N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

Ahmednagar : गुटखा घेण्याच्या बहाण्याने दुकानात आला अन् सोनसाखळी घेऊन गेला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
म. टा. प्रतिनिधी, नगर : किराणा दुकानामध्ये गुटखा घेण्याच्या बहाण्याने आलेल्या अनोळखी व्यक्तीने दुकानाच्या काउंटरवर ठेवलेली सोन्याची साखळी चोरून पोबारा केला. येथील बसस्थानक परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी काल, बुधवारी रात्री अकराच्या सुमारास तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावेडी बसस्थानकाच्या पाठीमागे अंजली दिलीप आव्हाड यांचे किराणा दुकान आहे. काल, बुधवारी सकाळच्या सुमारास त्या दुकानात होत्या. यावेळी त्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याची साखळी केसामध्ये अडकत असल्यामुळे ती गळ्यातून काढून दुकानाच्या काउंटरवर ठेवली. याचवेळी दुकानामध्ये एक अनोळखी व्यक्ती आली. त्याने आव्हाड यांना ‘गुटखा आहे का’, असे विचारले. त्यावर आव्हाड यांनी ‘गुटखा नाही’, असे सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने पाच रुपयांची शॅम्पूची पुडी घेतली आणि त्याबद्दल्यात त्याने दहा रुपये आव्हाड यांना दिले. उर्वरीत पाच रुपये परत घेत असतानाच संबंधित व्यक्तीने आव्हाड यांची नजर चुकवून काऊंटरवर ठेवलेली सोन्याची साखळी चोरली आणि तो तेथून पसार झाला. काउंटरवर ठेवलेली सोन्याची साखळी चोरीला गेल्याचे लक्षात येताच आव्हाड यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी सोनसाखळी चोरीला गेल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल गाजरे पुढील तपास करीत आहेत.

https://ift.tt/3fau8np
November 05, 2020 at 12:42PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा