राजेश टोपेंनी शेअर केला खास व्हिडिओ, डॉक्टरांना सलाम
N4U
११:०५ AM
महाराष्ट्र ठळक बातम्या
,
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

मुंबई: राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री यांनी सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. टोपे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक खास व्हिडिओ शेअर करत करोना योद्ध्यांना सलामही केला आहे. (Health Minister salute Doctors) दरवर्षी १ जुलै हा दिवस देशात '' म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर देत असलेल्या आरोग्य सेवेबद्दल या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. जगात सध्या करोनाची महासाथ असल्यामुळं आजच्या डॉक्टर दिनाला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी एक ट्विट केलं आहे. 'आज डॉक्टर्स डे निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा! तसा तुमचा कुठला असा एक दिवस असू नये. कारण डॉक्टर्स नेहमीच देवासमान आहेत. कोविडसारख्या कठीण प्रसंगात डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस, मीडिया प्रतिनिधी यांनी जे कर्तव्य बजावलय ते अतुलनीय आहे,' असं टोपे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ट्विटसोबत टोपे यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई दिसते. त्यानंतर लॉकडाऊन अशी अक्षरे दिसतात आणि नंतर व्हिडिओत पूर्णपणे थांबलेले बंद झालेली मुंबई दिसते. त्यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधव डॉक्टर व आरोग्य सेवकांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना दिसतो. आरोग्यमंत्री टोपे यांनीही व्हिडिओतून संदेश दिला आहे. 'ही मुंबई, हे राज्य आणि हा देश पुन्हा धावेल. पुन्हा हसण्या-खिदळण्याचे आवाज येतील. नवी आशा, नवी उमेद घेऊन सगळे मिळून करोनाला हरवू,' असं त्यांनी म्हटलं आहे. 'एक सलाम सैनिकांना, एक करोना योद्ध्यांना' असं त्यांनी म्हटलं आहे. वाचा: डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी डॉक्टर दिन साजरा केला जातो. करोना महामारी आल्यापासून देशभरातील डॉक्टर दिवसरात्र आरोग्य सेवा देत आहेत. अनेक डॉक्टरांनाही करोनाच्या आजारानं ग्रासलं आहे. असं असूनही डॉक्टर एखाद्या योद्ध्यासारखे लढत आहेत. राजेश टोपे यांनी आतापर्यंत अनेक वेळा डॉक्टरांशी संवाद साधला आहे. त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. आज त्यांनी खास व्हिडिओ शेअर करून व पत्र लिहून डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
https://ift.tt/3fau8np
July 01, 2020 at 09:28AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा