काश्मीर: सुरक्षा दलांना मोठे यश; चकमकीत ३ दहशतवादी ठार

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील जिल्ह्यात आज सोमवारी सकाळी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत झाले आहेत. ठार करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांनी एक एके रायफल आणि दोन पिस्तुली हस्तगत केल्या आहेत. हे दहशतवादी नेमक्या कोणत्या दहशतवादी संघटनेचे आहेत हे अद्याप कळू शकलेले नाही. सुरक्षा दलांनी अनंतनागमधील खुलचोहर या परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्याविरोधातील शोध मोहीम सुरू आहे. अनंतनागमधील खुलचोहर भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. या परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार करणे सुरू केले. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनीही प्रत्युत्तर देणे सुरू केले. या चकमकीत ३ दहशतवादी मारले गेले. मारले गेलेले हे दहशतवादी कोणत्या गटाचे आहेत याचा शोध घेणे सुरू आहे. या संपूर्ण परिसरात सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू आहे. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाचा: या पूर्वी काश्मीरमध्ये ठार करण्यात आलेल्या एका दहशतवाद्याच्या आईला रायफलसह फोटो काढणे आणि लोकांना दहशतवादी संघटनेत कथित भरती करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या व्यतिरिक्त पोलिसांनी कुलगाममध्ये सक्रिय असलेल्या एका दहशतवाद्याच्या बहिणीलाही दहशतवाद्यांना भरती करण्याच्या कथित सहभागामुळे अटक करण्यात आली आहे. वाचा: पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. दहशतवादी अब्बास शेख याची बहीण आणि ठार करण्यात आलेला दहशतवादी तौसीफ याची आई नसीमा बानो यांना २० जून या दिवशी अटक करण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. ही महिला युवकांना दहशतवादी संघटनेत भरती करण्याचे काम करत होती अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी माहिती देताना सांगितले. ही महिला आपल्या मुलासह हत्यारे चालवत असल्याचा एक फोटोही आढळला असल्याची माहितीही एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. त्यावेळी तिचा मुलगा सक्रिय दहशतवादी होता. वाचा:
https://ift.tt/3fcy07h
June 29, 2020 at 09:03AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा