महाराष्ट्र ठळक बातम्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
पुणे हादरले; भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून रिक्षाचालकाची हत्या
N4U
११:०५ AM
महाराष्ट्र ठळक बातम्या
,
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
म. टा. प्रतिनिधी, : परिसरात एका रिक्षा चालकावर अज्ञातांनी मध्यरात्री भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल विनायक जगताप (वय ४७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हे रिक्षा चालक आहेत. ते राहण्यास कोरेगाव पार्क येथील कवडेवस्ती लेन नंबर पाच येथे होते. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते रिक्षा घेऊन लेन नंबर पाचमधून जात असताना अचानक आलेल्या हल्लेखोरानी त्यांना अडवून त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिल्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. कोरेगाव पार्क पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, त्यांचे कोणाशी वाद होते याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यात येत आहे. दुचाकी बाजूला घेण्यावरून तरुणावर कोयत्याने वार दुचाकी बाजूला न घेतल्याच्या रागातून तिघा भावांनी तरुणावर कोयत्याने वार केले. मार्केट यार्ड परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अल्ताफ रफिक शेख (वय २०), कमरुद्दीन रफिक शेख (वय २२) आणि वसिम रफिक शेख (वय २४, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत विशाल जाधव (वय २१, रा. मार्केट यार्ड) यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री पावणेदहाच्या सुमारास विशाल आणि त्याचा मित्र सतीश कसबे गप्पा मारत होते. त्यावेळी तेथे आलेल्या अल्ताफने विशालला दुचाकी बाजूला घ्यायला सांगितली. त्यावर, 'तुला जाण्यासाठी रस्ता मोकळा आहे. तू तेथून जाऊ शकतोस,' असे उत्तर विशालने अल्ताफला दिले. याचा राग मनामध्ये ठेवून अल्ताफ घरी निघून गेला. काही वेळानंतर अल्ताफच्या दोन भावडांना घेऊन त्या ठिकाणी आला. या तिघांनी विशालला शिवीगाळ करून त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जखमी केले.
https://ift.tt/3fau8np
July 01, 2020 at 09:47AM
राजेश टोपेंनी शेअर केला खास व्हिडिओ, डॉक्टरांना सलाम
N4U
११:०५ AM
महाराष्ट्र ठळक बातम्या
,
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
मुंबई: राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री यांनी सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. टोपे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक खास व्हिडिओ शेअर करत करोना योद्ध्यांना सलामही केला आहे. (Health Minister salute Doctors) दरवर्षी १ जुलै हा दिवस देशात '' म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर देत असलेल्या आरोग्य सेवेबद्दल या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. जगात सध्या करोनाची महासाथ असल्यामुळं आजच्या डॉक्टर दिनाला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी एक ट्विट केलं आहे. 'आज डॉक्टर्स डे निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा! तसा तुमचा कुठला असा एक दिवस असू नये. कारण डॉक्टर्स नेहमीच देवासमान आहेत. कोविडसारख्या कठीण प्रसंगात डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस, मीडिया प्रतिनिधी यांनी जे कर्तव्य बजावलय ते अतुलनीय आहे,' असं टोपे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ट्विटसोबत टोपे यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई दिसते. त्यानंतर लॉकडाऊन अशी अक्षरे दिसतात आणि नंतर व्हिडिओत पूर्णपणे थांबलेले बंद झालेली मुंबई दिसते. त्यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधव डॉक्टर व आरोग्य सेवकांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना दिसतो. आरोग्यमंत्री टोपे यांनीही व्हिडिओतून संदेश दिला आहे. 'ही मुंबई, हे राज्य आणि हा देश पुन्हा धावेल. पुन्हा हसण्या-खिदळण्याचे आवाज येतील. नवी आशा, नवी उमेद घेऊन सगळे मिळून करोनाला हरवू,' असं त्यांनी म्हटलं आहे. 'एक सलाम सैनिकांना, एक करोना योद्ध्यांना' असं त्यांनी म्हटलं आहे. वाचा: डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी डॉक्टर दिन साजरा केला जातो. करोना महामारी आल्यापासून देशभरातील डॉक्टर दिवसरात्र आरोग्य सेवा देत आहेत. अनेक डॉक्टरांनाही करोनाच्या आजारानं ग्रासलं आहे. असं असूनही डॉक्टर एखाद्या योद्ध्यासारखे लढत आहेत. राजेश टोपे यांनी आतापर्यंत अनेक वेळा डॉक्टरांशी संवाद साधला आहे. त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. आज त्यांनी खास व्हिडिओ शेअर करून व पत्र लिहून डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
https://ift.tt/3fau8np
July 01, 2020 at 09:28AM
यंदा गणेशोउत्सव नाही! 'लालबागचा राजा' मंडळाचा ऐतिहासिक निर्णय
N4U
११:०५ AM
महाराष्ट्र ठळक बातम्या
,
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
मुंबई: संकटाच्या पार्श्वभूमीवर '' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक भान जपत यंदा आरोग्यउत्सव साजरा करण्याचं मंडळानं ठरवलं आहे. (Lalbaugcha Raja Mandal Cancelled Ganesh Festival) वाचा: करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीयांनी आपापले सण साधेपणाने व शक्यतो घरात राहूनच साजरे करावेत, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच केलं आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच राज्यातील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत बैठकाही घेतल्या होत्या. या बैठकींमध्ये उत्सव नेमका कसा साजरा करायचा, मूर्तीची उंची किती असावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे करावे, या संदर्भात चर्चा झाली होती व मंडळांना याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अनेक मंडळांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून उत्सवात बदल करण्याचे निर्णय घेतले होते. मुंबईतील गणेश गल्ली येथील 'मुंबईचा राजा' मंडळानंही यंदा उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना न करता केवळ पूजेची मूर्ती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 'चिंचपोकळीचा चिंतामणी' मंडळानं आगमन मिरवणूक सोहळा व पाटपूजन सोहळा रद्द केला आहे. मुंबईसह राज्यातील अन्य अनेक मोठ्या मंडळांनीही असेच निर्णय घेतले आहेत. 'लालबागच्या राजा' मंडळानं त्याही पुढं जाऊन उत्सवच साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी राजाच्या मंडपात रक्तदान व प्लाझ्मा दानाची शिबिरं घेतली जातील, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळं 'लालबागचा राजा' यंदा भक्तांना अगदी वेगळ्या रूपात दर्शन देणार हे स्पष्ट झालं आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८७ वे वर्ष आहे. वाचा: असा होणार लालबागच्या राजाचा उत्सव गणेशमूर्ती न बदलण्याबाबत निर्णयावर शिक्कामोर्तब! ११ दिवस फक्त रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपीसारखे उपक्रम राबवणार.. करोनालढ्यात शहिद झालेल्या पोलिस पोलिसांच्या कुटुंबातील २० वीरमातांचा सन्मान गलवान खोर्यात शहिद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपये देणार देशभर कीर्ती ‘लालबागच्या राजा’चा उत्सव हा मुंबई आणि महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात लोकप्रिय आहे. गणेशोत्सव काळात देशभरातून अनेक भाविक राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात. या निमित्तानं लालबागला जत्रेचं स्वरूप आलेलं असतं. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी, राजकीय मंडळी, क्रीडापटूही लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आवर्जून येत असतात. त्यामुळं यंदा गणेशोत्सव साजरा करण्याचा मंडळाचा निर्णय अनेकार्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. वाचा:
https://ift.tt/3fau8np
July 01, 2020 at 10:22AM
भरमसाठ वीज बिलाचा धक्का बसलाय? हे वाचा आणि रिलॅक्स व्हा!
N4U
१२:०५ PM
महाराष्ट्र ठळक बातम्या
,
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
मुंबई: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत हजारो ग्राहकांना या महिन्यात मोठ्या रकमेच्या वीज बिलाचा 'शॉक' बसला आहे. अचानक आलेल्या अव्वाच्या सव्वा रकमेच्या बिलांमुळे सगळेच चक्रावून गेले आहेत. मात्र, हे विजेचं बिल जास्त येण्यामागे काही कारणे आहेत. वाचा: करोनानंतरच्या लॉकडाऊनमध्ये सर्व काही ठप्प झाल्याने वीज कंपन्यांनीही प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन मीटर वाचन बंद केले होते. या काळात मागील तीन महिन्यांच्या बिलाची सरासरी काढून त्यानुसार ग्राहकांना बिल पाठवण्यात आलं होतं. राज्य वीज नियामक आयोगाच्या सूचनेनुसारच कंपन्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे ग्राहकांना एप्रिल व मे महिन्यात आलेले हे जानेवारी, फेब्रुवारी व मार्चच्या बिलाच्या रकमेच्या सरासरीवर आधारीत होते. या तीनही महिन्यात उकाडा तुलनेनं कमी होता. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत शाळा, कॉलेज व कार्यालये सुरू असल्यानं लोक नित्यनेमानं घराबाहेर पडत होते. साहजिकच या तीन महिन्यात विजेचा वापर कमी होता. परिणामी बिलाचा आकडाही कमी होता. एप्रिलपासून उकाडा वाढत गेला. त्यातच लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळं सगळेच लोक घरात होते. साहजिकच एप्रिल व मे महिन्यात विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. ३१ मे नंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वीज कंपन्यांनी पूर्वीप्रमाणे मीटर वाचन सुरू केले. त्यानुसार पाठवलेले बिल हे एप्रिल व मे महिन्यातील प्रत्यक्ष वीज वापरावर आधारीत होते. तो आकडा आधीच्या तुलनेत मोठा होता. त्यामुळे ग्राहकांना आता 'शॉक' बसला आहे. वाचा: आकड्यांत सांगायचं तर... जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात ज्यांचा सरासरी वीज वापर १०० युनिट्स होता, त्यांना १०० युनिट्सचे बिल आले. मात्र, एप्रिल व मे महिन्यात त्याच ग्राहकाचा प्रत्यक्ष वीज वापर १२० आढळला, तेव्हा त्याला अतिरिक्त ४० युनिट्ससाठी बिल आकारण्यात आले. साहजिकच ते वाढलेले होते. टॅरिफ स्लॅबनेही केली गोची वीज बिलाची आकारणी साधारणपणे चार टप्प्यांमध्ये केली जाते. ०-१००, १०१-३००, ३०१ ते ५०० आणि ५०१ च्या वर असे हे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यानुसार विजेचा दर वाढत जातो. एप्रिल, मे महिन्यातील बिलात ग्राहकांना याचाही फटका बसला आहे. 'या सगळ्या गोंधळासाठी काही प्रमाणात जबाबदार आहे,' असं एका अधिकाऱ्यानं नाव न देण्याच्या अटीवर सांगितलं. 'आयोगानं कंपन्यांना आधीच्या तीन महिन्यांच्या सरासरीनुसार वीज बिल पाठवायला सांगितले होते. त्याऐवजी मागील वर्षीच्या (२०१९) एप्रिल, मे महिन्यातील बिलाच्या आधारे या वेळचं बिल पाठवायला सांगायला हवं होतं. ते जास्त अचूक ठरलं असतं आणि गोंधळही टळला असता, असंही हा अधिकारी म्हणाला.
https://ift.tt/3fau8np
June 30, 2020 at 11:19AM
मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पाकिस्तानातून फोन

मुंबई: मुंबईतील बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. पाकिस्तानमधून हा धमकीचा फोन करण्यातआला आहे. काल, मध्यरात्री १२.३० च्या सुमारास हा धमकी देणारा कॉल आला होता. याशिवाय मुंबईतील कुलाबा आणि ताज लँड्स एंड या हॉटेलांनाही धमकीचे फोन आले होते. यानंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असलेले ताज हॉटेल बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्यानंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हॉटेल ताज पॅलेजच्या कर्मचाऱ्याने फोन उचलला. लश्कर-ए-तोयबा या संघटनेचा दहशतवादी असून, हॉटेल बॉम्बस्फोटाने उडवून देऊ. नोव्हेंबर २००८मध्ये ज्या प्रकारे हल्ला केला होता, तसाच हल्ला करू, अशी धमकी समोरून फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने दिली. या धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे. परिसरातील सुरक्षा व्यवस्था तातडीने वाढवण्यात आली आहे. यानंतर काही वेळातच वांद्र्यातील हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये दुसरा फोन केला. तेथील कर्मचाऱ्याने फोन उचलला असता, अशाच प्रकारे धमकी देण्यात आली. दोन्ही ठिकाणी एकाच क्रमांकावरून फोन करण्यात आला होता आणि तो क्रमांक पाकिस्तानातील होता, असे सांगितले जाते. हॉटेल बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्यानंतर पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेऊन हॉटेल आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली आहे. सायबर सेल या प्रकरणी तपास करत आहे. टेलिकॉम विभागाकडूनही मदत घेण्यात येत आहे. कॉल नेमका कुठून आला होता याचा तपास करण्यात येत आहे. २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी ताज हॉटेलला लक्ष्य केले होते. हा दहशतवादी हल्ला लश्कर ए तोयबाने घडवून आणला होता. दहशतवादी पाकिस्तानातून समुद्रमार्गे मुंबईत आले होते. या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा बळी गेला होता. तर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. अजमल कसाब या दहशतवाद्याला मुंबई पोलिसांनी जिवंत पकडले होते. त्यानंतर त्याला फासावर लटकवले होते.
June 30, 2020 at 10:26AM
x
कोरोनील: बाबा रामदेव यांच्याविरोधात महाराष्ट्रातील 'या' कोर्टात तक्रार
N4U
११:०५ AM
महाराष्ट्र ठळक बातम्या
,
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
'नेहरूंनी चुका केल्या असतीलही, तुम्ही १९६२ मध्ये का रांगताय?'
N4U
११:०५ AM
महाराष्ट्र ठळक बातम्या
,
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
मुंबई: चीनच्या मुद्द्यावर १९६२ पासून चर्चा करायला तयार आहोत, असं सांगणारे केंद्रीय गृहमंत्री यांना शिवसेनेनं जोरदार टोला हाणला आहे. 'पंडित नेहरूंनी १९६२ साली चुका केल्या असतीलही, तुम्ही १९६२ सालात का रांगताय? आता २०२० उजाडून जग पुढे गेले आहे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावरून देशाचे राजकारण तापले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी रोजच्या रोज नवे प्रश्न विचारून केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. तर, भाजपही काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देत आहे. चिनी फंडिंगवरून दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना अमित शहा यांनी १९६२ पासून चर्चेची तयारी दाखवली आहे. आम्ही चर्चेला घाबरत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या अनुषंगानं शिवसेनेनं 'सामना'तून भाष्य केलं आहे. 'खरे म्हणजे, १९६२ पर्यंतच्या खोलात जायची गरज आहे काय? तो भूतकाळ आता विसरायला हवा. चीनचे संकट नव्याने उसळले आहे व आपल्याला त्याच्याशी वर्तमानात सामना करून राष्ट्राचे भविष्य घडवायचे आहे. पंडित नेहरूंनी १९६२ साली चुका केल्या असतीलही, तुम्ही १९६२ सालात का रांगताय? आता २०२० उजाडून जग पुढे गेले आहे,' असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. वाचा: 'पंतप्रधान नेहरू असतील किंवा मोदी, चीनचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार आहे. पंडित नेहरू हे वेगळ्याच आदर्शवादाने भारून गेलेले नेते होते. ‘सत्यमेव जयते’ या भारत सरकारच्या ब्रीदवाक्यावर त्यांची भाबडी श्रद्धा होती. पंतप्रधान मोदी यांचा आध्यात्मिक शक्ती आणि बंधुभावावर विश्वास आहे. संकट कितीही मोठे असले तरी भारताचे संस्कार हे निःस्वार्थ भावाने सेवा करण्याची प्रेरणा देतात असे मोदी सांगतात. तेव्हा त्यांच्या भक्तांनी विरोधकांकडे डोळे वटारून पाहण्याची गरज नाही. मोदी चीनविषयी बोलतात व त्यांचे लोक विरोधकांकडे वाकड्या नजरेने पाहतात. कुछ तो गडबड है,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'भाजप-काँग्रेसनं आरोप-प्रत्यारोपांचं हे युद्ध थांबवायला हवं. मोबाइलवरील करोनाच्या कॉलर ट्यूनप्रमाणे भाजप-काँग्रेसच्या युद्धाचाही लोकांना कंटाळाला आला आहे. ‘आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही’ अशी एक कॉलर ट्यून कोणीतरी दिल्लीत सतत वाजवायला हवी,' असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.
https://ift.tt/3fau8np
June 30, 2020 at 09:49AM
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर कंटेनरच्या धडकेत कारचा चेंदामेंदा; दोघे जागीच ठार
मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर एका कंटेनरने स्वीफ्ट कारला मागील बाजूने दिलेल्या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले आहेत, तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. ती आता पूर्ववत झाली आहे. (Accident on Mumbai-Pune Expressway) आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कंटेनर मुंबईच्या दिशेनं येत होता. खोपोलीजवळ एका उतारावर असताना या कंटेनरने एका स्विफ्ट कारला मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात स्विफ्ट कारचा चुराडा झाला आहे. कारमधील दोघे जागीच ठार झाले आहेत. अचानक झालेल्या या अपघातामुळे कंटेनरच्या मागून येणाऱ्या गाड्यांचेही नियंत्रण सुटले आणि आणखी दोन गाड्या कंटेनरला धडकल्या. अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. महामार्ग पोलीस व अन्य यंत्रणा अपघातस्थळी पोहोचून अपघातग्रस्त गाड्या बाजूला करण्याचे काम सुरू केले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर गाड्या बाजूला काढण्यात आल्या असून वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. करोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक जवळपास बंद होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता वाहतूक हळूहळू वाढली आहे. त्यानंतर एक्स्प्रेस वे वर झालेला हा पहिला मोठा अपघात आहे.
https://ift.tt/3fau8np
June 29, 2020 at 09:52AM
मुंबई, पुण्यातील गर्दीवर शिवसेनेचा केंद्र सरकारला 'हा' सल्ला
मुंबई: 'मुंबई-पुण्यासारख्या शहरांत करोनाचा स्फोट होण्यास दाटीवाटीची लोकसंख्या हेच कारण आहे. , बिहारमध्ये मुंबई-पुण्यासारखी स्मार्ट शहरे उभी राहिली व तेथे रोजगार उपलब्ध झाला तरच मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल. त्यामुळे केंद्राने या राज्यांकडे व दिल्लीसारख्या शहरांकडे जास्त लक्ष द्यावे, महाराष्ट्राच्या विकासाचे काय ते आम्ही पाहू,' असा खोचक सल्ला शिवसेनेनं केंद्र सरकारला दिला आहे. (Shivsena gives advice to Modi Government) मोठ्या शहरांची भरमसाट लोकसंख्या हा विकास आणि आरोग्याचा अडथळा आहे. भविष्यात मुंबई-पुण्यातील लोकसंख्या कमी करावी लागेल, असे मत केंद्रीय मंत्री यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून त्यावर भाष्य करताना इतिहासाची उजळणी करत शिवसेनेनं केंद्र सरकारला टोला हाणला आहे. ‘मुंबईवरील उपऱ्यांचे लोंढे आवरा’, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सातत्याने सांगत होते. तेव्हा त्यांच्यावर जातीयवादी, प्रांतीयवादी आणि फुटीरतावादी असे शिक्के मारले गेले. मुंबईत परवाना पद्धती लागू करण्याची मागणी शिवसेनाप्रमुखांनी केली होती. तेव्हा केंद्रात वाजपेयींचे सरकार होते. त्यावेळी उत्तर प्रदेश-बिहारच्या मंत्र्यांनी व नेत्यांनी ‘परवाना’ पद्धतीवरून संसदेत गोंधळ घातला होता. वाजपेयींचे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी ही मागणी तेव्हा स्थगित केली, याची आठवणही शिवसेनेनं दिली आहे. अग्रलेखातील ठळक मुद्दे: मुंबईने देशाच्या लोकसंख्येचे व दिल्लीच्या तिजोरीचे ओझे नेहमीच छाताडावर घेतले, पण संकटकाळात सावरण्यासाठी मुंबईला केंद्राने कधीही सढळ हस्ते मदत केली असे दिसले नाही. मुंबईची लोकसंख्या वाढली. त्याचा भार शेवटी राज्य सरकार व मुंबई महापालिका यांनाच वाहावा लागतो. करोना संकटानंतर मुंबई, पुण्यातून आपापल्या राज्यांत गेलेले १२ ते १५ लाख मजूर पुन्हा महाराष्ट्रात परतू लागले आहेत. कारण उत्तर प्रदेश, बिहारात या मजुरांना कामच नाही. याचे कारण त्या राज्यांमध्ये विकास होऊ शकलेला नाही. उत्तर प्रदेश, बिहारचे मुख्यमंत्री कालपर्यंत ठणकावून सांगत होते की, ‘आमच्याकडे जो मजूर परत आला आहे तो पुन्हा हवा असेल तर परवानगी घ्यावी लागेल. आम्ही आमच्या मजुरांना आमच्याच राज्यात काम देऊ’. मात्र नाकाने कांदे सोलण्याचा हा प्रयत्न फार यशस्वी झालेला नाही. संपूर्ण देशात अशा शंभरावर स्मार्ट सिटीज वगैरे उभारण्याची घोषणा मोदी सरकारने केली होती. त्यापैकी किती प्रकल्पांच्या विटा रचल्या गेल्या? २५ जून २०१५ रोजी शंभर शहरांसाठी ‘स्मार्ट सिटी मिशन’ हा कार्यक्रम सुरू झाला, पण आता २०२० सुरू झाले तेव्हा या स्मार्ट सिटींचे पंधरा टक्के कामही सुरू झाले नव्हते. मुंबई-पुण्यावर आदळणारी गर्दी कमी करण्यासाठी केंद्राने इतर राज्यांमध्ये रोजगार व पायाभूत सुविधा उभ्या केल्या तर गडकरींची चिंता दूर होईल. करोनाची पर्वा न करता मुंबई-पुण्यावर गर्दीचे लोंढे आदळत आहेत. करोना संकटावर भुकेची आग मात करीत आहे असाच याचा अर्थ आहे.
https://ift.tt/3fau8np
June 29, 2020 at 09:04AM
आदल्या दिवशी फुललेली बाग दुसऱ्या दिवशी... शेतकऱ्याला बसला धक्का
म. टा. प्रतिनिधी, नगर: लॉकडाउनच्या काळात चोरीच्या घटना काही प्रमाणात कमी झाल्या होत्या. मात्र, लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यानंतर गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. तालुक्यातील खंदरमाळ येथील डाळिंबाच्या बागेतील तब्बल ८० हजार रुपयांची फळे चोरट्याने लंपास केली. काल, शनिवारी पहाटे हा प्रकार घडला असून या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाउन काळात कमी झालेले चोरीचे प्रमाण आता 'अनलॉक १' नंतर पुन्हा वाढू लागले आहे. खंदरमाळ (ता. संगमनेर) येथे तर चक्क डाळिंबाच्या बागेत प्रवेश करून तेथील डाळिंबाची फळे तोडून चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. खंदरमाळ येथे भाऊसाहेब बाळाजी ठोके यांच्या मालकीची डाळिंबाची बाग आहे. या बागेची चांगली देखरेख ते करीत होते. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यातच त्यांच्या डाळिंबाच्या बागेवरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. काल पहाटे १ ते ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या डाळिंबाच्या बागेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी झाडावरील डाळिंबाची फळे तोडून चोरून नेली. बागेमधील डाळिंबाच्या फळांची चोरी झाल्याचे लक्षात येताच भाऊसाहेब ठोके यांनी घागरगाव पोलीस ठाणे गाठले. आपल्या शेतातील जवळपास ८० हजार रुपये किंमतीची ५० कॅरेट डाळिंबाची तयार फळे अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबत त्यांनी तक्रार दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी राजेंद्र लांघे हे करीत आहेत.
https://ift.tt/3fau8np
June 28, 2020 at 01:27PM
खुनातील गुन्हेगार पॅरोलवर सुटला अन् मंदिरातील दानपेट्यांवर मारला डल्ला
उद्धव गोडसे, कोल्हापूर: कारागृहात करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पॅरोलवर बाहेर सोडलेले कैदी आता पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. कळंबा कारागृहातील कैद्याने पॅरोलवर बाहेर येताच कोल्हापूर शहरातील मंदिरांचे दरवाजे उचकटून दानपेट्या लंपास केल्या. पाच मंदिरांमधील दानपेट्या पळवल्यानंतर अखेर तो लक्ष्मीपुरी पोलिसांच्या हाती लागला. किरण भगवान मोहिते (वय ३४, रा. मार्केट यार्ड) असे चोरट्याचे नाव आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण मोहिते हा सराईत चोरटा आहे. यापूर्वीही त्याने शहरातील मंदिरांमधील दानपेट्या पळवल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी त्याने शहरातील जुना राजवाडा आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मंदिरांचे दरवाजे उचकटून चोऱ्या केल्या होत्या. राजर्षी शाहू मार्केट यार्ड परिसरात एका फळ विक्रेत्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी त्याला शिक्षा झाली होती. करोनाचा संसर्ग सुरू झाल्याने कळंबा कारागृहातून त्याला पॅरोल मिळाला. महिनाभरापूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता. कारागृहातून सुटका होताच त्याने पुन्हा मंदिरांना लक्ष्य केले. लॉकडाउनमुळे घरांपेक्षा मंदिरांमध्ये चोरी करणे अधिक सुरक्षित वाटल्याने त्याने मंदिरांमधील दानपेट्यांवर डल्ला मारला. रात्रीच्या अंधारात कटावणीने मंदिरांचे दरवाजे उचकटून तो मंदिरात प्रवेश करीत होता. पैसे काढून घेऊन तो दानपेटी भंगारात देत होता. यापूर्वी त्याने मंदिरातील मूर्तींवरील दागिनेही लंपास केले होते. महानगर पालिकेसमोरील शनी करताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. यावरून लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने मंदिरांमध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून आणखी काही चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्यता पोलीस उपनिरीक्षक सुनीता शेळके यांनी व्यक्त केली आहे.
June 28, 2020 at 12:17PM
काँग्रेसच्या बचावासाठी शिवसेना धावली, भाजपला दिला 'हा' सल्ला
मुंबई: 'आपल्या देशातील अनेक राजकीय पक्ष व पुढारी हे परराष्ट्रांचे लाभार्थी आहेत. फक्त काँग्रेसच नाही. भाजपने यावर बोलणे म्हणजे चिखलात दगड मारून स्वतःच्या अंगावर शिंतोडे उडवून घेण्यासारखे आहे. हमाम मे सब नंगेच आहेत. भाजपला काँग्रेस पक्षाशी नंतर कधीही लढता येईल. पण आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला,' असा टोला शिवसेनेनं मोदी सरकारला हाणला आहे. वाचा: लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यापासून काँग्रेसनं मोदी सरकारला घेरलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी रोजच्या रोज नवे प्रश्न उपस्थित करून सरकारला कात्रीत पकडत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनं काँग्रेसला मिळणाऱ्या चिनी पैशांचा मुद्दा उपस्थित केला आहे. राजीव गांधी फाऊंडेशनला दिल्लीतील चिनी वकिलातीकडून घसघशीत देणगी मिळाली, असा आरोप भाजपनं केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखात यावर भाष्य करण्यात आलं आहे. 'सध्या चीनबरोबर लढण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. गलवान खोऱ्यात चीनकडून नव्याने बांधकाम सुरू झाले आहे. अरुणाचल, सिक्कीम मार्गाने त्यांचे सैन्य धडक मारत आहे. त्यामुळे राजकीय साठमारी बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे,' असा सल्ला अग्रलेखातून देण्यात आला आहे. 'हे संकट भाजप किंवा काँगेसवर नाही; तर देशावरील संकट आहे. संपूर्ण देशाचीच प्रतिष्ठा आणि प्रतिमा पणास लागली आहे. चीन दगाबाज आहे व त्याच्या कुरापती सदैव सुरूच राहतील. पण या कुरापती थांबविण्यासाठी आमची योजना काय आहे, असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे. 'राजीव गांधी फाऊंडेशनला दिल्लीतील चिनी वकिलातीकडून घसघशीत देणगी मिळाली असा फुगा भाजपने फोडला आहे. भाजपने त्या देणगीची माहिती प्रसिद्ध केल्याने सीमेवरील चीनच्या हालचालीवर निर्बंध येणार आहेत काय? राजीव गांधी फाऊंडेशनला दिलेल्या देणग्यांचा संबंध चिनी घुसखोरी किंवा आमचे जे २० जवान शहीद झाले त्या घटनांशी असेल तर भाजपने तसे स्पष्ट करावे,' असं आव्हानही शिवसेनेनं दिलं आहे. वाचा: ही आहे सरकारची युद्धनीती 'भारताचे संरक्षणमंत्री रशियाचा दौरा करून आले व तेथून ते शस्त्र, दारूगोळा (ब्रह्मास्त्र) मागवणार आहेत. भाजपचे दिल्लीतील नेते चीनवर शाब्दिक हल्ले करत आहेत. त्यामुळं सीमेवर हालचाली करणारी लाल माकडे घाबरून पळून जातील असे त्यांना वाटते. सरकारी कृपावंत मीडिया व सोशल माध्यमांवरील रिकाम्या फौजा ‘‘भारतीय कूटनीतीपुढे चीनची माघार किंवा शरणागती’’ अशा बातम्यांचे हवाबाण हरडे सोडून लोकांना भ्रमित करीत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांच्यावरच चीनचे हस्तक किंवा दलाल असल्याचे ठपके ठेवले जात आहेत,' ही मोदी सरकारची चीन विरुद्धची युद्धनीती असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
https://ift.tt/3fau8np
June 27, 2020 at 09:24AM
'मराठा, शीख रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या का?'
मुंबई: 'बिहारची आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढं ठेवून पंतप्रधान हे सैन्य दलातील बिहार रेजिमेंटच्या नावाचा वापर करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. 'देशावर यापूर्वी अनेकदा संकटे आली, तेव्हा इतर रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय,' असा सवालही शिवसेनेनं मोदींना केला आहे. (Shivsena targets Modi in ) वाचा: भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार आज शिवसेनेनंच मुखपत्र दैनिक 'सामना'तून घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगानं भाजपच्या आणि मोदींच्या राजकारणावरही टीका करण्यात आली आहे. 'पवारांनी छोट्या समूहांचा राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप पडळकर यांनी केला होता. त्याला उत्तर देताना शिवसेनेनं भाजपच्या राजकारणाचेही दाखले दिले आहेत. 'गोपीचंद पडळकर यांना भाजपनं आमदार केलं यामागे देखील लहान समूहांना वापरण्याचं राजकारणच आहे. या राजकारणात पंतप्रधान मोदीही तरबेज झाले आहेत,' असं शिवसेनेनं मोदींच्या एका भाषणाचा दाखला देऊन म्हटलं आहे. बिहारमधून गरीब कल्याण रोजगार अभियानाचा प्रारंभ करताना नुकताच पंतप्रधान मोदी यांनी बिहारच्या जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी गलवान खोऱ्यात बिहार रेजिमेंटनं गाजवलेल्या शौर्याचं स्मरण केलं होतं. प्रत्येक बिहारीला ''चा अभिमान असायला हवा, असं मोदी म्हणाले होते. तोच धागा पकडत शिवसेनेनं मोदींवर टीका केली आहे. 'गलवान खोर्यात ‘बिहार रेजिमेंट’ने शौर्य गाजवले असे पंतप्रधान मोदी यांनी काल सांगितले. देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय?,' असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे. 'पुलवामात कालच महाराष्ट्राचे वीरपुत्र सुनील काळे शहीद झाले, पण बिहारात निवडणुका आहेत म्हणून सैन्य दलातील ‘जात’, ‘प्रांत’ यास महत्त्व आणले जात आहे. हे राजकारण म्हणजे करोनापेक्षा भयंकर गजकर्ण आहे! महाराष्ट्रात हा गजकर्ण खाजवण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहे', असा आरोप शिवसेनेनं केला आहे. वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही एक ट्विट करून मोदींवर टीका केली होती. 'पंतप्रधानांनी बिहार रेजिमेंटबद्दल केलेलं वक्तव्य शेअर करून भारतीय सैन्याला जातीपातीत वाटू नका, असं आव्हाड यांनी म्हटलं होतं. 'बिहारमध्ये याच वर्षी ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत,' अशी आठवणही त्यांनी या ट्विटमधून करून दिली होती.
https://ift.tt/3fau8np
June 26, 2020 at 11:23AM
इंदोरीकर महाराज कायद्याच्या कचाट्यात; आजपासून चालणार खटला
अहमदनगर: कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी कीर्तनातून प्रसुतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध अखेर कोर्टात फिर्याद दाखल करण्यात आली. येथील कोर्टासमोर आज हे प्रकरण सुनावणीसाठी येणार असून न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आपल्या वक्तव्यासंबंधी त्यांनी केलेला खुलासा कायद्याच्या जिल्हास्तरीय समितीने पूर्वीच फेटाळला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार संगमनेर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही फिर्याद दिली आहे. ‘सम तिथीला संबंध ठेवल्यास मुलगा होतो व विषम तिथीला मुलगी,’ असे वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तेथे झालेल्या निर्णयानुसार इंदोरीकरांना संगमनेर ग्रामीण रुग्णालयामार्फत नोटीस देण्यात आली. त्यावर खुलासा करताना इंदोरीकरांनी हे आरोप फेटाळून लावले. आपला कोणताही यू ट्यूब चॅनल नाही, आपण कोठेही व्हिडिओ व्हायरल केलेले नाहीत. उलट आपल्या बदनामीसाठी कोणी तरी चुकीचे व्हिडिओ व्हायरल करत असून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मधल्या काळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याचा पाठपुरावा सुरू केला. समितीच्या जिल्हाध्यक्ष ऍड. रंजना गावंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटून सविस्तर निवेदन दिले. सोबत पेन ड्राईव्ह व सीडीद्वारे पुरावेही दिले. यानुसार कायद्याचा भंग झाल्याचे आढळून येत असून सरकारी यंत्रणेने कारवाई केली नाही, तर आम्ही पुढील कायदेशीर मार्गाचा अवलंब करू असा इशाराही गवांदे यांनी दिला होता. आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील आणि नाशिकचे उपसंचालक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी यांनीही जिल्हा आरोग्य यंत्रणेला या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते. कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना हे प्रकरण राजकीय आणि सामाजिक पातळीवरही गाजत राहिले. अनेकांनी इंदोरीकरांचे समर्थन केले. त्यांचे सामाजप्रबोधनाचे काम लक्षात घेऊन बोलताना काही चुकून शब्द निघाले असतील तर दुर्लक्ष करावे. ते जे बोलले त्याचा उल्लेख ग्रंथात आहे असे अनेक बचाव करण्यात आले. सरकारमधील काही घटकांनीही त्यांच्याबद्दल सहानुभूतीची आणि बचावाची भूमिका घेतल्याचे आढळून आले. मधल्या काळात ज्या व्हिडिओ लिंकच्या अधारे हे आरोप होत होते, त्या लिंक आणि व्हिडिओ इंटरनेटवर आढळून येत नसल्याचा अहवाल सायबर पोलिसांनी तपास यंत्रणेला दिला होता. त्यामुळे प्रकरण संपल्यात जमा असल्याचेही मानले जाऊ लागले. तसेच दोन्ही बाजूंनी दबाव वाढत असल्याने यंत्रणेने गोपनीयता पाळून काम सुरू ठेवले. मात्र, यासंबंधी कोणतेही निर्णय जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत घ्यावे लागतात. त्यानुसार मार्च महिन्यातच या समितीची बैठक १२ मार्च रोजी झाली. या बैठकीत तक्रार, खुलासा, अंनिसने दिलेले व्हिडिओ, वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या, इंदोरीकरांनी दिलेल्या मुलाखती यांचा विचार करण्यात आला. त्यानुसार समितीमधील कायदेशीर तज्ज्ञ, समिती वैद्यकीय अधिकारी आणि अन्य सदस्य या सर्वांनी एकमताने इंदोरीकरांनी सादर केलेला खुलासा फेटाळून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. या कायद्यातील कलम २२ चा भंग केल्याचा गुन्हा संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दाखल करण्यासाठी संगमनेर तालुका वैद्यकीय अधीक्षक यांना प्राधिकृत करण्यात आले. मात्र, मधल्या काळात करोनाचा उद्रेक झाल्याने तसेच लॉकडाउन असल्याने पुढील कामकाज ठप्प झाले होते. आता त्याला पुन्हा वेग आला आहे. संगमनेर तालुका वैदयकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी फिर्याद आणि पुराव्याची कागदपत्रे अलीकडेच न्यायालयात दाखल केली आहेत. हे प्रकरण आज कोर्टासमोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यावर पुढील प्रक्रिया सुरू होईल.
https://ift.tt/3fau8np
June 26, 2020 at 10:00AM
पडळकरांच्या पवारांवरील टीकेबाबत शिवसेनेला 'ही' शंका
मुंबई: ' हे काही राजकारण किंवा समाजकारणातले महान व्यक्तिमत्त्व नाही. यांनी धनगर समाजातील एक धडपड्या तरुण म्हणून त्यांना भाजपच्या सोयीसाठी वापरले आहे. त्यामुळे गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची ‘मन की बात’ तर नाही ना, अशी शंका शिवसेनेनं व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे यांना मागे ठेवून भाजपने त्यांच्या राजकीय पडद्यावर नवा गोपीचंद आणला आहे. या गोपीचंदच्या करामतींमुळे भाजपवर गावागावात चपलांचा प्रसाद खाण्याची वेळ आली आहे, असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे. (Shivsean targets and BJP) 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले करोना आहेत', अशी टीका भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत केली होती. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून या प्रकरणावर भाष्य करण्यात आलं आहे. शिवसेनेनं पडळकरांबरोबरच भाजपवरही निशाणा साधला आहे. 'गोपीचंद यांनी पवारांबाबत जी वक्तव्ये केली तशी भाजपच्या काही नेत्यांनी अधूनमधून केलीच आहेत. पडळकर यांच्या विधानाशी भाजपचा संबंध नाही असा साळसूदपणाचा आव आता भाजपने आणला. हे सगळ्यात मोठे ढोंग आहे. मोदी यांच्यावर टीका करणार्यांना हे लोक देशद्रोही ठरवतात आणि पवारांवर तशीच टीका करणार्यांपासून मात्र स्वतःला झटकतात, असा संताप व्यक्त करण्यात आला आहे. 'एक-दोन वर्षांपूर्वी पंढरपूरचे एक भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवरील सैनिकांच्या पत्नींबाबत खालच्या पातळीवरचे विधान केले होते. एकप्रकारे ती सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची मानखंडनाच होती. त्या आमदारालाही भाजपने आधी झटकले आणि पुन्हा जवळ केले. गोपीचंदच्या बाबतीतही तेच घडेल,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. अग्रलेखातील ठळक मुद्दे: पवारांची ज्येष्ठता, अनुभव, व्यासंग, समाजकारण याचा गौरव पंतप्रधान मोदी यांनीही अनेकदा केला आहे. पवार यांना महाराष्ट्रात आणि देशात मोठा मान आहे. पवार हे आपले गुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न डगमगता सांगितले आहे. शरद पवार यांच्याबाबत राजकीय मतभेद असू शकतात. त्यांच्यावर टीकाटिप्पणी होऊ शकते. लोकशाहीत हे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, पण पवारांसारख्या ज्येष्ठांवर अशा घाणेरड्या शब्दांत टीका करणार्यांनी स्वतःचे पाय कोठे आहेत, आपली लायकी काय याचे आत्मपरीक्षण आधी करावे. गोपीचंद हे आज भाजपच्या बिळात शिरले आहेत. बिळातला बिनविषारी साप जोरात डंख मारतो तसे पडळकरांनी केले. पडळकरांनी सांगलीमध्ये भाजपविरोधात निवडणूक लढवली. ‘भाजपसाठी कधी मत मागायला आलो तर मला जोड्याने मारा,’ असे हेच पडळकर तेव्हा सांगत. पुढे हेच पडळकर भाजपमध्ये आले व बारामतीत अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढले. बारामतीत धनगर समाज मोठ्या प्रमाणात असूनही पडळकरांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामुळे या महाशयांचा अजेंडा, व्हिजन वगैरेबाबत गोंधळ आहे. पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह नाहीत हा गोपीचंद यांचा आक्षेप आहे. यात पवारांचा संबंध येतोच कुठे? हा फैसला फडणवीस सरकारने करायचा होता. २०१४ मध्ये फडणवीस सरकार आलेच हेते व धनगर आरक्षणाचा ठराव पहिल्याच कॅबिनेटमध्ये करू असे वचन भाजपचेच होते, हे गोपीचंद कसे विसरले? कोणताही अभ्यास, संदर्भ, जनमत पाठीशी नसलेले लोक भाजपने भरती करून स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतली आहे ती अशी! पवारांनी बहुजन समाजातील अनेक तरुणांना राजकारणात पुढे आणले. तसे नसते तर दिवंगत आर. आर. पाटील तसेच जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे ही नावे राजकारणात तळपताना दिसली नसती. पवारांच्या मंत्रिमंडळाचा तोंडवळा हा बहुजनांचाच राहिला. त्यामुळं ६० ते ७० वर्षांत पवारांनी बहुजन समाजाला झुलवत ठेवले अशी वाचाळकी करणे हे मूर्खाचे लक्षण तर आहेच, पण मनाला कोरोना झाल्याचीही लक्षणे आहेत. त्यामुळे गोपीचंद यांची मानसिक अवस्था समजून घेतली पाहिजे. जाणकर नकोसे का झाले? कालपर्यंत महादेव जानकर हे भाजपचे होते. जानकरांच्या मुखातून पवारांवर टीका केली. आता जानकर नकोसे झाले. कारण ते मुंडेनिष्ठ आहेत. हेसुद्धा जातीय राजकारणच आहे. पवार हे लहान समूहांचा वापर करतात असे गोपीचंद म्हणतात. मग गोपीचंद यांना भाजपने आमदार का केले? हेदेखील लहान समूहांना वापरण्याचे राजकारणच आहे. या राजकारणात पंतप्रधान मोदीही तरबेज झाले.
https://ift.tt/3fau8np
June 26, 2020 at 09:09AM
मुंबईत बँकेच्या कार्यालयात मोठी आग; महत्त्वाची कागदपत्रे खाक
मुंबई: नरीमन पॉइंट भागातील जॉली मेकर इमारतीतील एका बँकेच्या कार्यालयात आज पहाटे आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत कुणीही जखमी झाले नसले तरी बँकेतील कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याची माहिती आहे. () जमनालाल बजाज मार्गावर असलेल्या जॉली मेकर चेंबर २ या इमारतीच्या तळमजल्यावर बँक ऑफ बहरीन अँड कुवेतचे कार्यालय आहे. सुमारे ४ हजार चौरस फुटांच्या या कार्यालयातील सर्व्हर रूममध्ये ही आग लागली. आगीत बँकेतील फर्निचर, एसी, संगणक, इलेक्ट्रिक वायरिंग व काही फाइल्स जळून खाक सांगण्यात येते. दरवाजे, खिडक्या बंद असल्यामुळं धुराचे लोट संपूर्ण कार्यालयात पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बँकेचा दरवाजा तोडला आणि कुलिंग ऑपरेशन सुरू केले. बऱ्याच प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग नेमकी कशामुळं लागली याचं कारण समजू शकलेलं नाही. या प्रकरणी चौकशी सुरू आहे.
June 25, 2020 at 09:06AM
...मग शिवसेनेला मुख्यमंत्रिपद का दिलं नाही?; राष्ट्रवादीचा सवाल
मुंबई: 'शिवसेनेला सोडून राज्यात सत्ता स्थापन करायची नाही अशी भाजपची भूमिका होती तर शिवसेनेला मुख्यमंत्रिपद का दिलं नाही,' असा रोकडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या यांनी विरोधी पक्षनेते यांना केला आहे. राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांना मंगळवारी दिलेल्या एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांपूर्वी राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींबद्दल आपली बाजू मांडली होती. शिवसेनेनं आपल्याला दगा दिला, शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता, असं त्यांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांकडून आम्हाला सत्तास्थापनेची ऑफर होती. मात्र, शिवसेनेला वगळून आम्हाला राज्यात सरकार स्थापन करायचं नाही अशी आमची भूमिका होती, असा दावाही फडणवीस यांनी या मुलाखतीत केला होता. फडणवीस यांच्या या दाव्याची विद्या चव्हाण यांनी खिल्ली उडवली आहे. 'देवेंद्र फडणवीस हे अजूनही भ्रमित अवस्थेत आहेत. ते करत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांना शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांनी सेनेला मुख्यमंत्रीपद का दिले नाही, असा प्रश्न चव्हाण यांनी केला. 'राज्यात महाविकास आघाडीचं सरकार चांगलं काम करत आहे. फडणवीस यांनी हे वास्तव स्वीकारायला हवं, असा टोलाही त्यांनी हाणला. त्या 'टीव्ही ९' या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. वाचा: काय म्हणाले होते फडणवीस? 'मी मुख्यमंत्री असताना काँग्रेसला वेगळे पाडून राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाकडून निर्देश होते. राष्ट्रवादीही याला तयार होती. मात्र हे करत असताना शिवसेनाही सत्तेत राहील, ही अट ठेवण्यात आल्याने राष्ट्रवादी सत्तेत आली नाही', असे ते म्हणाले. 'शिवसेनेने पाठ फिरवल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाची व आपलीही राष्ट्रवादीशी बोलणी झाली होती. राष्ट्रवादी व भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे ठरले होते. तसेच हे अजित पवार यांच्यासोबत नव्हे, तर थेट राष्ट्रवादीसोबत ठरले होते', असे ठासून सांगत त्यांनी शरद पवार यांच्याकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवले होते.
https://ift.tt/3fau8np
June 24, 2020 at 09:19AM
'महाराष्ट्रासारखे धाडसी पाऊल इतर राज्यांनी का उचलू नये?'
मुंबई: 'गलवान खोर्यात चिन्यांनी आमच्या सैनिकांचे रक्त सांडताच महाराष्ट्राने चिन्यांबरोबरचे उद्योग करार स्थगित केले आहेत. तसे धाडसी आणि राष्ट्रभक्तीचे पाऊल इतर राज्यांनी अद्याप का उचलू नये?,' असा रोकडा सवाल शिवसेनेनं केला आहे. भारत-चीन सीमेवर झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. त्यामुळं चीनविरोधात संपूर्ण देशात रोष आहे. चिनी वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. केंद्र सरकारनंही याबाबत ठोस पाऊल उचलावं अशी अपेक्षा आहे. हे सर्व सुरू असतानाच महाराष्ट्र सरकारनं ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’अंतर्गत चिनी कंपन्यांसोबत करण्यात आलेले तीन करार तूर्त स्थगित केले आहेत. त्याच अनुषंगानं शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'तून भाजपशासित राज्यांना प्रश्न करण्यात आला आहे. गलवान खोर्यात रक्तपात होण्याआधीच महाराष्ट्राने चिनी कंपन्यांशी करार केले होते. त्यामुळं हे करार रद्द करण्याची नैतिक जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर नव्हती, पण महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांची परंपरा सांगतो. हिंदुस्थानी जवानांशी निर्घृणपणे वागणार्या चिनी माकडांशी व्यापार-उद्योग करणे हा त्या जवानांच्या हौतात्म्याचा अपमान ठरेल. चीनला जमिनीवर फक्त इंच इंच मारायचे नाही, तर आर्थिक आघाडीवर पैशापैशालाही मारावे, या भूमिकेतून ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. वाचा: उत्तर प्रदेश, गुजरात आणि हरयाणा या राज्यांतही चिनी कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. सध्याच्या परिस्थितीत तेथील राज्य सरकारे त्या चिनी गुंतवणुकीबाबत काय निर्णय घेणार आहेत? की त्याग, राष्ट्रभक्तीचा मक्ता फक्त महाराष्ट्राच्या वाट्यालाच आला आहे? चिनी गुंतवणुकीचे काय करायचे याबाबत मोदी सरकारने एक राष्ट्रीय धोरण जाहीर करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे. मोदी सरकारने छाछूगिरी सोडावी! 'चीनचे आर्थिक कंबरडे मोडायला हवे यात दुमत नाही. चीनबरोबर लढायचे असेल तर राजकारण कमी, राष्ट्राचा विचार जास्त करावा लागेल. त्यासाठी प्रे. ट्रम्पची गरज नाही. आत्मनिर्भर स्वतःलाच व्हावे लागते. पण, त्यासाठी मोदी सरकारने इतर ‘छाछूगिरी’ सोडून औद्योगिक प्रगतीसाठी लागणार्या साधनसामग्रीच्या निर्मितीवर भर द्यायला हवा, असा खोचक सल्लाही 'सामना'तून देण्यात आला आहे. वाचा: वाचा:
https://ift.tt/3fau8np
June 23, 2020 at 09:07AM
५ जणांचा बळी घेणाऱ्या ताडोबातील 'शिकारी' वाघाचा मृत्यू
म.टा.प्रतिनिधी, नागपूरः ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील कोलारा भागात पाच जणांचे बळी घेणार्या आणि केटी१ नावाने ओळखल्या जाणार्या वाघाचा सोमवारी सकाळी गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात मृत्यू झाला. अत्यंत धडधाकट समजल्या जाणार्या या वाघाला पकडून काही दिवसांपूर्वीच गोरेवाडा येथे आणले गेले होते आणि त्याला क्वारंटाइन करून ठेवले गेले. ताडोबाजवळील परिसरात तेंदूपत्ता आणि सरपण जमा करायला गेलेल्या ग्रामस्थांवर हल्ले करून या वाघाने चार महिन्यात पाच जणांचे बळी घेतले होते. त्यामुळे, १० जून रोजी या वाघाला जेरबंद करण्यात आले आणि ११ जून रोजी येथील गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात पाठविण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार गोरेवाड्यात आणल्यापासून या वाघाच्या खाण्यावर परिणाम झाला होता. बंदिस्त वातावरणात जुळवून घेणे त्याला कठीण गेले. सुरुवातीचे सलग तीन दिवस काहीही न खाता खाल्ल्यावर त्याने खाणे सुरू केले होते. गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे तज्ज्ञ या वाघावर उपचार करीत होते. या वाघाची प्रकृती अत्यंत चांगली होती आणि आजारपणाची कोणतीही लक्षणे त्याच्यामध्ये नव्हती. वाचाः सोमवारी सकाळी प्राणी बचाव केंद्राचे कर्मचारी या वाघाच्या पिंजर्याजवळ गेले असता हा वाघ मृतावस्थेत आढळला. पशुवैद्यकीय अधिकार्यांनी गोरेवाडा येथील रुग्णालयात या वाघाचे शवविच्छेदन केले. गोरेवाडा परिसरात या वाघाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपूर पशुवैद्यकीय कॉलेजच्या डॉ. माधुरी हेडाऊ, डॉ. मयूर पावशे, डॉ. के. सुजिथ, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे हेमंत कामडी, मानद वन्यजीवरक्षक कुंदन हाते, डॉ. शिरीष उपाध्ये, गोरेवाडा येथील विभागीय व्यवस्थापक नंदकुमार काळे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दुखापतीमुळे या वाघाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज गोरेवाडा व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. वाचाः
https://ift.tt/3fau8np
June 22, 2020 at 06:13PM
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)