N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

eSakal लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दिवाळी विशेष: फटाफट चटपटीत कडबोळी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

पुणे:

वर्षातून एकदा येणारा सगळ्यांचा लाडका सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळीचा सगळ्यात लाडकी  आणि घराला एकत्र जोडून ठेवणारी खास गोष्ट  म्हणजे घरी बनवलेला दिवाळीचा फराळ. दरवर्षी तितक्याच प्रेमानं आपण फराळावर ताव मारतो. फराळाशिवाय दिवाळी हे समीकरण जुळतच नाही. काहीसा गोड, काहीसा तिखट व बराचसा खुसखुशीत ठेवा म्हणजे फराळ! चिवडा, चकली, लाडू, करंजी हे पदार्थ म्हणजे दिवाळीचा फराळ. गेल्या काही वर्षांपासून आपण हेच पदार्थ बनवत आणि खात आलोय. अगदी  पिढ्यान् पिढ्या आपल्याकडे हे पदार्थ बनवत आले आहेत. आपल्याकडे केवळ हेच पदार्थ बनतात असे नाही.आजकाल ओफिस च्या वेळा सांभाळून कमी वेळामध्ये फटाफट फराळ बनवावा लागतो आणि त्यात पौष्टिक बनवले तर सोन्याहून पिवळं त्यामुळे आजकाल खूप नवीन नवीन पदार्थ बघायला आणि खायला देखील मिळतात. यांचे मूळ हे जुनेच असते फकत त्यामध्ये काही सोयीनुसार बदल करून कमी वेळात घरात जे सामान उपलब्ध आहे त्यामध्ये बनवलेले असतात . यावर्षी या पँडेमिक सिटूएशन मध्ये वर्क फ्रॉम होमी करता करता सगळ्यांनी मिळून फराळ बनवायची मजा काही वेगळीच आहे आधीच पँडेमिक मुळे घरकाम हे सगळे मिळून करत आहेत तसाच दिवाळीचा फराळ देखील सगळ्यांनी मिळून केला तर कमी वेळात फटाफट होणारे काहीचटपटीत पदार्थ या दिवाळीमध्ये अजूनच मजा आणतील. वर्क फॉर्म होमी सांभाळून आणि घरातल्यांचा मूड सांभाळून फराळ बनवण्यासाठी चटपटीत फटाफट कडबोळी रेसिपी देत आहे. 

साहित्य :
१ कप नाचणीचे पीठ 
१/२ कप ज्वारीचे पीठ
१/२ कप डाळीचे पीठ  
१/३ तांदूळ पीठ
१.५ चमचे लोणी 
२ चमचे पांढरे तीळ 
चवीनुसार लाल तिखट 
१/२ छोटा चमचा हळद 
१/२ छोटा चमचा हिंग 
१ छोटा चमचा ओवा (आवडीप्रमाणे)
चवीनुसार मीठ 
पाणी 

पध्दत:
नाचणी, तांदूळ, ज्वारी पीठ, डाळीचे पीठ फक्त जरा गरम होईपर्यंत भाजून घेणे. 
पांढरे तीळ वेगळे भाजून घेणे. 
सगळी पीठं  एकत्र करून त्यामध्ये लोणी, तिखट, मीठ , हळद, हिंग असे मिक्स करून घेणे. 
आणि मग हळू हळू पाणी घालून साधारण १०,१५ मिनिटं पीठ चांगले मळून घेणे. 
मळलेले  पीठ १०,१५ मिनिटं झाकून भिजण्यासाठी ठेवावे. 
त्यानंतर पोळपाटावर गोळा घेऊन घोळून कडबोळे तयार करणे. 
तेल किंवा तूप तापत ठेवणे, एका वेळी ५,६ कडबोळी आधी मोठ्या आचेवर आणि मग मंद आचेवर तळावे. 
अश्या पद्धतीने आपली फटाफट कडबोळी झाली तयार 
या अश्याच कमी वेळात फटाफट होणाऱ्या पाककृती करूयात आणि वर्क फ्रॉम होम आणि दिवाळीचा फराळ घरी बनवून दिवाळीची मजा देखील घेऊयात..

हेल्दी रेसिपी : दामटीचे लाडू 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

दिवाळी आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण. पौराणिक, सांस्कृतिक दृष्टीने या सणाचे महत्त्व आहेच, त्याचबरोबर इतर सणांप्रमाणेच दिवाळीच्या बाबतीतही ऋतू, हवामान आणि आहार, याचा विचार आपल्या पूर्वजांनी केला आहे. 

हा काळ थंडीचा आणि या काळात स्निग्ध पदार्थ खाणे शरीरासाठी आवश्यक असते, त्यामुळे दिवाळीच्या पदार्थांमध्ये अशा स्निग्ध पदार्थांचा समावेश आपसूकच होतो. पूर्वीच्या काळी दिवाळीचे पदार्थ साधे आणि मोजकेच असायचे. आत्तासारखी पदार्थांची रेलचेल पूर्वी नसायची. गऱ्याचे लाडू (रव्याचे लाडू), कळीचे लाडू, दामटीचे लाडू, ताणली जाणारी चकली, काटेकडबोळी (चकली), राळ्याचे कानवले, शेव, हे काही जुने पदार्थ. पूर्वी दिवाळीच्या पदार्थांमध्ये मैद्याचा वापर होत नसे. मैदासदृश्य पदार्थ म्हणजे ‘पिठी’ कानवले (करंजी), वगैरे साठी वापरली जायची आणि अर्थातच, ती घरी बनविलेली असायची. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पूर्वी दिवाळीचे पदार्थही शेजारणी एकमेकींच्या मदतीने करीत असत. फराळाची सुरुवात एखाद्या गोड पदार्थाने केली जायची. माझ्या आजीचा दिवाळीचे पदार्थ करण्यात मोठा हातखंडा! आपली आजी इतर नवीन गृहिणींना क्लिष्ट वाटणारे पदार्थ लीलया कशी बनविते, याचे आकलन त्यावेळी व्हायचे नाही; मात्र अप्रूप जरूर वाटत असे. आणखी एक वेगळी गोष्ट माझ्या प्रवासात मी ऐकली, ती म्हणजे दिवाळीला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ‘शेवयांचा भात’ करत असत. आजही अनेक ठिकाणी दिवाळीच्या फराळासोबत दही-पोहे खाण्याची प्रथा आहे. दिवाळीचे पदार्थ पचनास सोपे व्हावेत, यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेले ते प्रयोजन आहे! 

आजकाल यातील काही प्रथा मागे पडल्या मात्र आठवणींच्या कप्प्यात त्या पदार्थांचा आणि रीतींचा खमंगपणा व खुसखुशीतपणा आजही कायम आहे. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

साहित्य – बेसन, गोळीबंद साखरपाक, काजूचे तुकडे, वेलची-जायफळ पूड, तूप किंवा तेल. 

कृती –  १. बेसन मळून घेणे व पोळी लाटून थोड्या तेलावर किंवा तुपावर भाजून घेणे. 
२. पोळी साधारण गार झाल्यावर पोळीचा चुरा करून घेणे. (अगदी बारीक चुरा न करता दरदरीत चुरा करावा.) 
३.पाक व चुरा एकत्र करून साधारण परतणे. 
४. उर्वरित साहित्य एकत्र करून कोमट असताना लाडू वळावेत. 

दामटीचे लाडू, हा प्रकार पूर्वी महाराष्ट्रात होत असे. दामटी म्हणजे बेसनाची पोळी लाटून निखाऱ्यावर भाजत किंवा काही ठिकाणी ती तळून त्यांपासून लाडू बनवित. यामध्ये तेलाचा/तुपाचा वापर अगदी नकळत असल्यामुळे एरवीही हे पौष्टिक लाडू आहारात घेता येतील. 

हेल्दी रेसिपी : कळणा - दुधी भोपळ्याचे पौष्टिक फुनके 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

‘कळणा’ म्हणजे डाळ करून झाल्यावर उरलेला डाळीचा बारीक भाग. पूर्वी डाळी घरीच जात्यावर भरडल्या जायच्या व डाळीच्या प्रत्येक अंगाचा वापर आहारात होत असे. डाळ, कळणा आणि शेवटचा भाग म्हणजे कणोरा (कळण्यापेक्षाही बारीक कण) असे तीन प्रकार मिळतात. कळणा किंवा कणोऱ्याचा उपयोग फुनके, शेंगोळ्या, मुटके, झुणका/बेसन तसेच काही ठिकाणी भाज्यांमध्ये पेरून मोकळी भाजी करण्यासाठीही केला जात असे. सध्या जात्यांचा वापर कमी होत असल्याने कळणा व कणोराचा आहारातील वापर कमी झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यापूर्वी आपण कोकण भागातील कळण्याची एक रेसिपी पहिली होती. त्याच्याशी साधारण साधर्म्य असणारा आजचा पदार्थ. (मात्र मराठवाड्यातील कळण्याची भाकरी या दोन्हींपेक्षा वेगळी. त्याची रेसिपी पुढील लेखात.) 

फुनके हा महाराष्ट्रातील विदर्भ व खानदेश प्रांतातील एक पारंपारिक व पौष्टिक पदार्थ. तूर किंवा हरभरा किंवा दोन्ही डाळींच्या एकत्रित कळण्यापासून फुनके बनविले जातात. आपण आज पारंपरिक फुनके ‘दुधी भोपळा’ हा आणखी एक पौष्टिक घटक घालून बनविणार आहोत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रथिने, खनिजे, फायबर व अँटिऑक्सिडंटनी युक्त तुरीची डाळ अॅनिमिया, रक्तदाब, जळजळ, सूज येणे अशा त्रासांवर फायदेशीर असते. 

लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, ‘ब’ जीवनसत्त्व, प्रथिने, खनिजे, तंतूमय व पिष्टमय पदार्थ यांनी युक्त दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे. हृदयरोग, मधुमेह, उष्णतेचे आजार, वजन घटविणे अशा समस्यांवर लाभदायक आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

साहित्य - दुधी भोपळ्याचा किस, तुरीचा कळणा किंवा तूर डाळीची भरड, आलं-लसूण-मिरची-जिरे वाटण, मीठ, कोथिंबीर, हळद, धने पूड, गरम मसाला, लिंबू रस, बेसन/ज्वारी पीठ. (बाइंडिंग पुरते आवश्यक असल्यास). 

फोडणी - तेल, जिरे, मोहरी, तीळ, हिंग, कढीपत्ता, किंचित साखर, लाल तिखट, हळद. कोथिंबीर, लिंबू रस, चाट मसाला (ऐच्छिक). 

कृती  
१. कळणा ४-५ तास भिजवून घेणे. 
२. भोपळ्याचा किस व उर्वरित साहित्य घालून मुटके वळणे व चाळणीवर वाफवून घेणे. 
३. थंड झाल्यावर कापून व थोडा चुरा करून घेणे. 
४. फोडणी करून फुनके परतवून घेणे. 
५. वरून लिंबू रस व कोथिंबीर घालून सर्व्ह करणे. 

टीप - कढी, चटणीसोबत हे फुनके छान लागतात. 

हेल्दी रेसिपी : चोंगे : चविष्ट 'कलाकृती'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

मोहरम हा मुस्लिम दिनदर्शिकेतील पहिला महिना. माझ्या लहानपणी मी या सणाच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या अनेक गोष्टी अनुभवल्या.

आमच्या इथे एक मुस्लिमेतर कुटुंबात वाजतगाजत ताबूत आणून बसविण्याची प्रथा अनेक पिढ्यांपासून होती. ताबूत आणणाऱ्या व्यक्तीचे खूप आदराने व प्रेमाने स्वागत केले जायचे. चोंगे, मलिदा, घोडे हे या सणाचे विशेष पदार्थ एकमेकांना वाटले जायचे. मला अप्रूप याचे वाटायचे की हा सण आपला नाही तर मग हे सगळे लोक इतक्या आनंदाने, उत्साहाने या सगळ्यात कसे आणि का सहभागी होत असतील? हाच प्रश्‍न दिवाळी, वगैरे आपल्या सणांच्या बाबतीतही पडायचा.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या ‘एकात्मतेचे’ आकलन हळूहळू होत गेले. मी पुढे जेव्हा माझ्या प्रवासात अशा अनेक समुदायाच्या व समाजाच्या लोकांना भेटले तेव्हाही असाच एकोपा अनुभवता आला. माझ्या आजीला विविध धर्मीयांच्या सणांमध्ये सहभागी होणे आवडायचे. तिच्यामुळे विविध सणांच्या विविध पदार्थांच्या मेजवानीचा आनंद घेता आला. त्यामुळे सणांचे पदार्थ केवळ एक प्रथा नाही, तर उत्सवाचा आनंद द्विगुणित करणारे, आपापसातील भेदभावांची दरी मिटवणारे, भावबंध मजबूत करणारे गोड ‘दुवा’ आहेत, हेही तिच्यामुळेच मनात रुजले.

मोहरमच्या काळात बनविला जाणारा ‘चोंगे’ हा स्वादिष्ट व ‘कलाकृती’ असणाऱ्या पदार्थाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. कलाकृती असणारा म्हणतेय, कारण याचा नक्षीदार पाट (पोळपाट). हा पाट विशेषतः कोल्हापूर भागात वापरला जातो. यावर आपली गव्हाची चपाती/पोळी लाटली जाते. महाराष्ट्रातील बाकी भागात असा पाट वापरत नसल्यामुळे तयार चपातीवर हातानेच वर्तुळाकार मुरड घालत वर्तुळे बनवून चोंगे करतात.

गव्हामध्ये ग्लुटेनचे प्रमाण अधिक असल्यामुळे अनेकजण गव्हाचे पदार्थ खाणे टाळतात. असे असले तरी गव्हात लोह, थायमिन, कॅल्शिअम, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस सारखी पोषक घटक देखील आहेत. त्यामुळे गव्हाचे पदार्थ अगदीच टाळण्यापेक्षा प्रमाणात खाल्ल्यास नक्कीच उपयुक्त आहे.
साहित्य - कणीक, गुळाचा पाक, खोबरे किस, खसखस व बेसन भाजून, बडीशेप, वेलची व सुंठ पूड.

कृती -
१. चोंगे पाटावर चपाती लाटून भाजून घेणे.
२. चोंग्यांवर गुळाचा पाक व बाकी सर्व साहित्य पेरून ४-५ तास बाजूला ठेवणे.
३. तूप घालून खाणे.
टीप - आवडत असल्यास ड्रायफ्रुट्स व गुळाच्या पाकाऐवजी विविध सिरपचाही वापर करता येईल. पॅनकेकप्रमाणे नाष्ट्यासाठी उत्तम प्रकार.

Edited By - Prashant Patil

रेसिपी :  शेवाप्पे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

साहित्य - १ वाटी बांबिनो शेवया, पाऊण वाटी रवा, कांदा, वाटलेली हिरवी मिरची, जिरे पूड, धना पूड, मीठ, हिंग, हळद, आवडीप्रमाणे गाजर, मटार, स्वीट कॉर्न, सिमला मिरची, पाव वाटी दही. 

कृती - प्रथम दोन चमचे तेल गरम करावे त्यात शेवया भाजाव्यात. नंतर त्यात रवा घालून तो ही भाजावा. थोडेसे भाजून झाले की, एका बाऊलमध्ये काढावे. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, मीठ, हळद, हिंग, धना-जिरा पूड घालावी. आवडीप्रमाणे गाजर, मटार, स्वीट कॉर्न, सिमला मिरची घालावी. पाव वाटी दही घालून सर्व एकत्र करावे. थोडे पाणी घालून नेहमीच्या अप्प्यांचे पीठ करतो इतपत पातळ करावे. १० ते १५ मिनिटे भिजत ठेवावे. नंतर नेहमीप्रमाणे आप्पे करावेत. 
- वैजयंती हिंगे, निगडी प्राधिकरण, पुणे 

हेल्दी रेसिपी : ढेस्याचे सूप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

आपल्याकडे भोगी, महालक्ष्मी (गौरी) जेवण, ऋषीपंचमी, पितृपक्ष अशा विविध सणांच्या प्रसंगी सोळा, पाच किंवा ऋतूतील उपलब्ध मिसळीच्या भाज्या करण्याची प्रथा आहे. त्यातीलच एक मानाची भाजी ‘ढेसे’ म्हणजे माठ. लाल व हिरवी अशा दोन प्रकारांत आढळणारी ही भाजी या सणांना करणे महत्त्वाचे मानले जात असून, ही भाजी उपवासालादेखील तितकीच आवडीने खाल्ली जाते.

माझ्या प्रवासात मी ही भाजी अनेकांच्या परड्यात उगवलेली पाहिली आहे. गावातील महिला त्यांच्या अनुभव व निरीक्षणातून या भाजीच्या रेसिपीसोबतच भाजीच्या उपयुक्ततेविषयी बरीच माहिती सांगतात. या भाजीमध्ये भाजीच्या देठांचा वापर केला जातो. शिवाय याची मुळेही अतिशय पौष्टिक असल्याने त्यांचाही भाजीमध्ये वापर होतो.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या भाजीत ‘ब’ जीवनसत्त्व, लोह, मॅग्नेशिअम, मॅगेनीज, फॉस्फरस आणि झिंक असे उपयुक्त घटक  आढळतात. ही भाजी पचनास सुलभ असून, वजन घटविण्याबरोबरच मूळव्याध, मासिक अतिस्त्राव, कोलेस्ट्रोल कमी करणे अशा समस्यांवरदेखील लाभदायक आहे. दुग्धवर्धक असल्यामुळे बाळंतिणीसाठी ही मुळे उपयुक्त आहेत. ज्वरनाशक असून इसबसारख्या त्वचारोगांवर बाह्यउपचार म्हणून ढेस्याच्या पानांचा लेप वापरला जातो.

इतर हेल्दी रेसिपीसाठी येथे क्लिक करा

या भाजीचा आहारात पारंपरिक किंवा आजच्या या ‘ट्वीस्ट’ रेसिपीने देखील समावेश करता येईल.

पारंपरिक भाजीमध्ये कांदा, डाळ, शेंगदाणा कूट, कारळाकूट घालून नेहमीच्या भाजीप्रमाणे भाजी बनवितात. ही देठे शिजण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे देठे आधी वाफवून घेणे आवश्यक असते.

ढेस्याचे सूप
साहित्य - ढेस्याची देठे, कांदा, लसूण, आल्याचा तुकडा (ऐच्छिक), कारळा चटणी.

कृती  - देठांची साल व शिरा काढून घेणे. (शेवग्याच्या शेंगांप्रमाणे)
कांदा, लसूण, देठे क्रमाक्रमाने तेलात परतून घेणे.
पाणी व आले घालून देठे शिजवून घेणे.
थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून घेऊन गाळून घेणे.
मीठ घालून उकळून घेणे.
खातेवेळी वरून कारळा चटणी घालून सूप पिण्यास तयार.

माझी रेसिपी : गार्लिक पिझ्झा ब्रेड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

साहित्य - मध्यम आकाराचे ४ उकडलेले बटाटे, ५ चमचे मैदा, चिली फ्लेक्स, पिझा (ऑरेगानो), चिमूटभर मीठ, २ चमचे ऑलिव्ह ऑईल, १ चमचा बेकिंग पावडर.

गार्लिक बटरसाठी - २ चमचे अमूल बटर, २ चमचे मेयोनीज, २ लहान चमचे लसूण बारीक केलेला, चिली फ्लेक्स, ऑरेगानो

बारीक चिरलेली सिमला मिरची, वाफवलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर ४ ते ५ चमचे, मोजरेला चीज (नसेल तर साधे प्रोसेस्ड चीज)

कृती - उकडलेले बटाटे बारीक कुसकरून घ्यावेत. त्यात २ चमचे तेल, मीठ, बेकिंग पावडर, चिली फ्लेक्स, ऑरेगानो, कोथिंबीर घालून सर्व मिक्स करावे. त्यात ४ चमचे मैदा टाकून कणकेसारखा गोळा बनवा. झाकून बाजूला ठेवा. बटर, मेयोनीज, चिली फ्लेक्स, ऑरेगानो, थोडी कोथिंबीर सर्व बाऊलमध्ये मिक्स करावे. मैद्याच्या कणेकचा गोळा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटावी. त्यावर गार्लिक बटर मेयोनीजचे मिश्रण लावावे. आता अर्ध्या भागावर सिमला मिरची, मक्याचे दाणे टाकावेत. किनारी सोडून, परत वर चिली फ्लेक्स, ऑरेगानो टाकावे. चीज किसून अर्धा भाग फोल्ड करावा. वर बटरने ब्रशिंग करावे. वरही चिली फ्लेक्स, ऑरेगानो, आणि थोडे चीज किसून टाकावे.

माइक्रोव्हेवला १८० डिग्रीवर २० मिनिट बेक करावे. किंवा कढईत रेती पसरून प्रीहीट १० मिनिट मध्यम गॅसवर मग प्लेटमध्ये ब्रशिंग केलेली अर्धी पोळी ठेवून २० मिनिटे ठेवावे. १० मिनिटे मोठ्या आचेवर नंतर १० मिनिटे मंद आचेवर. ब्रशिंग केलेल्या रोटीवर उभे काप सुरीने पाडावेत, थेट खोलवर नको.

Edited By - Prashant Patil

माझी रेसिपी : रताळ्याचे गुलाबजाम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

साहित्य - रताळे अर्धा किलो, साखर अर्धी वाटी, आरारूट पावडर ४ चमचे. दूध पावडर ६ चमचे, केशर, विलायची पूड, तूप अर्धी वाटी.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृती - रताळी उकडून साल काढून किसून घ्यावीत. नंतर साखरेचा पाक करून घेणे. रताळी, दूध पावडर, आरारूट पावडर, केशर, विलायची, मिक्स करून घेणे. त्याचे छोटे गोळे बनवून तूपात तळून घेणे. नंतर पाकात टाकावेत. 

Edited By - Prashant Patil

हेल्दी रेसिपी - काकडीच्या बियांचे पौष्टिक पदार्थ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

सध्याच्या ‘मॉडर्न डाएट’ मध्ये ‘सुपर न्युट्रीशिअस’ म्हणून काही घटकांचा आहारात समावेश करण्याचा आग्रह केला जातो. तसे हे घटक आपल्या आहारात पूर्वीपासूनच आहेत. ते म्हणजे ‘सीडस’. अर्थात, विविध प्रकारांच्या बिया. जवस, सुर्यफूल, तीळ, भोपळा, काकडी, वगैरेंच्या बियांचे नियमित सेवन अत्यंत फायदेशीर असते. शिवाय संध्याकाळी भूक लागल्यावर बियांपासून बनविलेली चिक्की, लाडू किंवा भाजलेल्या बिया खाता येतात.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र खाद्यसंस्कृतीच्या माझ्या प्रवासात जवळपास सर्वच ठिकाणी या बियांचा वापर फार पूर्वीपासूनच विविध प्रकारे होत असल्याचे आढळले. काही बियांपासून तेल काढत, तर काही नुसत्याच खात किंवा त्यांपासून चटणी, भाजी, लाडू बनवित असत. पुढील काही लेखांमध्ये आपण या बियांपासून बनविल्या जाणाऱ्या काही पारंपारिक व पौष्टिक पदार्थांची माहिती घेणार आहोत. आज पाहूयात वाळकाच्या, म्हणजेच काकडीच्या बियांची माहिती व रेसिपी. 

काकडीच्या बियांमध्ये कॅल्शिअम, सोडियम, मॅग्नेशिअम, झिंक, लोह, तसेच शरीराला उपयुक्त असणारी इतरही काही महत्त्वाची खनिजद्रव्ये असतात. उन्हाळ्यातील उष्णतेचे आजार, तसेच अशक्तपणावर काकडीच्या बियांचे सरबत लाभदायक असते. या बिया सर्व ऋतुंमध्ये खाता येऊ शकतात.

काकडीच्या बियांचे लाडू 
साहित्य -

बिया, गूळ किंवा साखर पाक, वेलची पूड, जायफळ (ऐच्छिक)

कृती -
१. बिया भाजून वाटून घेणे.
२. साखरेच्या किंवा गुळाच्या पाकात उर्वरित साहित्य व बियांची पूड घालून मिश्रण बनवून घेणे.
३. थंड झाल्यावर लाडू वळणे.
टीप :  पारंपरिक रेसिपीमध्ये ओल्या बिया चुलीतील राखेत चोळून त्यांपासून लाडू बनवितात. ओल्या बिया मिळाल्यास पारंपरिक पद्धतीनेही लाडू बनविता येतील.

काकडीच्या बियांची चटणी
साहित्य -

वाळकाच्या सुकलेल्या बिया (काकडीच्या बिया), कांदा, चिंचेचे पाणी, चटणी, लसूण, जिरे व मीठ.

कृती -
१. बिया भाजून कुटून घेणे.
२. कुटलेल्या बिया, लसूण व जिरे एकत्रित वाटणे.
३. कांदा, चिंचेचे पाणी, मीठ घालून एकत्रित करणे.
टीप : कोरडी चटणी करायची असल्यास कांदा व चिंचेचे पाणी घालू नये.

Edited By - Prashant Patil

माझी रेसिपी - उपवासाचे दहीवडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

साहित्य - एक मोठी वाटी भगर, अर्धी वाटी शेंगदाणे कूट, दोन-तीन हिरव्या मिरच्या, काळे मीठ, दही, साखर, लाल तिखट, मीठ, कढीलिंब इत्यादी.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृती - भगर पाच-सहा तास भिजत घालून हिरवी मिरची घालून मिक्सरमध्ये फिरवा. मीठ घालून वडे तळा. हे वडे कोमट पाण्यात घाला. दही फिरवून त्यात साखर-मीठ घाला. पाण्यातले वडे हाताने दाबून घ्या. त्यावर दही, काळे मीठ,
लाल तिखट घालून लाल व हिरव्या चटणीसह सर्व्ह करा.

Edited By - Prashant Patil

आजचा पदार्थ आवर्जून करून पाहा; सुक्यामेव्याचे दिंडे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

‘हसरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला..’ आजपासून श्रावण सुरू होत आहे! श्रावण म्हणजे सणवार, व्रतवैकल्यांचा महिना. श्रावणातला पहिला सण म्हणजे ‘नागपंचमी’. पूर्वी या सणाला सासुरवाशिणी माहेरी येत. घरांघरातून या मुली लाह्या-फुटणे गोळा करून नदीकिनारी बांधलेल्या झोपळ्यांवर झोका घेत. लोकगीतांवर फेर धरत. या सर्व आठवणी सांगताना अनेक गावांतील आजींच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद मी पाहिला आहे. आजकाल मात्र या गोष्टी लोप पावत चालल्या असल्या तरी या सणाचे खास, पारंपरिक पदार्थ आजही अनेक ठिकाणी होतात, हे विशेष. कानवले, पुरणाचे दिंडे, चौपुले, वगैरे. आजचा ‘सुक्यामेव्याचे दिंडे’ हा प्रकार मला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एका गावात मिळाला. याला तिथे ‘गोड फळं’ असे म्हणतात. 

सुक्यामेव्याचे प्रमाणात सेवन शरीरासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर असते. सुकामेवा म्हणजेच बदाम, काजू, अक्रोड, खारीक, पिस्ता होय. त्यामध्ये प्रथिने, प्रतिजैविके, मोनो-अनसॅच्यूरेटेड फॅटस्, फायबर, ओमेगा-३, कॅल्शिअम आदी महत्त्वाचे घटक असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते, ऊर्जा मिळते, हाडे व स्नायू बळकट होतात. तसेच केस, त्वचेचा पोत सुधारतो. मात्र अतिप्रमाणात खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आजचा पदार्थ आवर्जून करून पाहा, मात्र प्रमाणात खा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साहित्य – सारणासाठी – आवडीप्रमाणे सुकामेवा, भाजलेली खसखस, सुक्या खोबऱ्याचा कीस, गुळ, सुंठ, काळीमिरी, बडीशेप, वेलची, जायफळ. पारी- कणीक. 

कृती – 

१. खोबरे, बडीशेप, मिरे भाजून घेणे. त्यात किसलेला गुळ व सुक्यामेव्याचे बारीक काप व उर्वरित साहित्य एकत्रित करून सारण बनवून घ्या. 

२. पारीसाठी नेहमीपेक्षा थोडी सैल कणीक भिजवणे. पातळ पारी लाटून त्यात मध्यभागी सारण भरून चार बाजूंनी घडी मारून चौकोनी आकार देणे. (पारीच्या चारही कडा मध्यभागी सारणावर येतील.) पुन्हा एक पारी लाटून त्यात सुकामेवा भरलेला दिंडा घालून चौकोनी आकारात बंद करणे. 

३. तयार दिंडे मोदकाप्रमाणे वाफवून तुपासोबत खावेत. 

टीप - सुक्यामेव्याचे प्रमाण कमी ठेवून बाकी घटक अधिक ठेवल्यास हे दिंडे सर्दी व खोकल्यासाठी उपयुक्त आहेत. 

माझी रेसिपी : पुदिना सरबत प्रिमिक्स

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

साहित्य - पुदिना एक जुडी, साखर दोन वाटी, पाणी एक वाटी, काळे मीठ पाव चमचा, दोन लिंबांचा रस, खाण्याचा हिरवा रंग चिमूटभर.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृती - प्रथम पुदिन्याची पाने स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्यात धुण्यासाठी टाकावी. नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. गॅसवर पातेल्यात साखर, पाणी टाकून एकतारी पाक तयार करून घ्यावा. या पाकात निवडलेली पुदिन्याची पाने रात्रभर भिजत ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी ही पाने निचरून काढावीत. या पाकामध्ये पाव चमचा मीठ व लिंबाचा रस मिक्स करावा.

चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यावे, नंतर गाळून एका बरणीत भरावे व त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा रंग (आपल्या आवडीनुसार) टाकावा. काचेच्या बरणीत फ्रिजमध्ये हे सरबत प्रिमिक्स ठेवल्यास अगदी वर्षभरही टिकते. सरबत करण्यासाठी दोन ते तीन चमचे हा रस घ्यावा व त्यामध्ये अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकावे किंवा आपल्या चवीप्रमाणे आपण कमीजास्त करू शकता.

Edited By - Prashant Patil

माझी रेसिपी : दलियाचा पौष्टिक उपमा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

साहित्य - एक वाटी गव्हाचा दलिया, अर्धी वाटी चिरलेल्या भाज्या, गाजर, मटार, टोमॅटो, ओल्या मक्याचे दाणे, कांदा एक, हिरवी मिरची एक, थोडे मीठ, थोडी साखर, एक ते दीड वाटी पाणी, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृती - प्रथम दलिया कढईत भाजून एक ते दीड वाटी पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेणे. नंतर कढईत एक डाव तेल टाकून फोडणी करणे. त्यात कांदा घालून परतणे. एका हिरवी मिरचीचे तुकडे घालणे. त्यात भाज्या घालून चांगल्या वाफवून घ्यावात. त्यात शिजलेला दलिया टाकून परत वाफवून घेणे. अर्धे लिंबू पिळणे. मीठ व साखर घालणे. चांगले हलवून घ्यावे. वरून खोबरे, कोथिंबीर घालून सजविणे. पौष्टिक उपमा तयार. 

Edited By - Prashant Patil

हेल्दी रेसिपी : कुळथाचं माडगं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

मी विस्मरणात गेलेल्या पदार्थांच्या शोधात बाहेर पडले, तेव्हा ग्रामीण जीवन, पदार्थ व जुनी धान्यांबाबत अनभिज्ञ होते. आजची कुळथाची रेसिपी ही अशीच. पश्चिम महराष्ट्रातील कोणत्याही गावात गेल्यावर जुने पदार्थ सांगण्याची सुरुवात या पदार्थापासून होते. एका गावात हा पदार्थ पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने, म्हणजे जात्यावर दळून, चुलीवर शिजवून मला खाऊ घातला होता. तो पदार्थ म्हणजे कुळथाचं माडगं.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुळीथ किंवा हुलगे जुन्या कडधान्यांपैकी महत्त्वाचे. आयुर्वेद आणि पारंपारिक खाद्यसंस्कृतीतही तितकेच महत्त्वाचे. कुळीथ उष्णता वाढवणारे व ताकद देणारे आहे. कुळीथामुळे कफ, वात व मेद कमी होतो. आयुर्वेदात आजारी व्यक्तीस कुळथाचे कढण देण्याचे सुचविले आहे. पूर्वी घराघरांत माडगेदेखील याचसाठी प्यायचे. पावसात भिजल्यावर कणकण, सर्दी-पडसे झाल्यावर गावातील आजी सांगायच्या, ‘‘पावसात भिजल्यानंतर कणकण आल्यास वाडगाभर गरमागरम माडगं प्यायचं अन् कांबळ पांघरून झोपायचं. तासाभरानं अंगाला दरदरून घाम सुटूनच्यान माणूस लगीचच तरतरीत व्हतुया.’’ पूर्वी पावसाळ्यातील लावणीची कामे झाल्यानंतर काहीतरी गरम पेय प्यावेसे वाटे, त्यावेळेसही माडगं केले जात असे.

कुळीथामध्ये शरीरात उष्णता निर्माण करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे थंड वातावरणात कुळथाचे सेवन लाभदायक असते. कुळीथ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्याने मूतखडा घालवण्यास मदत होते. मूळव्याध, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, कावीळ अशा आजारांमध्ये कुळथाचे सेवन उपयुक्त असते. कुळथामध्ये प्रथिने, कर्बोदके, तंतुमय पदार्थ, कॅल्शियम, लोह व सूक्ष्म पोषक घटक असतात. थंडीत, तसेच मेद कमी करण्यासाठी कुळथाचे उटणे लावणे उपयुक्त ठरते. कुळथापासून उसळ, शेंगोळे, पिठी, फुणके, मुटके, लाडू, माडगं हे पदार्थ बनतात. 
आज पाहणार आहोत माडग्याची रेसिपी.

साहित्य -
कुळीथ, शेवया किंवा शिजलेला भात, गूळ, मीठ, पाणी.

कृती -

  • कुळीथ भाजून दळून घेणे.
  • पीठ थोडावेळ पाण्यात भिजवणे.
  • गुळाच्या आधणात पीठ हळूहळू सोडणे.
  • शिजत असतानाच मीठ, भात किंवा शेवया घालणे.

Edited By - Prashant Patil

माझी रेसिपी : व्हॅनिला केक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

पुणे साहित्य - एक वाटी दही (फार आंबट नसावे), १ वाटी पिठीसाखर, चिमूटभर मीठ, १ चमचा व्हॅनिला इसेन्स, २ वाट्या मैदा, अर्धी वाटी मिल्क पावडर, १ चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा कप दूध.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृती - प्रथम मिक्सिंग बाऊलमध्ये दही आणि पिठीसाखर एकत्र करा, त्यात चिमूटभर मीठ आणि व्हॅनिला इसेन्स घालून छान फेटून घ्या. आता त्यात चाळलेला मैदा आणि मिल्क पावडर तसेच बेकिंग पावडर आणि सोडा घालून सर्व एकत्र करा. थोडे-थोडे दूध मिक्स करून परत थोडे फेटून झाल्यावर केकच्या टिनला ग्रीज करून त्यात हे मिश्रण ओता. प्री हिट कढईमध्ये आधी ५ मिनिटे मध्यम आचेवर व नंतर मंद आचेवर २० ते २५ मिनिटे ठेवा. किंवा प्री-हिट ओव्हनमध्ये ३० मिनिटे ठेवा. झाला टी-टाइम केक तयार.

Edited By - Prashant Patil

हेल्दी रेसिपी : शेंगदाण्याचं झिरकं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

शेंगदाणे हा आपल्या रोजच्या स्वयंपाकातील एक आवश्यक घटक. भाजी, आमटी, चटणी, पंचामृत, लाडू, चिक्की असे काही खास शेंगदाण्याचे पदार्थ, तर भाज्या, उसळी, पोहे अशा अनेक मुख्य पदार्थांमध्ये थोड्या शेंगदाण्यांचा वापरही त्या पदार्थांची लज्जत वाढवितो. पूर्वी बाहेरून आलेल्या व्यक्तीचे गूळ, शेंगदाणे व पाणी देऊन स्वागत केले जायचे. प्रवासाचा क्षीण कमी होऊन त्यास ऊर्जा मिळावी हा यामागचा मुख्य उद्देश.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, तेल आणि फायबर भरपूर प्रमाणात आहे. तसेच अँटिऑक्सिडंट, कॉपर, मॅंगेनीज, फॉस्फरस, मॅग्नेशिअम अशी महत्त्वाची खनिजे, ‘ई’ जीवनसत्त्व, ओमेगा-३ व ६ यांसारखी महत्त्वाची घटकद्रव्ये शेंगदाण्यातून मिळतात. खारे, तळलेले किंवा मसालेदार शेंगदाणे खाण्यापेक्षा वाफवलेले शेंगदाणे सलाडमध्ये घालून किंवा ‘चाट’प्रमाणे बनवून खाता येतील, तसेच शेंगदाणे रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाण्याचेही अनेक फायदे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शेंगदाण्याच्या नियमित सेवनामुळे हृदयविकार, बद्धकोष्ठता अशा विकारांवर आराम मिळतो. तसेच नियमित सेवनामुळे रक्ताची कमतरता दूर होते, हाडे मजबूत होतात व त्वचेचा पोतही सुधारतो.

महिलांच्या मासिक पाळी दरम्यानची पोटदुखी व ‘मूडस्विंगज्’वर गूळ व शेंगदाण्याच्या सेवनाने आराम मिळतो. आपल्याकडे शेंगदाण्याच्या तिखट, गोड, चटपटीत अशा अनेक पौष्टिक पाककृती आहेत. खरेतर आजची रेसिपी ही अडीअडचणीच्या वेळी, झटपट होणारा पदार्थ म्हणूनच अनेकदा केली जाते. मात्र, वर नमूद केलेले फायदे लक्षात घेता शेंगदाण्याच्या अशा पदार्थांचे नियमित सेवन करण्यास काहीच हरकत नाही. तेव्हा पाहूयात आजची खास शेंगदाण्याची, झटपट होणारी पौष्टिक रेसिपी – शेंगदाण्याचं झिरकं

साहित्य -
भाजलेले किंवा कच्चे शेंगदाणे, कांदा, तेल, जिरे, मोहरी, मीठ, हिरवी मिरची, लसूण, जिरे.

कृती -

  • शेंगदाणे, मिरची, लसूण व जिरे एकत्रित वाटून घेणे.
  • तेलात जिरे व मोहरीची फोडणी करून कांदा व वाटण घालून परतणे. 
  • पाणी घालून उकळी आणणे व शिजवणे.
  • आवडीप्रमाणे दाट किंवा पातळ ठेवणे.
  • भाकरीसोबत झिरकं खाण्यास तयार.

रेसिपी : गव्हाच्या पिठाचे लाडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

साहित्य - गव्हाचे पीठ एक ते दीड वाटी, बारीक रवा अर्धी वाटी, बेसन अर्धी वाटी, दूध पावडर अर्धी वाटी, चार लहान चमचे दूध, पातळ तूप, गुळ किंवा पिठीसाखर पाऊण वाटी, एक लहान चमचा वेलची पूड 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृती - प्रथम गव्हाचे पीठ, बेसन आणि रवा वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. त्यांना सोनेरी रंग येईपर्यंत भाजावे. ताटात काढून थंड होऊ द्यावे. आता त्यात दूध पावडर छान मिक्स करावी. त्यात दूध मिक्स करावे. सर्व मिश्रण  एका डब्यात भरून कुकरमध्ये ठेवावे. तीन शिट्ट्या होऊ द्याव्यात. तुम्ही दूध पावडरच्या ऐवजी मावा किंवा दुधावरची सायपण टाकू शकता. घट्ट साय टाकल्यास चार चमचे दुध टाकण्याची गरज नाही. नंतर ताटात काढून हाताने गुठल्या तोडून चाळावे. त्यात वेलची पूड, हवे असल्यास डॉयफ्रूटचे काप टाकावेत. गुळ किसुन टाकावा. (गुळाच्या ऐवजी पीठीसाखरही टाकू शकता.) सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. आता अर्धी  वाटी पातळ तूप मिसळावे. लाडू वळले जात नसतील तर आणखी थोडे तूप घालावे करावे. लाडू वळूनवर पिस्ता काप लावावेत.