N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

'पुढच्या पिढ्यांचा विचार करा, राज्यात फटाक्यांवर बंदी आणा'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
अहमदनगर: अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या फटाक्यांवर बंदी आणावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पर्यायवरण मंत्री यांच्याकडे केली आहे. यामुळे सध्या काही घटकांचे नुकसान होणार असले तरी पुढील पिढ्यांचा विचार करून ही बंदी आणली पाहिजे, असे तांबे यांनी म्हटले आहे. ( demands ban on ) दिवाळी जवळ आल्याने सध्या फटक्यांवरील बंदीची चर्चा सुरू आहे. दरवर्षीची फटाक्यांवरील बंदीची अशीच चर्चा होते. यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर ती जोरकसपणे केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही फटाक्यांचा वापर मर्यादित करावा, असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. त्यानंतर आता तांबे यांनी थेट बंदीचीच मागणी केली आहे. वाचा: तांबे यांनी म्हटले आहे की, ‘दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तेथील राज्य सरकारांनी फटाक्यांवर बंदीचा निर्णय घेतला आहे. खरे पाहिले तर फटक्यांमुळे आवाज, हवा यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना माझी विनंती आहे की, आपल्या राज्यातही जास्त धूर सोडणारे आणि मोठा आवाज करणाऱ्या फटक्यांवर कायमची बंदी आणली पाहिजे. या व्यावसायात मोठ्या प्रमाणावर व्यापारीवर्ग अवलंबून आहे. त्यांनी यावर्षीही मोठ्या प्रमाणावर माल घेतला आहे. मात्र, मित्रांनो पुढच्या सात पिढ्यांचा विचार करून आता थोडे नुकसान झाले तरी चालेले. मात्र, येणाऱ्या पिढ्यांसाठी फटाक्यांवर बंदी आलीच पाहिजे.’ दरवर्षी शाळा महाविद्यालयांतून आणि विविध सामाजिक संस्थांमार्फत फटाक्यांविरूद्ध प्रबोधन मोहीम राबविली जाते. त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. यावर्षी मात्र करोनाच्या संकटामुळे या मोहिमेला अधिक जोर आल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आता राजकीय क्षेत्रातील मंडळीही यामध्ये सहभागी होत आहे. मात्र, करोनाचे संकट असले तरी यावर्षीही फटाके विक्रेत्यांना पूर्वीच परवाने देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदीही झाली असून विक्रीलाही सुरवात झाली आहे. वाचा:

https://ift.tt/3fau8np
November 06, 2020 at 10:30AM

Ahmednagar : गुटखा घेण्याच्या बहाण्याने दुकानात आला अन् सोनसाखळी घेऊन गेला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
म. टा. प्रतिनिधी, नगर : किराणा दुकानामध्ये गुटखा घेण्याच्या बहाण्याने आलेल्या अनोळखी व्यक्तीने दुकानाच्या काउंटरवर ठेवलेली सोन्याची साखळी चोरून पोबारा केला. येथील बसस्थानक परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी काल, बुधवारी रात्री अकराच्या सुमारास तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावेडी बसस्थानकाच्या पाठीमागे अंजली दिलीप आव्हाड यांचे किराणा दुकान आहे. काल, बुधवारी सकाळच्या सुमारास त्या दुकानात होत्या. यावेळी त्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याची साखळी केसामध्ये अडकत असल्यामुळे ती गळ्यातून काढून दुकानाच्या काउंटरवर ठेवली. याचवेळी दुकानामध्ये एक अनोळखी व्यक्ती आली. त्याने आव्हाड यांना ‘गुटखा आहे का’, असे विचारले. त्यावर आव्हाड यांनी ‘गुटखा नाही’, असे सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने पाच रुपयांची शॅम्पूची पुडी घेतली आणि त्याबद्दल्यात त्याने दहा रुपये आव्हाड यांना दिले. उर्वरीत पाच रुपये परत घेत असतानाच संबंधित व्यक्तीने आव्हाड यांची नजर चुकवून काऊंटरवर ठेवलेली सोन्याची साखळी चोरली आणि तो तेथून पसार झाला. काउंटरवर ठेवलेली सोन्याची साखळी चोरीला गेल्याचे लक्षात येताच आव्हाड यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी सोनसाखळी चोरीला गेल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल गाजरे पुढील तपास करीत आहेत.

https://ift.tt/3fau8np
November 05, 2020 at 12:42PM

गोस्वामी भाजपचे लाउडस्पीकर असतील; अमित शहा यांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारणही तापले आहे. अर्णब यांची अटक म्हणजे राज्यातील अघोषित आणीबीणी असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अर्णब यांच्या अटकेचा निषेध केला होता. यावरून शिवसेना नेते यांनी भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अर्बण गोस्वामी यांच्या अटकेनंतर अमित शहा यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला होता. तसंच, काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीची लाज काढली. ही घटना आणीबाणीची आठवण करून देते, अशी टीका सत्ताधारी महाविकास आघाडीवर केली होती. अमित शहा यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना अर्णब गोस्वामी त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते पक्षाची बाजू मांडत आहेत, असा टोला लगावला आहे. 'सामना जसं शिवसेनेचं मुखपत्र आहे तसं ते त्यांचं चॅनेल. तो कदाचित भाजपचा लाऊडस्पीकर असेल. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी ते उतरले असतील. पण त्याने कोणत्या प्रकारचा गुन्हा केलेला आहे आणि पोलीस कारवाई का करत आहे हे समजून घेणं गरजेचं होतं,' असं राऊत यांनी म्हटलं आहे. वाचाः 'पत्रकार म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांनी कोणाला तरी हक्काचे पैसे दिले नाहीत. त्यांच्यामुळं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि त्यातून अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली. आत्महत्या कोणामुळं केली हे लिहून ठेवलं आहे. सुशांतसिंह प्रकरणात नव्हतं. पण त्या प्रकरणात वेगळी भूमिका घेण्यात आली आणि या प्रकरणी राज्य आणि केंद्रातील भाजपची भूमिका वेगळी आहे,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. वाचाः वाचाः

https://ift.tt/3fau8np
November 05, 2020 at 12:44PM

खोपोलीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; महिलेचा मृत्यू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
तालुक्यातील परिसरातील कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. स्फोटाच्या हादऱ्याने पडझड होऊन एका महिलेचा मृत्यू आहे, तर चार सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. आर्कोस इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये रात्री अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जसनोव्हा कंपनीच्या केमिकल रिअॅक्टरमध्ये अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की दोन ते तीन किलोमीटरच्या परिसराला हादरे बसले. या हादऱ्याने शेजारच्या कंपन्यांचे छत कोसळून त्यात एका सुरक्षारक्षकाच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं आहे. स्फोटात जसनोव्हा कंपनीबरोबरच एसएस पेपर ट्यूब, पेन ट्यूब या कंपन्यांचंही प्रचंड नुकसान झालं आहे. स्फोटाची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व आसपासच्या कंपन्यांतील कामगारांना सुरक्षितस्थळी हलवले. जखमींना खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आणखी वाचा:

https://ift.tt/3fau8np
November 05, 2020 at 08:55AM

'भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मौज वाटते'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे मालक, संपादक यांना झालेल्या अटकेरून महाराष्ट्र सरकारवर आणीबाणी लादल्याचे व हुकूमशाहीचे आरोप करणाऱ्या भाजपचा शिवसेनेनं आज जोरदार समाचार घेतला आहे. 'अर्णब गोस्वामी यांस एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे. त्यांच्या अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही. गोस्वामी म्हणजे कुणी टिळक-आगरकर नाहीत. त्यामुळं एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा. तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील,' असा बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे. (Shiv Sena slams BJP in ) अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर मुंबईपासून दिल्लीपर्यंतचे भाजपचे नेते ठाकरे सरकारवर अक्षरश: तुटून पडले आहेत. केंद्रीय गृहमंत्री यांनीही हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, सरकारविरोधात मोर्चे काढा, उपोषणं करा, आंदोलनं करा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. भाजपच्या या भूमिकेवर 'सामना'च्या अग्रलेखातून आसूड ओढण्यात आले आहेत. अग्रलेखातील ठळक मुद्दे: महाराष्ट्रात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची आवई भाजपच्या महाराष्ट्रातील लोकांनी उठवली आहे. त्यांच्या जोडीला दिल्ली सरकारमधील अनुभवी शहाणेही सामील व्हावेत हे आश्चर्यच आहे. सीतेवर आरोप होताच श्रीरामानेही सीतेवर अग्निपरीक्षेची वेळ आणली. ते तर रामराज्य होते. सीतेची अग्निपरीक्षा म्हणजे आजच्या बेगडी रामभक्तांना आणीबाणी किंवा श्रीरामाची हुकूमशाही वाटली काय? कधीकाळी ‘काँग्रेस’ गवत हे अगदी निरुपयोगी उत्पादन म्हटले जात असे. ते केवळ निरुपयोगीच नव्हे तर चांगलेच उपद्रवी असल्याचे मत तेव्हाच्या राजकीय विरोधकांकडून व्यक्त केले जात होते. त्याच गवताचा काढा करून सध्याचे भाजपवाले दिवसातून दोन वेळा पीत असावेत असे त्यांचे वर्तन आहे. अर्णब गोस्वामी व त्यांची वृत्तवाहिनी कोणत्या प्रकारची पत्रकारिता करते? व त्यांच्या बरळण्यामागे कोणाची फूस आहे हे जगजाहीर आहे. सोप्या भाषेत ज्यास सुपारी पत्रकारिता म्हणावे तोच प्रकार आहे. गोस्वामी यांनी टिळक-आगरकरांप्रमाणे सरकारविरोधात जहाल लिखाण केले. त्यामुळे सरकारने त्यांची गचांडी पकडली असे काही हे प्रकरण नाही. गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर प्रमुख नेत्यांच्याबाबत गरळ ओकली म्हणून त्यास अटक झालेली नाही. त्याचा संबंध एका मृत्यू प्रकरणाशी जोडला आहे व मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून ही कारवाई आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला वगैरे अजिबात नाही. वाचा: गुजरातमध्ये सरकारविरोधी लिहिणाऱ्या संपादकांना अटका झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात पत्रकारांचे मुडदे पाडले गेले तेव्हा कोणाला आणीबाणीची आठवण का झाली नाही? महाराष्ट्राच्या भाजपवाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत. पण भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागली आहे. मराठी माणूस मेला तरी चालेल, पण सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे असे त्यांचे धोरण स्पष्ट आहे. आणीबाणीचा काळ ज्यांनी अनुभवला आहे त्यातले एक लालकृष्ण आडवाणी हयात आहेत व आणीबाणी काय होती हे सध्याच्या नवशिक्यांनी त्यांच्याकडून समजून घेतले पाहिजे. कायद्यापुढे सगळे समान आहेत. वाचा: कायद्याने पंतप्रधान इंदिराजी, नरसिंह राव यांनाही सोडले नाही. अनेक मंत्र्यांना गजाआड जावे लागले. कायद्याच्या कारवाईला सामोरे जाऊन अमित शहादेखील तावून सुलाखून बाहेर पडले आहेत. एका निरपराध माणसाची आत्महत्या त्यांच्या वृद्ध आईसह झाली. त्यांची पत्नी न्यायासाठी आक्रोश करीत आहे. पोलिसांनी कायद्याचे पालन केले. यात चौथा स्तंभ कोसळला असे सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखडू पाहत आहेत. एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा! तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील! वाचा:

https://ift.tt/3fau8np
November 05, 2020 at 08:34AM

औरंगाबाद: भरदिवसा गोळीबार, तरुणाचे फिल्मीस्टाइल अपहरण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
म. टा. प्रतिनिधी, : शहानूर मियाँ दर्गाहजवळील रेल्वे रूळाच्या पलीकडे असलेल्या पीडब्ल्यूडी कॉलनी येथून एका बांधकाम ठेकेदाराच्या २८ वर्षीय भावाचे काही जणांनी केले. पिस्तुलातून गोळीबार करून तरुणाचे अपहरण केले. ही घटना बुधवारी (४ नोव्हेंबर) घडली. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात दहशत निर्माण झाली होती. अपहरण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव नाझीम पठाण (वय २८, रा. हुसैन कॉलनी) असे आहे. या प्रकरणात काही प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडब्ल्यूडी कॉलनी येथे मदन अवधुत भोसले यांच्या घराचे काम सुरू होते. या घराचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचा भाऊ नाजीम रऊफ पठाण हा कामगारांसोबत काम सुरू करत होता. साडेअकरा वाजताच्या सुमारास कॉलनीमध्ये प्रवेश करणाऱ्या मोकळ्या जागेवर एक कार येऊन थांबली. या कारमधून दोन जण खाली उतरले. त्यांच्या तोंडावर मास्क लावलेले होते. नाजीम या लोकांना भेटण्यासाठी कारपर्यंत गेला. एका मास्क लावलेल्या व्यक्तीने पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. तसेच काही समजण्याच्या आत नाजीमला कारमध्ये जबरदस्ती बसवले. काही क्षणांतच ही कार कॉलनीतून मुख्य रस्त्याकडे वेगाने नेली. या घटनेची माहिती सातारा पोलिसांना मिळताच, सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुरेंद्र माळाळे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. या अपहरण प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यातील दोन पथके स्थापन करण्यात आली. या प्रकरणात नाजीम पठाण याचा भाऊ वसीम रऊफ पठाण याच्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भालगावला संशयित वाहन असल्याची मिळाली माहिती या अपहरण प्रकरणात सातारा पोलिसांनी ज्या कारमधून अपहरण झाले, त्या कारचे लोकेशन तपासले. ही कार भालगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर एक पथक भालगावकडे पाठवण्यात आले. पैशांच्या वादातून अपहरण या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अपहरण पैशांच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नाजीम पठाण याच्या ओळखीच्याच लोकांनी त्याचे अपहरण केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारमधील डिझेल संपल्याने वाचले प्राण दरम्यान, धुळे महामार्गावर चित्ते पिंपळगाव येथे अपहरणकर्त्यांच्या कारमधील डिझेल संपले. डिझेल संपल्यानंतर अपहरणकर्त्यांनी तरुणाच्या पायावर गोळी झाडली. त्यानंतर चौघे जण पसार झाले. पोलीस चित्ते पिंपळगाव येथे पोहोचले. त्यांनी तरुणाला जखमी अवस्थेत घाटी रूग्णालयात दाखल केले आहे.

https://ift.tt/3fau8np
November 04, 2020 at 03:58PM

पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णब यांचा आरोप; खरं काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक यांच्यावर आज रायगड पोलिसांनी राहत्या घरातून अटकेची कारवाई केली आहे. यावेळी अर्णब यांनी कारवाईदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. अर्णब यांच्या आरोपावर पोलिसांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अर्णब गोस्वामीनं पैसे थकवल्याचा आरोप करत अलिबाग येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच प्रकरणी रायगड पोलिसांनी आज अर्णब यांच्यावर कारवाई केली आहे. आज कारवाई करते दोन पोलिसांकडून मारहाण झाली शिवाय कुटुंबातील सदस्यांना व मुलालाही मारहाण केली, असा आरोप अर्णब यांनी केला आहे. अर्णब यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती तिथे बांधलेली पट्टी देखील पोलिसांकढून काढण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या हाताला व पाठीत देखील मारलं आहे, अशी माहिती अर्णब गोस्वामी यांचे वकिल गौरव पारकर यांनी दिली आहे. तसंच, अर्णब यांच्या अटकेबद्दलची माहिती पत्नीला देखील दिली गेली नव्हती, असंही त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांचे स्पष्टीकरण दरम्यान, पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यापासून सर्व घटनांचे चित्रीकरण केले आहे. अटकेची कारवाई करतेवेळी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत, न्यायालयाने जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अहवाल मागितला आहे.

https://ift.tt/3fau8np
November 04, 2020 at 03:38PM

अर्णब गोस्वामींमुळेच आधीच्या सरकारने हे प्रकरण दाबले; नाईक कुटुंबीयांचा आरोप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक यांना अटक करण्यात आल्यानंतर नाईक यांच्या पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञा यांनी पत्रकार परिषद घेतली. अर्णब यांच्यावरील अटकेच्या कारवाईचे स्वागत केले. अर्णब गोस्वामींमुळेच मागील सरकारने हे प्रकरण दाबले, असा आरोप नाईक कुटुंबीयांनी केला. अन्वय नाईक यांनी २०१८ मध्ये त्यांच्या घरी आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना आज, बुधवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यामुळे नाईक यांच्या पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञा यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले. २०१८मधील तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही, असे अक्षता म्हणाल्या. यावेळी त्यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचे नाव असूनही कारवाई का केली नव्हती, असा सवाल मुलगी आज्ञाने उपस्थित केला. आमचे फोन टॅप केले जात होते. आम्हाला धमक्या दिल्या जात होत्या, असेही त्यांनी सांगितले. अर्णब यांच्यामुळेच मागील सरकारने हे प्रकरण दाबले असा आरोप नाईक कुटुंबीयांनी केला. आमच्यावर दबाव या प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी वऱ्हाडे यांनी हे प्रकरण मागे घेण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला असा गंभीर आरोप करतानाच, आम्हाला मराठी वाचता येत नाही, असा समज करून त्यांनी चुकीच्या कागदपत्रांवर सही करून घेण्याचा प्रयत्न केला, असेही नाईक कुटुंबीयांनी सांगितले. ही तक्रार मागे घेण्यासंदर्भातील ते कागदपत्र होते. शिवाय आम्ही सूडबुद्धीने तक्रार दाखल केली आहे, असा उल्लेख त्यात केला होता. मात्र, आम्ही त्यावर आवाज उठवला, असेही त्यांनी सांगितले. अर्णब गोस्वामींना एवढं महत्व का? २०१७ रोजी काम पूर्ण झाले होते. मात्र, पैसे मिळाले नव्हते. लोकांची देणी होती. त्यामुळे नैराश्येतून अन्वय नाईक यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती अक्षता नाईक यांनी दिली. अर्णब गोस्वामी यांच्याकडून अद्याप ८३ लाख रुपये येणे बाकी आहेत, असे सांगतानाच अन्य आरोपी फिरोज शेख आणि सारडा यांनाही पैसे देऊ नका असे गोस्वामींनी सांगितल्याचा आरोप त्यांनी केला. गोस्वामींना भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले. पाच मिनिटे वेळ द्या अशी विनंतीही केली. मात्र, त्यांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही. या प्रकरणात आम्ही तत्कालीन आयुक्त संजय बर्वे यांचीही भेट घेतली होती. तसेच रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याही अनेकदा भेटी घेतल्या. तपास सुरू असल्याचे वारंवार सांगण्यात आले. पण त्यात कुठलीही प्रगती झाली नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. या प्रकरणात गोस्वामी यांचा जबाब अलिबाग पोलीस ठाण्यात जाऊन नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांचा जबाब जॉइंट सीपींच्या कार्यालयात जाऊन नोंदवला आहे. एवढं महत्व आरोपीला का देण्यात येत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

https://ift.tt/3fau8np
November 04, 2020 at 02:23PM

गोस्वामी भाजपचा कार्यकर्ता आहे का? शिवसेनेचा सवाल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी अन्वय नाईक नावाच्या एका व्यवसायिकाचे पैसे बुडवले. त्यामुळे नाईक यांनी आर्थिक विंवचनेतून आत्महत्या केली. म्हणून गोस्वामींना अटक झाली आहे, असं नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. भाजप नेते त्यांच्या कार्यकर्त्याविरोधात कारवाई झाल्यासारखे ओरडताहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. अर्णब गोस्वामींनी नाईक यांचे पैसे बुडवले. त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक समस्येतून त्यांनी आत्महत्या केली. एका मराठी भगिनीचं कुंकू गोस्वामींमुळे पुसलं गेलं. या प्रकरणाचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी कोणताही संबंध नाही. मग भाजप नेते गोस्वामींच्या अटकेवरून इतका आरडाओरडा कशासाठी करताहेत? गोस्वामी काय भाजपचा कार्यकर्ता आहे का?, असे प्रश्न परब यांनी विचारले आहेत. अन्वय नाईक यांनी गोस्वामी यांच्यामुळे आत्महत्या केली. भाजप नेते अशा गोस्वामींच्या बाजूनं आहेत का? असतील तर तसं त्यांनी जाहीर करावं, असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले. गोस्वामी यांच्या अटकेवरून ठाकरे सरकारला लक्ष्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. आम्ही सुडाचं राजकारण करत नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 'महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. इथे बदल्याच्या भावनेनं कारवाई होत नाही. कोणीही कायद्याचं उल्लंघन केल्यास पोलीस त्याच्याविरोधात कारवाई करतील,' असं राऊत म्हणाले. पोलिसांकडे सबळ पुरावे असतील, त्यामुळेच त्यांनी कारवाई केली असेल, असंही त्यांनी म्हटलं.

https://ift.tt/3fau8np
November 04, 2020 at 02:22PM

अर्णब गोस्वामींमुळे माझ्या पतीने आत्महत्या केली; अन्वय नाईक यांच्या पत्नीचा आरोप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबईः 'आजच्या दिवसासाठी मी महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानते. यांनी सुसाइट नोटमध्ये तीन जणांची नाव लिहून ठेवली होती. तरीदेखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. आज महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. महाराष्ट्र पोलिसांच्या या कार्याला मी मनापासून सलाम करते,' अशी प्रतिक्रिया अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी दिली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर नाईक कुटुंबीयांनी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होत. त्यादरम्यान त्या बोलत होत्या. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी अर्णब गोस्वामी यांच्यामुळेचं नाईक यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. वाचा: 'माझ्या वडिलांनी आणि आजीने ५ मे २०१८रोजी आत्महत्या केली. माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्वण गोस्वामी यांचं नाव आहे, तसंच, फिरोज शेख, नितीश सार्डा या तिघांचीही नावं आहेत तरीही कारवाई का केली गेली नाही? सुशांत सिंह प्रकरणात अर्णब गोस्वामी यांनी आवाज उठवला. त्या प्रकरणात तर कोणतीही सुसाईड नोट नव्हती. परंतु माझ्या बाबांच्या सुसाईड नोटमध्ये नाव असूनही कोणतीही कारवाई झाली नाही,अर्णब गोस्वामी यांच्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला,' असा आरोप अन्वय नाईक यांच्या कन्या अज्ञा नाईक यांनी केला आहे. 'अर्णब यांनी सूडबुद्धीने हे सर्व केलं आहे. माझ्या पतीला पैसे मिळाले असते तर ते आज जिवंत असते. रिपब्लिकने आमचे ८३ लाख रुपये थकवले आहेत. इतर कंपन्यांकडून ही देणं बाकी होतं. पण अर्णबनं इतरांनाही आमच्याविरोधात भडकावलं. त्यांनाही आमचे पैसे देऊ नका असं सांगण्यात आलं. त्यामुळं आमचे कामगार सोडून चालले होते. इतर कामंही मिळत नव्हती. आम्ही अनेकदा त्यांना विनंती केली,' असं अक्षता नाईक यांनी म्हटलं आहे. 'अर्णबमुळेचं माझ्या वडिलांनी आत्महत्येचं पाऊलं उचललं आहे. रिपब्लिक स्टुडिओ हा त्यांचा शेवटचा प्रोजेक्ट होता. प्रोजेक्टनंतर त्यांना त्यांची देय रक्कम देण्यात आली नाही. आम्ही वारंवार त्यांच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केली पण, तरीही आम्हाला पैसे देण्यात आले नाही. आम्ही स्टुडिओमध्येही जाऊन अर्णबला भेटण्याची परवानगी मागितली पण तेव्हाही आम्हाला त्याला भेटून देण्यात आलं नाही, असा आरोप अन्वय यांच्या पत्नी आणि मुलींनं केला आहे. अर्णव गोस्वामी यांचा जबाब अलिबाग पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्याचं खोटं सांगण्यात येत आहे. पण गोस्वामी यांचा जबाब पोलीस उपमहासंचालकांच्या कार्यालयात नोंदवण्यात आला. अर्णव गोस्वामीला व्हिआयपी ट्रिटमेंट का? आम्ही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवली होती, असंही अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी सांगितलं आहे. तसंच, त्यांनी तात्कालीन पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

https://ift.tt/3fau8np
November 04, 2020 at 01:45PM

लोकशाहीची गळचेपी करणारी घटना; राज्य सरकारविरोधात मोर्चा काढा; भाजपचं कार्यकर्त्यांना आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक यांना बुधवारी अलिबाग पोलिसांनी अटक केली. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील भाजपचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. केंद्रीय नेत्यांबरोबर महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनीही पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनीही ट्विट करत ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तसंच, भाजपा कार्यकर्त्यांना आंदोलनं, उपोषण, मोर्चा आणि सोशल मीडियावर राज्य सरकारविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे. 'भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकवता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणी जी केस २०१८ सालीच बंद झाली होती. ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे. वाचा: 'मी महाराष्ट्रातील जनतेला आणि आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण आपल्या पद्धतीने राज्य सरकारचा आंदोलन करून विरोध करा – उपोषण करा, सरकारी कामकाजात असहयोग दाखवा, सोशल मीडियावर आवाज उठवा, मोर्चा काढा. काँग्रेस सोबत राहून या सरकारला वाटत आहे की, हे महाराष्ट्रात हुकूमशाही पद्धत लागू करू शकतात.. महाराष्ट्र हे कधीच होऊ देणार नाही,' असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 'आजच्या पिढीला देखील इंदिरा गांधीजींच्या आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी मी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो. त्यावेळी देखील जनतेने सरकारला संविधानाच्या विरुद्ध कारवाई करताना थांबविले होते, आता देखील थांबवणार !', असं त्यांनी म्हटलं आहे.

https://ift.tt/3fau8np
November 04, 2020 at 12:37PM

Ahmednagar: माशाचे कालवण करण्यास नकार दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
म. टा. प्रतिनिधी, नगर: माशाचे कालवण करण्यास नकार देणाऱ्या पत्नीचा तिच्या पतीने खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील कुक्कडवेढ परिसरात घडली आहे. गंगाबाई बद्री चव्हाण (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. २ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी काल, मंगळवारी उशिरा राहुरी पोलीस ठाण्यात बद्री चव्हाण (रा. कुक्कडवेढ, ता.राहुरी) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बद्री चव्हाण याने २ नोव्हेंबरला त्याची पत्नी गंगाबाई हिला माशाचे कालवण करण्यास सांगितले. मात्र, सोमवार असल्यामुळे गंगाबाई यांनी माशाचे कालवण करणार नसल्याचे सांगितले. भाजी करण्यास नकार देताच बद्री चव्हाण याने गंगाबाई यांना कुक्कडवेढ येथील कॅनोलच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ नेले. तेथे गंगाबाई यांना मारहाण केली. त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात गंगाबाई यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दरम्यान, या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा पृथ्वीराज याने पोलिसांत तक्रार दिली असून, त्यावरून राहुरी पोलीस ठाण्यात बद्री चव्हाण याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल करीत आहेत.

https://ift.tt/3fau8np
November 04, 2020 at 12:21PM

अर्णब गोस्वामी, रिपब्लिक टीव्हीविरोधात मुंबईत 'या' प्रकरणांत गुन्हे; जाणून घ्या!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक आणि रिपब्लिक टीव्हीविरोधात मुंबईत अनेक गुन्हे दाखल आहेत. नेमके ती प्रकरणे कोणती आहेत, हे जाणून घेऊयात. अर्णब गोस्वामींविरोधात 'चॅप्टर' प्रक्रिया टीआरपी घोटाळ्यामध्ये रिपब्लिक वाहिनीचे नाव आले असतानाच, दुसरीकडे पोलिसांनी 'चॅप्टर' प्रक्रिया सुरू केल्याने संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लॉकडाउन कालावधीत रिपब्लिक वाहिनीवरील 'पुछता है भारत' या कार्यक्रमात तसेच चर्चासत्रामध्ये दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्यामुळे गोस्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. गोस्वामी यांना अटक टाळण्यासाठी प्रक्षोभक वक्तव्य करणार नसल्याचे लेखी बंधपत्र द्यावे लागणार असून, जामीन म्हणून दहा लाख रुपये भरावे लागणार आहेत. या प्रकरणात दोनदा अर्णबचे वकील पोलिसांना सामोरे गेले. रिपब्लिक टीव्हीविरोधात गुन्हा अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीच्या अडचणींत आता आणखी भर पडली आहे. दलात असंतोष असून, पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे आदेश कुणीही पाळत नाही, असे वृत्त प्रसारित केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अँकरसह सहा जणांविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांचे जबाब नोंदविण्यात आले. दोन समुदायात तेढ निर्माण केल्याप्रकणी गुन्हा रिपब्लिक भारत या वाहिनीवर २१ एप्रिल रोजी पालघर येथे झालेल्या दोन साधूंच्या हत्येच्या बातमीच्या अनुषंगाने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात बोलताना अर्णब गोस्वामी यांनी हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केली. यासंदर्भात त्यांच्या विरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला. पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा १४ एप्रिल रोजी केलेल्या वार्तांकनामध्ये वांद्रे स्थानकावर जमलेल्या गर्दीचा संबंध मस्जिदशी जोडण्यात आला. या प्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. टीआरपी घोटाळा पैसे देऊन कृत्रिमरित्या टीआरपी वाढविण्याचा घोटाळ्यात इतर वाहिन्यांबरोबर रिपब्लिक वाहिनीचे नावही समोर आले आहे. आरोपींनी रिपब्लिककडून पैसे घेतल्याचे कबूल केले असल्याचे गुन्हे शाखेने न्यायालयात सांगितले. रिपब्लिक वाहिनीतील अनेकांचे जबाब या प्रकरणात नोंदवण्यात आले; मात्र अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही.

https://ift.tt/3fau8np
November 04, 2020 at 11:54AM

Explained: अर्णब गोस्वामींना का झाली अटक? जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक यांना बुधवारी अलिबाग पोलिसांनी अटक केली. नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. गोस्वामी यांना अलिबागला घेऊन गेले आहेत. त्यांची चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. नेमकं काय आहे प्रकरण? इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक हे अलिबागमधील त्यांच्या बंगल्यात मृतावस्थेत आढळून आले होते. मे २०१८ मध्ये ही घटना घडली होती. अन्वय नाईक यांची मुंबईत कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड नावाची कंपनी होती. ते अलिबागजवळील कावीर येथील आपल्या घरी आले होते. त्यांनी तिथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांच्या आई कुमुद यांचा मृतदेह तळमजल्यावर सोफ्यावर आढळला होता. तर पहिल्या मजल्यावर अन्वय यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यांच्या नोकरांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. नाईक यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली होती. त्यात अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे सारडा आदींनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर अलिबाग पोलिसांनी या तिघांविरोधात नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. अर्णब गोस्वामींवर का दाखल केला होता एफआयआर? अन्वय नाईक यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली होती. त्यात अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे सारडा यांची नावे होती. त्यांनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे अन्वय यांनी मृत्यूपूर्वी नमूद केले होते. या कंपन्यांनी अनुक्रमे ८३ लाख, चार कोटी आणि ५५ लाख रुपये थकवल्याचे म्हटले होते. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीचं काय झालं? या प्रकरणाची रायगड पोलिसांनी चौकशी केली. यात अर्णब गोस्वामी आणि इतर संशयित आरोपींविरोधात ठोस पुरावे न सापडल्याने एप्रिल २०१९ मध्ये या प्रकरणाची चौकशी थांबवण्यात आली होती. तथापि, यावर्षी मे मध्ये अन्वय यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी विनंती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. रिपब्लिक टीव्हीने पैसे थकवल्याची चौकशी अलिबाग पोलिसांनी केली नाही, अशी तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर या प्रकरणाची नव्याने सीआयडी चौकशी करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले होते. या अटकेनंतर काय? गोस्वामींना या प्रकरणात अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी करण्यात येईल. अन्वय यांना सगळे पैसे दिल्याचा दावा गोस्वामी यांनी केला होता. त्यामुळे पैसे अदा केल्याचे पुरावे पुन्हा सादर करण्यास गोस्वामींना सांगितले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची चौकशी थांबवायची की आरोपपत्र दाखल करायचे हे आता पुढील चौकशीत काय निष्पन्न होते, यावर अवलंबून आहे.

https://ift.tt/3fau8np
November 04, 2020 at 11:34AM

'रिपब्लिक टीव्ही'चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: टीआरपी घोटाळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या 'रिपब्लिक टीव्ही' चॅनेलचे संपादक यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या मृत्यू प्रकरणात गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ( arrested in Suicide Abetment Case) अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडिओच्या इंटेरियर डिझाईनचे काम केले होते. त्यासाठी त्यांना अर्णब यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपये येणे होते. परंतु वारंवार बिल मागूनही गोस्वामी यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळं आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचं नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या तक्रारीनंतर अलिबाग पोलिसांनी ३०६ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वरळी येथील घरातून त्यांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं. अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा हिनं मे महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. रिपब्लिक टीव्हीने पैसे थकवल्याची चौकशी अलिबाग पोलिसांनी केलेली नाही, अशी तक्रार तिनं केली होती. त्यानंतर या प्रकरणाची नव्यानं सीआयडी चौकशी करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले होते. वाचा: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये येऊन जबाब नोंदवण्यासाठी अर्णब यांना पोलिसांनी अनेकदा नोटिस पाठवली होती. मात्र, मी पोलिसांशी अजिबात बोलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर आज पोलिसांनी थेट कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने कांदिवलीहून फिरोझ शेख आणि जोगेश्वरी येथून नितेश सारडा यांनाही अटक केली आहे. वाचा:

https://ift.tt/3fau8np
November 04, 2020 at 10:40AM

मेट्रो कारशेडला केंद्राचा आक्षेप; भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभारण्याच्या निर्णयाला केंद्राने आक्षेप घेतल्यानंतर आता भाजपनं राज्य सरकारला घेरण्याची संधी साधली आहे. या निमित्तानं भाजपचे आमदार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. 'मेट्रो प्रकल्पाला होत असलेल्या विलंबासाठी सर्वस्वी राज्य सरकार दोषी आहे,' असा आरोप शेलार यांनी केला आहे. (BJP targets CM over Metro Car Shed Row) गोरेगाव येथील आरे कॉलनीत कारशेड उभारण्यास विरोध झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारनं ही कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, केंद्राच्या उद्योग व व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) त्यास आक्षेप घेत कारशेडचं काम थांबवण्याच्या सूचना राज्याला केल्या आहेत. तसं पत्रच सरकारला पाठवण्यात आलं आहे. त्यामुळं हा प्रकल्प आणखी रखडण्याची चिन्हे आहेत. भारतीय जनता पक्षानं याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. वाचा: 'मुख्यमंत्र्यांनी 'आरे'च्या ऐवजी कांजूरला मेट्रोची कारशेड नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच यात राज्य सरकारचा कुहेतू असल्याचं आम्ही म्हटलं होतं. अहंकारी राजा व विलासी राजपुत्रामुळं मुंबईकरांना त्रास होतोय, असं आम्ही म्हटलं होतं. कारशेडसाठी नवी जागा निश्चित करताना मिठागर आयुक्तांची परवानगी घेतली होती का? किंवा ती जागा नावावर करून घेतली होती का?,' अशी विचारणा आम्ही केली होती. मात्र, ती खबरदारी राज्य सरकारनं घेतली नव्हती हे आज केंद्राच्या पत्रामुळं आता स्पष्ट झालं आहे. अहंकारी प्रवृत्तीनं घेतलेल्या या निर्णयाचे दुष्परिणाम आता मुंबईकरांना भोगावे लागणार आहेत. मेट्रोच्या बाबतीत तर महाविकास आघाडीच्या सरकारची कार्यपद्धती तिघाडी प्रकारची आहे,' अशी टीका शेलार यांनी केली. वाचा: 'सुरुवातीला हा प्रकल्प लटकवण्याचा प्रयत्न झाला. त्यांनतर आता अडकवला गेला. जागेत बदल करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज होती, ते केलं गेलं नाही. त्यातून हा प्रकल्प अडकवला गेला. शिवाय, चुकीच्या गोष्टींची माहिती देऊन जनतेला भटकवलं गेलं. त्यामुळं मेट्रो प्रकल्पात उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे प्रकारातला आहे. मुंबईकरांच्या माथी दिरंगाई मुख्यमंत्र्यांनी थोपलीय. या संपूर्ण प्रकरणात पूर्णपणे राज्य सरकार दोषी आहे,' असा आरोप शेलार यांनी केला आहे. वाचा:

https://ift.tt/3fau8np
November 03, 2020 at 12:49PM

शेतकऱ्याकडून डाळिंब खरेदी केले; व्यापाऱ्याने दिलेला १५ लाखांचा चेक वटलाच नाही!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
म. टा. प्रतिनिधी, नगर: शेतकऱ्याकडून तब्बल १५ लाख ७२ हजार रुपयांचे डाळिंब घेऊन त्याचे पैसे न देता त्याची फसवणूक केल्याचा प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे. या प्रकरणी अकबर अल्लाउद्दीन तांबोळी (रा.पिंपळगाव केतकी रोड, ता.दिंडोरी, नाशिक) याच्या विरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात काल, सोमवारी उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेतकरी विजय ढौकचौळे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. शेतकरी विजय ढौकचौळे व इतर शेतकऱ्यांकडून आरोपी अकबर तांबोळी याने नोव्हेंबर २०१८ ते २ नोव्हेंबर २०२० या काळात वेळोवेळी १५ लाख ७२ हजार ७६५ रुपयांच्या डाळिंबाची खरेदी केली. त्याबद्दल्यात आरोपीने शेतकऱ्यांना ‘स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिंडोरी’ या बँकेचे धनादेश दिले. मात्र, हे धनादेश बँकेत वटले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आरोपीला संपर्क केला. तसेच आरोपीच्या घरी जाऊन त्याला डाळिंबाच्या पैशांची मागणी केली. परंतु आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच नंतर मोबाइल बंद करून आरोपी पळून गेला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच शेतकरी विजय ढौकचौळे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. ९५ हजारांचा कांदा चोरीला राहुरी तालुक्यातील कोल्हार येथे तब्बल ९५ हजारांचा कांदा चोरीला गेल्याचा प्रकार १ नोव्हेंबर ते २ नोव्हेंबरच्या दरम्यान घडला आहे. या प्रकरणी योगेश मिठ्ठलाल मुथा यांनी दिलेल्या तक्रारीवरून काल, सोमवारी उशिरा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश मुथा हे कांद्याचे असून त्यांचे कोल्हार परिसरात गोदाम आहे. या गोदामात ठेवण्यात आलेल्या कांद्याच्या शंभर गोण्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्या असून, या कांद्याची अंदाजे किंमत ९५ हजार रुपये आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कर्मचारी संजय राठोड करीत आहेत.

https://ift.tt/3fau8np
November 03, 2020 at 12:47PM

मेट्रो कारशेडची जागा आमची; पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: आरेतील कांजूरमार्गमध्ये हलवण्यात आल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षानं याबाबत सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता केंद्रानंही राज्य सरकारला कांजूर येथील मेट्रो कारशेड थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात केंद्रानं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहलं आहे. अलीकडची काही प्रकरणे पाहता राज्य विरुद्ध केंद्र या संघर्षातून हा खूप मोठा निर्णय घेतला गेल्याचे बोलले जात आहे. कांजूरमार्ग येथे मेट्रोचं कारशेड स्थलांतरित केल्यानंतर एमएमआरडीएनं कामाला सुरूवात केली आहे. यावरुन, केंद्रानं राज्याला सविस्तर पत्र लिहलं आहे. 'कांजूरमार्गची जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची असून आम्ही त्यावरील आमचा हक्क अद्याप सोडला नाही,' असं केंद्रानं म्हटलं आहे. 'याआधीही एमएमआरडीएचा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळं आमच्या परस्पर कारशेडचं काम सुरु करणं चुकीच आहे. कारशेडचं काम थांबवा,' असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या पत्रावर अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये. त्यामुळं राज्य केंद्राच्या या आदेशावर कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे. दरम्यान, राज्याचे पर्यारवरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई मिररला दिलेल्या माहितीनुसार, कांजूर येथील मेट्रो कारशेडचे काम सुरूच राहणार, असल्याचं म्हटलं आहे. तसंच, केंद्रानं राज्याचे मुख्य सचिव यांना पाठवलेल्या पत्रातबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे. ती जागा केंद्राच्या मालकीची नाही, तर राज्य सरकारच्या मालकीची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कारशेडचा काय आहे वाद? गतवर्षी आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी आंदोलन छेडले होते. हे आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा तेव्हा आरोप करण्यात आला होता. तेव्हा सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेने या प्रकाराचा कडाडून विरोध केला होता. त्यानंतर ठाकरे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरेतील कारशेडला स्थगिती दिली होती. शिवाय, आरेतील कारशेड कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षानं सरकारच्या या निर्णयाचा कडाडून विरोध केला होता.

https://ift.tt/3fau8np
November 03, 2020 at 12:36PM

चंद्रकांत पाटलांना हिमालयात जावे लागणार नाही; मुश्रीफांची टोलेबाजी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
कोल्हापूर: राजकारण सोडून हिमालयात जाण्याची भाषा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना ग्रामविकास मंत्री यांनी आज पुन्हा एकदा टोला हाणला. 'चंद्रकांतदादांना हिमालयात जाण्याची आवश्यकता नाही. आम्हाला इथेच त्यांची गरज आहे,' असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ( taunts BJP Leader ) चंद्रकांत पाटील यांच्या प्रथम वर्षपूर्ती कार्यअहवालाचे प्रकाशन सोमवारी पुण्यात झाले. यावेळी बोलताना त्यांनी टीकाकारांचा समाचार घेतला. 'कोथरूडमधून निवडून आल्यामुळं 'कोल्हापूरहून पळून आले' अशी टीका माझ्यावर केली जाते. मी अशा टीकेला भीत नाही. आजही कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातील आमदाराने राजीनामा द्यावा, पोटनिवडणूक लावावी. मी निवडणूक लढायला तयार आहे. तिथून निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईन,' असं पाटील म्हणाले होते. वाचा: मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केलेलीच नाही,' असं ते म्हणाले. 'विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झालेलं आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. भाजपचा एकही आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आलेला नाही, त्यामुळं चंद्रकांतदादांसाठी राजीनामा कोण देणार? कशासाठी? हे होणार नाही, हे दादांनाही माहीत आहे. त्यामुळंच ते हिमालयात जाण्याची भाषा करत आहेत,' असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. वाचा: 'ज्या कोथरुडमधून मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांतदादा निवडून आले आहेत, ती जागा सोडण्याची परवानगी भाजप कशी देईल? दोन्हीही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळं पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हाला तुमची इथेच गरज आहे,' असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

https://ift.tt/3fau8np
November 03, 2020 at 10:48AM

त्याबद्दल दादांचे आभार... मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचले!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
कोल्हापूर: राज्यपाल नियुक्त १२ जागासंदर्भात फडणवीस व राज्यपालांमध्ये आधीच काहीतरी ठरलंय हे माझं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी फेटाळलेलं नाही. मी खोटं बोलतोय असंही ते म्हणालेले नाहीत. त्यांनी एक प्रकारे माझ्या माहितीस दुजोराच दिलेला आहे,' असा दावा करत ग्रामविकास मंत्री यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना पुन्हा लक्ष्य केलं आहे. 'विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांवरून सरकारमध्ये सध्या बराच खल सुरू आहे. मंत्रिमंडळानं सुचवलेली नावं राज्यपाल मान्य करतील का, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळं विचारपूर्वक ही नावं पाठवली जाणार आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांच्या हवाल्यानं मुश्रीफ यांनी काल एक गौप्यस्फोट केला होता. 'ठाकरे सरकार देणार असलेली १२ सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बाजूला ठेवणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राज्यपाल यांच्यात झालेल्या चर्चेत हे ठरलं आहे. चंद्रकांत पाटील हेच असं म्हणाले होते,' असं मुश्रीफ यांनी म्हटलं होतं. ते योग्यच असल्याचा दावा मुश्रीफ यांनी आज केला आहे. वाचा: 'मी दादांचे मनापासून आभार मानतो, कारण सन्माननीय राज्यपाल व सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामधील चर्चेबाबत वारणेवर त्यांनी जे वक्तव्य केले होते. त्याचा स्पष्ट इन्कार त्यांनी केलेला नाही. दुपारी १२ वाजता माझी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पुण्यामध्ये दादांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, 'राज्यपालांना संविधानाने अधिकार दिले आहेत, ते तसे करू शकतात, असं म्हणून विनय कोरे यांच्याशी राज्यपालनियुक्त सदस्यांविषयी झालेल्या चर्चेला पाटील यांनी एक प्रकारे दुजोरा दिला आहे,' असं मुश्रीफ यांचं म्हणणं आहे. वाचा: 'मुश्रीफ यांचं विधान हास्यास्पद आहे, असं वक्तव्य संध्याकाळी त्यांनी केलं. मात्र, असं विधान आपण स्वतः केलेलं नाही, मुश्रीफ खोटे बोलत आहेत किंवा त्या भागातील जागृत देवस्थान श्री. जोतिबाची शपथ घेतो, असं काहीही म्हटलेलं नाही. दादांचा तो स्वभावही नाही. याचा अर्थ माझी माहिती योग्य आहे, असंही मुश्रीफ यांनी पत्रकात पुढं म्हटलं आहे.

https://ift.tt/3fau8np
November 03, 2020 at 11:45AM