लष्करप्रमुख नरवणेंनी स्वीकारली नेपाळची मानद जनरल रँक
N4U
१०:१६ AM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

वृत्तसंस्था, काठमांडू : असलेले जनरल यांना नेपाळ सरकारने मानद जनरल रँक देऊन सन्मानित केले. नेपाळच्या राष्ट्रपती यांनी गुरुवारी नरवणे यांचा सन्मान केला. यामुळे दोन्ही देशांच्या लष्करातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. राष्ट्रपतींच्या 'शीतलनिवास' या सरकारी निवासस्थानी झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात नरवणे यांना मानद जनरल रँक प्रदान केले गेले. या वेळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओलि, भारताचे राजदूत विनय एम. क्वात्रा आणि दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यानंतर नरवणे यांनी भंडारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा केली, असे भारतीय दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नरवणे तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी नेपाळचे लष्करप्रमुख जनरल यांची भेट घेऊन त्यांच्याशीदेखील चर्चा केली. दोन्ही देशांच्या लष्करातील परस्परसहकार्य वाढविण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. नरवणे यांनी युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकलादेखील भेट दिली; तसेच नेपाळ लष्कराच्या मुख्यालयात त्यांना मानवंदनादेखील देण्यात आली. नरवणे यांनी नेपाळ सैन्याच्या दोन रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका आणि अन्य काही वैद्यकीय उपकरणांची मदत केली. वाचा : वाचा : या वर्षाच्या सुरुवातीला नेपाळ सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नरवणे यांच्या भेटीस महत्त्व प्राप्त झाले आहे. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवारी) नरवणे नेपाळचे पंतप्रधान ओली यांची भेट घेणार आहेत. १९५० पासूनची परंपरा उभय देशांच्या लष्करप्रमुखाचा सन्मान करण्याची परंपरा सन १९५० पासून भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांनी जपली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात नेपाळचे लष्करप्रमुख जनरल थापा यांचा यांनी मानद जनरल रँक प्रदान करून सन्मान केला होता. वाचा : वाचा :
https://ift.tt/3fcy07h
November 06, 2020 at 04:00AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा