N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

आदल्या दिवशी फुललेली बाग दुसऱ्या दिवशी... शेतकऱ्याला बसला धक्का

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

म. टा. प्रतिनिधी, नगर: लॉकडाउनच्या काळात चोरीच्या घटना काही प्रमाणात कमी झाल्या होत्या. मात्र, लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यानंतर गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. तालुक्यातील खंदरमाळ येथील डाळिंबाच्या बागेतील तब्बल ८० हजार रुपयांची फळे चोरट्याने लंपास केली. काल, शनिवारी पहाटे हा प्रकार घडला असून या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाउन काळात कमी झालेले चोरीचे प्रमाण आता 'अनलॉक १' नंतर पुन्हा वाढू लागले आहे. खंदरमाळ (ता. संगमनेर) येथे तर चक्क डाळिंबाच्या बागेत प्रवेश करून तेथील डाळिंबाची फळे तोडून चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. खंदरमाळ येथे भाऊसाहेब बाळाजी ठोके यांच्या मालकीची डाळिंबाची बाग आहे. या बागेची चांगली देखरेख ते करीत होते. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यातच त्यांच्या डाळिंबाच्या बागेवरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. काल पहाटे १ ते ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या डाळिंबाच्या बागेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी झाडावरील डाळिंबाची फळे तोडून चोरून नेली. बागेमधील डाळिंबाच्या फळांची चोरी झाल्याचे लक्षात येताच भाऊसाहेब ठोके यांनी घागरगाव पोलीस ठाणे गाठले. आपल्या शेतातील जवळपास ८० हजार रुपये किंमतीची ५० कॅरेट डाळिंबाची तयार फळे अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबत त्यांनी तक्रार दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी राजेंद्र लांघे हे करीत आहेत.

https://ift.tt/3fau8np
June 28, 2020 at 01:27PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा