन तणावाच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी ट्विट केले होते. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा उल्लेख सरेंडर मोदी असा केला होता. यावर अमित शहा यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, संसदेचे सत्र व्हायला हवे. चर्चा करायची असेल तर या आपण चर्चा करू. कोणीही चर्चेला घाबरत नाही. सन १९६२ पासून ते आतापर्यंतच्या स्थितीवर दोन हात होऊन जाऊ द्या. मात्र देशाचे जवान सीमेवर संघर्ष करत असताना, सरकार एक भूमिका घेऊन ठोस पावले उचलत असताना अशा परिस्थितीत अशा प्रकारे पाकिस्तानला आनंद होईल अशी वक्तव्ये करायला नको. अमित शहा पुढे म्हणाले की, केंद्र सरकार भारत विरोधी प्रचाराविरुद्ध लढण्यासाठी सक्षम आहे, मात्र इतक्या मोठ्या पक्षाचा एक माजी अध्यक्ष अशा प्रकारचे क्षुद्र राजकारण करतो हे पाहून दु:ख होते. वाचा: पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारत-चीन वादाबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते. नरेंद्र मोदी हे वास्तवात सरेंडर मोदी आहेत असे वक्तव्य राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडताना केले होते. या पूर्वी आणि नंतरही राहुल गांधी यांनी गलवान खोरे प्रकरणात सरकारला सतत प्रश्न विचारले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा रेडिओवरील कार्यक्रम सुरू होतानाही राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. राष्ट्राच्या रक्षणाची आणि संरक्षाची 'बात' कधी होईल, असा प्रश्न त्यांनी विचारला. आपल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी चीनला कडक संदेश दिला आहे. भारत मैत्री करणेही जाणतो आणि उत्तर देणेही जाणतो, असे मोदी म्हणाले. भारतमातेकडे डोळे वर करून पाहणाऱ्यांना उत्तर मिळाले आहे, असेही मोदी म्हणाले. वाचा: वाचा:

https://ift.tt/3fcy07h
June 28, 2020 at 01:42PM

मोदींच्या 'मन की बात'वर राहुल गांधी यांचा निशाणा, म्हणाले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी यांच्या '' कार्यक्रमावर टिप्पणी केली आहे. राष्ट्ररक्षण आणि सुरक्षेची 'बात' कधी होणार, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत विचारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी आपल्या 'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमात देशातील जनतेला संबोधित केले. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती. संपूर्ण देशाला सत्य काय आहे हे ऐकायचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते. देशात वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरूनही त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरले होते. मोदी सरकारने करोनाची साथ आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती अनलॉक केलेल्या आहेत, असे एका ट्विटमध्ये राहुल म्हणाले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकारला जोरदार हल्लाबोल करत ट्विटद्वारे विविध प्रश्न विचारत आहेत. लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक घटनेत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर सैनिकांच्या हौतात्म्यावर राहुल गांधी यांनी सतत प्रश्न विचारत आहेत. दरम्याच्या काळात त्यांनी शनिवारी पुन्हा करोना विषाणूच्या संसर्गाबाबत प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. करोनाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरताना केंद्र सरकारकडे करोनाशी दोन हात करण्यासाठी कोणतीही योजना नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. वाचा: करोना विषाणूचा संसर्ग तीव्र गतीने होत असून देशातील नव्या भागांमध्ये देखील हा संसर्ग पसरत चालला आहे. भारत सरकाकडे या साथीच्या आजारावर मात करण्यासाठी कोणतीही योजना नाही. पंतप्रधानांनी मौन धारण केले आहे. त्यांनी करोना साथीपुढे शरणागती पत्करली आहे आणि करोनाशी लढण्यास इन्कार केला आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या पाच लाखांहून अधिक झालेली असताना राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा: वाचा:

https://ift.tt/3fcy07h
June 28, 2020 at 12:48PM

मन की बात Live: थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी करणार संबोधित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

नवी दिल्लीः रविवारी रेडिओवर '' कार्यक्रमातून संवाद साधत आहेत. देशातील करोनाचे वाढते संकट आणि लॉकडाऊन दरम्यान मोदींनी अनेकदा देशाला संबोधित केलं. आता आज (रविवार) पंतप्रधान मोदी 'मन की बात' या मासिक कार्यक्रमातून पुन्हा जनतेशी संवाद साधत आहेत. 'मन की बात'चा त्यांचा हा ६६वा एपिसोड आहे. पाहुया, काय म्हणत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी... Live अपडेट्स... > पंतप्रधान मोदी यांचा आजचा रविवारचा 'मन की बात'चा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असल्याचे बोलले जातआहे. या कार्यक्रमात भारत-चीन तणावावर मोदी बोलतील, अशी शक्यता वर्तलण्यात येत आहे. > ३१ मे रोजी झालेल्या 'मन की बात' च्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी करोनापासून सुरक्षा करण्यासाठी कुठली काळजी घ्यावी, यावर सूचना केल्या होत्या. > 'मन की बात' च्या मागच्या दोन कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदींनी करोनाच्या प्रादुर्भावावर जनतेशी संवाद साधला होता. > पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे काही वेळातच जनतेशी संवाद साधत आहेत.

https://ift.tt/3fcy07h
June 28, 2020 at 10:51AM

YES Bank: सर्वोच्च न्यायालयानं वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

नवी दिल्ली : प्रकरणी डीएचएफएलचे प्रर्वतक () आणि () यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. सक्तवसुली संचालनालयाकडून (Enforcement Directorate) या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) १२ मे रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दोन्ही आरोपी चौकशीत सहकार्य करत नसल्याचं, उच्च न्यायालयानं यावेळी नमूद केलं होतं. या दोघांनी या आदेशाला आव्हान दिले होते. न्यायाधीश संजय किशन कौल आणि बी. आर. गवई यांच्या खंडपीठाला वाधवान यांच्या वतीने अॅड. मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांनी सुनावणी दरम्यान सांगितले की, ते या याचिकेतील विनंतीवर जोर देत नाहीत. यांनतर खंडपीठाने चारही याचिका फेटाळल्या. सध्या वाधवान बंधु सीबीआयनं दाखल केलेल्या एका वेगळ्या प्रकरणात अटकेत आहेत. 'दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याने त्यांचा अटकपूर्व जामिनासाठीची अर्ज निरर्थक ठरतो,' असे सक्तवसुली संचालनालयाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केले. त्यानंतर न्यायमूर्ती संजय किशन कौल (Justices Sanjay Kishan Kaul) आणि न्यायमूर्ती बी आर गवई (Justices BR Gavai) यांच्या पीठानं वाधवान बंधुंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. वाचा : वाचा : चौकशीची गरज कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा कट रचणं आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेचा छडा लावण्यासाठी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशीची गरज असल्याचं, अगोदर मुंबई उच्च न्यायालयानं जामीन याचिका फेटाळताना म्हटलं होतं. येस बँक घोटाळ्यात धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांना एप्रिल महिन्यात अटक करण्यात आली होती. या घोटाळ्याची सुरुवात जून २०१८ पासून सुरू झाली जेव्हा येस बँकेनं डीएचएफएलमध्ये ३७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली, असं सीबीआयनं आरोपपत्रात नमूद केलंय. या बदल्यात वाधवान बंधुंनी येस बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना 'डुइट अर्बन वेन्चर्स इंडिया प्रायवेट लिमिटेड'च्या नावावर ६०० कोटी रुपये दिले होते, असाही आरोप करण्यात आलाय. वाचा : वाचा :

June 27, 2020 at 09:22AM

'आत्मनिर्भर यूपी रोजगार' अभियानाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन; ५ लाख रोजगार मिळणार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

नवी दिल्ली: यांनी सरकारच्या स्वावलंबी यूपी अभियानाचे ऑनलाइन उद्घाटन केले. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या अभियानांतर्गत स्थलांतरित मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून या सोबतच या अभियानामुळे स्थानिक उद्योगांनाही चालना मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटद्वारे या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन केले. आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात ५ लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. या बरोबरच ५० लाख कामगारांना लघु तसेच मोठ्या उद्योगांमध्ये सामावून घेतले जाणार आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात विविध राज्यांमधून परत आलेल्या ३० लाख ४३ हजार स्थलांतरित मजुरांची कौशल्य चाचणी घेण्यात आली असून हे सर्व मजूर २४ लाख ७५ हजार कृषी कार्य, तसेच बांधकाम कार्याशी जोडले गेले होते, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील ३१ जिल्ह्यांमध्येच २५ हजारांहून अधिक परतले आहे. विशेषत: या अभियानांतर्गत या ३१ जिल्ह्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.


June 26, 2020 at 11:23AM

india-china clash: चीनची कुरघोडी सुरूच; 'वाय' नाल्याचा मार्ग केला ब्लॉक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

नवी दिल्ली: एकीकडे चीन भारतासोबत चर्चा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत असला तरी दुसरीकडे मात्र चीनी सैन्य करत असलेल्या वेगवेगळ्या कारवायांमुळे तणाव वाढत चालला आहे. भारताला पेट्रोल पॉइंट १४ (पीपी-१४) पर्यंत पोहोचणे कठीण व्हावे या दृष्टीने चीन चाली खेळत आहे. तर दुसरीकडे पूर्व लडाखमधील गावकऱ्यांनीही चीन खेळत असलेल्या या चालींबाबत माहिती दिली आहे. पँगाँग सरोवराजवळ चीनचे बांधकाम तीव्र गतीने सुरू असल्याचे गावकऱ्याचे म्हणणे आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, गलवान खोऱ्यात चीन करत असलेल्या बांधकामामुळे भारतीय सेनेला अनेक अडणींचा सामना करावा लागणार आहे. चीनने हे नवे बांधकाम गलवान आणि श्योक नदीच्या संगमावर केले आहे. पीपी-१४ पर्यंतचा रस्ता केला ब्लॉक चीनने हे बांधकाम अतिशय जलदगतीने केले आहे. या बांधकामांमध्ये सैनिकांसाठी राहण्याची व्यवस्था आणि इतर बांधकामांचा समावेश आहे. येथून पीपी-१४ पर्यंत पायी रस्ता जातो. या मोार्गावर अनेक दशकांपासून भारतीय सैनिक गस्त घालत आले आहेत. हा एक किमीचा रस्ता वापरणे चीनी सैनिकांना कठीण जाऊ नये यासाठी चीन हे बांधकाम करत असल्याचे स्पष्ट होत आहे. भारत आणि चीन दरम्यान अनेक ठिकाणांवरून आपले सैन्य मागे घेत असताना आता मात्र वाय नाल्याजवळ चीनी सैन्य बांधकाम करत आहे. रात्री स्पष्ट दिसते रस्ते निर्मितीचे काम चीनी सैनिक केवळ गलवानमध्येच नाही, तर पँगाँग सरोवराच्या आसपास फिंगर परिसरात देखील तैनात आहेत अशी माहिती गलवानच्या आसपास राहणाऱ्या गावकऱ्यांनी इकॉनॉमिक टाइम्सला माहिती देताना सांगितले आहे. आमच्या गावातून चीनी तळ आणि चीन करत असलेले बांधकाम आणि रस्ते निर्मितीचे काम रात्रीच्या वेळेस स्पष्टपणे दिसते असेही गावकऱ्यांनी माहिती देताना सांगितले. परिस्थिती सामान्य होण्यासाठी लागणार वेळ चीन एका ठिकाणाहून आपले सैन्य हटवून दुसरीकडे वळवत आहे. हे पाहता सीमेवरील परिस्थिती सामान्य होण्यासाठी काही कालावधी लागेल, असे सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवून असणाऱ्या सूत्रांनी माहिती देताना सांगितले. पँगाँग सरोवराजवळूनही चीनने आपले सैनिक अजूनही मागे हटवलेले नाही. कल्ल्त, मान आणि मरकच्या लोकांनी चीनी सैनिकांना नावांमध्ये बसून फिंगर-४ भागात येताना पाहिलेले असल्याचा दावा पूर्व लडाखचे भाजपचे नगरसेवक ताशी नामग्याल यांनी केला आहे.

https://ift.tt/3fcy07h
June 26, 2020 at 10:08AM

काश्मीर: सोपोरमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार; इंटरनेट सेवा बंद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या सोपोर भागात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीदरम्यान आतापर्यंत झाले आहेत. सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे. या भागात २ ते ३ दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांलना मिळाली आहे. सोपोर पोलिस, २२ आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या पूर्वी २३ जून या दिवशी पुलवामा येथील बांदजू भागात सुरक्षा दलांनी संयुक्त मोहिमेअंतर्गत २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या चकमकीदरम्यान सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला होता. या चकमकीत २ दहशतवादी ठार झाल्याची माहिती काश्मीर परिमंडळाचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली होती. पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने बांदजूमध्ये शोध मोहीम हाती घेतली होती. या बरोबरच, २१ जून या दिवशी जम्मू काश्मीरच्या कुलगाम आणि श्रीनगरमध्ये वेगवेगळ्या चकमकीत एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह एकूण ४ दहशतवादी ठार झाले होते. श्रीनगरच्या जादिबल भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. या वेळी सुरक्षदलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. वाचा: या दहशतवाद्यांचे नातेवाईक आणि समुदयाकडून ते शरण यावेत यासाठीही प्रयत्न केले गेले. मात्र, शरण येण्याऐवजी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवरही अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षादलांनी प्रत्युत्तर देताना गोळीबार सुरू केला आणि यात एकून तीन दहशतवादी ठार झाले. त्यानंतर या दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. वाचा: गेल्या शनिवारी संध्याकाळी देखील कुलगाममध्ये सुरक्षादलांसोबत झालेल्या चकमकीत १ दहशतवादी मारला गेला. तैयब वहीद उर्फ इम्रान भाई अशी या मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्यात आली. तो गाजी बाबा या नावानेही ओळखला जात होता. तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तानी दहशतवादी होता. वाचा:

https://ift.tt/3fcy07h
June 25, 2020 at 09:35AM