चीन, आफ्रिकेतून बनावट करोना लस जप्त; इंटरपोलची मोठी कारवाई
Coronavirus vaccine: करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी जगभरात करोना लशीची प्रतिक्षा केली जात असताना दुसरीकडे करोनाच्या लशीचे बनावट डोस Coronavirus vaccine: करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी जगभरात करोना लशीची प्रतिक्षा केली जात असताना दुसरीकडे करोनाच्या लशीचे बनावट डोस बनवले जात आहे. इंटरपोलने दक्षिण आफ्रिकेत मोठी कारवाई केली असून बनावट लशींचा साठा जप्त केला आहे.
हायलाइट्स:
- करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू
- दक्षिण आफ्रिकेतील एका गोदामातून करोना लशीच्या ४०० व्हायल्स जप्त
- इंटरपोलची दक्षिण आफ्रिकेत मोठी कारवाई
- जोहान्सबर्ग: जगभरात थैमान घालत असलेल्या करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. करोनाची लस घेण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे बनावट लशीचा धोकादेखील वाढला आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका गोदामातून करोना लशीच्या ४०० व्हायल्स (लशीची छोटी कुप्पी) जप्त केल्या आहेत. इंटरपोलने ही कारवाई केली आहे.
- 'द गार्डियन'ने दिलेल्या वृत्तानुसार, जप्त करण्यात आलेल्या व्हायल्सद्वारे २४०० डोस दिले जाऊ शकतात. जोहान्सबर्गपासून जवळ असलेल्या जर्मिस्टोन येथील एका गोदामावर टाकलेल्या छाप्यात या बनावट लशी जप्त करण्यात आल्या. त्याशिवाय बनावट मास्कही जप्त करण्यात आले आहेत. इंटरपोलने चीन, झांबियाचे नागरिकत्व असलेल्या तिघांना अटक केली आहे.
- याआधी काही दिवसांपूर्वी चीनमध्ये पोलिसांनी बनावट लस पुरवठा करणारे रॅकेट उघडकीस आणले होते. या प्रकरणी ८० हून अधिकजणांना अटक करण्यात आली होती. या टोळीकडून मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यांपासून बनावट लशींचा पुरवठा सुरू होता. पोलीस या बनावट लशींच्या मागावर होते. अखेर या टोळीपर्यंत पोहचण्यास पोलिसांना यश आले.
- इंटरपोलने या वर्षाच्या सुरुवातीलाच ऑरेंज नोटीस जारी करून बनावट लशीचा धोका असल्याचा इशारा दिला होता. गुन्हेगारांच्या रॅकेटकडून कोविड लशीला लक्ष्य करण्यात येणार असल्याची शक्यता इंटरपोलने व्यक्त केली होती. करोना लशी संदर्भात दक्षिण आफ्रिका आणि चीनमध्ये आढळलेली प्रकरणे ही हिमनगाची टोक असण्याची शक्यता इंटरपोलने व्यक्त केली. दक्षिण आफ्रिका आणि चीनमध्ये बनावट लशीसंदर्भात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून काही महत्त्वाची माहिती हाती आली आहे. या बनावट लस प्रकरणाचे धागे काही खासगी नर्सिंग होमशीही जोडले असल्याचे इंटरपोलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा