N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

गोस्वामी भाजपचे लाउडस्पीकर असतील; अमित शहा यांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारणही तापले आहे. अर्णब यांची अटक म्हणजे राज्यातील अघोषित आणीबीणी असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अर्णब यांच्या अटकेचा निषेध केला होता. यावरून शिवसेना नेते यांनी भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अर्बण गोस्वामी यांच्या अटकेनंतर अमित शहा यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला होता. तसंच, काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीची लाज काढली. ही घटना आणीबाणीची आठवण करून देते, अशी टीका सत्ताधारी महाविकास आघाडीवर केली होती. अमित शहा यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना अर्णब गोस्वामी त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते पक्षाची बाजू मांडत आहेत, असा टोला लगावला आहे. 'सामना जसं शिवसेनेचं मुखपत्र आहे तसं ते त्यांचं चॅनेल. तो कदाचित भाजपचा लाऊडस्पीकर असेल. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी ते उतरले असतील. पण त्याने कोणत्या प्रकारचा गुन्हा केलेला आहे आणि पोलीस कारवाई का करत आहे हे समजून घेणं गरजेचं होतं,' असं राऊत यांनी म्हटलं आहे. वाचाः 'पत्रकार म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांनी कोणाला तरी हक्काचे पैसे दिले नाहीत. त्यांच्यामुळं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि त्यातून अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली. आत्महत्या कोणामुळं केली हे लिहून ठेवलं आहे. सुशांतसिंह प्रकरणात नव्हतं. पण त्या प्रकरणात वेगळी भूमिका घेण्यात आली आणि या प्रकरणी राज्य आणि केंद्रातील भाजपची भूमिका वेगळी आहे,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. वाचाः वाचाः

https://ift.tt/3fau8np
November 05, 2020 at 12:44PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा