मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर कंटेनरच्या धडकेत कारचा चेंदामेंदा; दोघे जागीच ठार

मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर एका कंटेनरने स्वीफ्ट कारला मागील बाजूने दिलेल्या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले आहेत, तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. ती आता पूर्ववत झाली आहे. (Accident on Mumbai-Pune Expressway) आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कंटेनर मुंबईच्या दिशेनं येत होता. खोपोलीजवळ एका उतारावर असताना या कंटेनरने एका स्विफ्ट कारला मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात स्विफ्ट कारचा चुराडा झाला आहे. कारमधील दोघे जागीच ठार झाले आहेत. अचानक झालेल्या या अपघातामुळे कंटेनरच्या मागून येणाऱ्या गाड्यांचेही नियंत्रण सुटले आणि आणखी दोन गाड्या कंटेनरला धडकल्या. अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. महामार्ग पोलीस व अन्य यंत्रणा अपघातस्थळी पोहोचून अपघातग्रस्त गाड्या बाजूला करण्याचे काम सुरू केले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर गाड्या बाजूला काढण्यात आल्या असून वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. करोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक जवळपास बंद होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता वाहतूक हळूहळू वाढली आहे. त्यानंतर एक्स्प्रेस वे वर झालेला हा पहिला मोठा अपघात आहे.
https://ift.tt/3fau8np
June 29, 2020 at 09:52AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा