भाजप नेत्याची दिल्लीत 'आणीबाणी'; उद्धव ठाकरे-इंदिरा गांधींचे एकत्रित पोस्टर
N4U
१:१७ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

नवी दिल्ली: रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे संपादक () यांना अन्वय नाइक प्रकरणी अलिबाग पोलिसांनी अटक केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्यापासून ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस () यांच्यासह राज्यातील इतर नेत्यांपर्यंत महाराष्ट्रात आता आणीबाणीची परिस्थिती आल्याची टीका केली. आता भाजप नेते तेजिंदरपालसिंह बग्गा () यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर उद्धव ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचे पोस्टर लावले आहे. या पोस्टरवर आपातकाल २.० मध्ये () तुमचे हार्दिक स्वागत आहे, असे लिहिले आहे. भाजप नेते तेजिंदरपाल बग्गा यांनी महाराष्ट्र सदनाबाहेर हे पोस्टर लावल्यानंतर अनेकांनी या पोस्टरचे छायाचित्र ट्विट करत त्यावर भाष्य केले आहे. आणीबाणी-०.२ मध्ये आपले स्वागत आहे असेही काहींनी पोस्टर ट्विट करत लिहिले आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केल्यानंतर महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडताना आणीबाणी या शब्दाचा प्रयोग केला आहे. ही अटक म्हणजे इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीची आठवण करून देणारी असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. हेच दाखवण्यासाठी तेजिंदरपालसिंह बग्गा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचा फोटो माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत लावला आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अलिबाग पोलिसांनी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना काल ५ नोव्हेंबर या दिवशी अटक केली. अन्वय नाईक यांचा वास्तुसजावटीचा व्यवसाय होता. ५ मे २०१८ साली अलिबागमधील कावीर येथे त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मृतदेहासोबत चिठ्ठी देखील सापडली होती. अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्काय मीडियाचे फिरोझ शेख आणि स्मार्टवर्क्सचे नीतेश सारडा या तिघांनी आपले पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्या चिठ्ठीत लिहिलेले होते. क्लिक करा आणि वाचा- नाईक यांची पत्नी अक्षता यांनी अलिबागमध्ये तक्रार नोंदवली नाही. मात्र तपासात काहीही आढलले नसल्याचे म्हणत पोलिसांनी हे प्रकरण बंद केले होते. मात्र या प्रकरणी पुन्हा तपास करावा अशी विनंती नाईक यांच्या पत्नी आणि मुलाने राज्य सरकारकडे केली होती. त्यानंतर हा तपास पुन्हा सुरू करण्यात आला. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
https://ift.tt/3fcy07h
November 05, 2020 at 12:43PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा