N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णब यांचा आरोप; खरं काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक यांच्यावर आज रायगड पोलिसांनी राहत्या घरातून अटकेची कारवाई केली आहे. यावेळी अर्णब यांनी कारवाईदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. अर्णब यांच्या आरोपावर पोलिसांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अर्णब गोस्वामीनं पैसे थकवल्याचा आरोप करत अलिबाग येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच प्रकरणी रायगड पोलिसांनी आज अर्णब यांच्यावर कारवाई केली आहे. आज कारवाई करते दोन पोलिसांकडून मारहाण झाली शिवाय कुटुंबातील सदस्यांना व मुलालाही मारहाण केली, असा आरोप अर्णब यांनी केला आहे. अर्णब यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती तिथे बांधलेली पट्टी देखील पोलिसांकढून काढण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या हाताला व पाठीत देखील मारलं आहे, अशी माहिती अर्णब गोस्वामी यांचे वकिल गौरव पारकर यांनी दिली आहे. तसंच, अर्णब यांच्या अटकेबद्दलची माहिती पत्नीला देखील दिली गेली नव्हती, असंही त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांचे स्पष्टीकरण दरम्यान, पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यापासून सर्व घटनांचे चित्रीकरण केले आहे. अटकेची कारवाई करतेवेळी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत, न्यायालयाने जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अहवाल मागितला आहे.

https://ift.tt/3fau8np
November 04, 2020 at 03:38PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा