N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

मोदींच्या 'मन की बात'वर राहुल गांधी यांचा निशाणा, म्हणाले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी यांच्या '' कार्यक्रमावर टिप्पणी केली आहे. राष्ट्ररक्षण आणि सुरक्षेची 'बात' कधी होणार, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत विचारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी आपल्या 'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमात देशातील जनतेला संबोधित केले. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती. संपूर्ण देशाला सत्य काय आहे हे ऐकायचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते. देशात वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरूनही त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरले होते. मोदी सरकारने करोनाची साथ आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती अनलॉक केलेल्या आहेत, असे एका ट्विटमध्ये राहुल म्हणाले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकारला जोरदार हल्लाबोल करत ट्विटद्वारे विविध प्रश्न विचारत आहेत. लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक घटनेत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर सैनिकांच्या हौतात्म्यावर राहुल गांधी यांनी सतत प्रश्न विचारत आहेत. दरम्याच्या काळात त्यांनी शनिवारी पुन्हा करोना विषाणूच्या संसर्गाबाबत प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. करोनाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरताना केंद्र सरकारकडे करोनाशी दोन हात करण्यासाठी कोणतीही योजना नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. वाचा: करोना विषाणूचा संसर्ग तीव्र गतीने होत असून देशातील नव्या भागांमध्ये देखील हा संसर्ग पसरत चालला आहे. भारत सरकाकडे या साथीच्या आजारावर मात करण्यासाठी कोणतीही योजना नाही. पंतप्रधानांनी मौन धारण केले आहे. त्यांनी करोना साथीपुढे शरणागती पत्करली आहे आणि करोनाशी लढण्यास इन्कार केला आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या पाच लाखांहून अधिक झालेली असताना राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा: वाचा:

https://ift.tt/3fcy07h
June 28, 2020 at 12:48PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा