टिकटॉक स्टार तरुणीची गळा आवळून हत्या, दोन दिवसांनी...
N4U
१२:१६ PM
India News
,
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

सोनीपत: हरयाणाच्या सोनीपतमध्ये एका टिकटॉक TikTok स्टार शिवानीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिवानीचा मृतदेह दोन दिवसांनी तिच्या ब्युटी पार्लरमधील बॉक्स बेडमध्ये आढळून आला. कुंडली येथे राहणाऱ्या आरिफवर तिच्या हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून, विच्छेदनासाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवानीच्या बहिणीच्या मित्राने ब्युटी पार्लरमधील बॉक्स बेड उघडल्यानंतर तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याने कुटुंबीयांना कळवले. त्यांनी याबाबत पोलिसांनाही माहिती दिली. शिवानी ही खोबियान कुंडलीमध्ये पार्लर चालवायची. टिकटॉकवर तिचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. कुंडलीतच राहणाऱ्या आरिफने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. कारण तो घटनेनंतर बेपत्ता झाला होता. पोलिसांनी तपास केला असता, आरिफ २६ जून रोजी शिवानीच्या ब्युटी पार्लरला आला होता. शिवानीने याबाबत आपली बहीण श्वेता हिला सांगितले होते. जेव्हा शिवानी रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही, तेव्हा श्वेताने तिला व्हॉट्सअॅप मेसेज केला. त्यावर मी हरिद्वारमध्ये आहे, तीन-चार दिवसांनी परत येईल, असा रिप्लाय तिला मिळाला. मारेकरी शिवानीचा फोन घेऊन गेला होता आणि त्यावरूनच तो शिवानीला रिप्लाय देत होता, असे लक्षात आले. २ दिवसांनी हत्या झाल्याचे उघड घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी श्वेताचा मित्र नीरज याने ब्युटी पार्लर उघडले. पार्लरमध्ये दुर्गंधी येत होती. पार्लरमधील बेड बॉक्स उघडून पाहिला असता, त्यात शिवानीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती नीरजने कुटुंबीयांना दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांना माहिती दिली. आरिफ तीन वर्षांपासून शिवानीला त्रास देत होता. त्यामुळे ते कुंडलीत राहायला आले. शिवानीने आरिफविरोधात पोलिसांतही तक्रार केली होती. शिवानीच्या हत्येनंतर दोन दिवसांनी तिच्या टिकटॉक अकाउंटवरून एक व्हिडिओही अपलोड करण्यात आला होता. त्या रात्री तो शिवानीच्या कुटुंबीयांशी चॅटिंग करत होता.. पोलिसांना आरिफचा संशय आल्यानंतर त्यांनी त्याचा शोध सुरू केला. कुंडली पोलिसांनी आरिफला अटक केली. आरिफने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने शिवानीची हत्या केल्यानंतर त्याच रात्री तो तिच्या कुटुंबीयांशी चॅटिंगद्वारे संवाद साधत होता. कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याची कोविड चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानीची हत्या शुक्रवारी संध्याकाळी किंवा रात्री करण्यात आली. नीरज हा त्या दिवशी बाहेरगावी गेला होता. आरिफने ओढणीने तिचा गळा आवळला आणि पार्लरमधील बेडमध्ये तिचा मृतदेह ठेवला. पार्लरमधून दुर्गंधी येत असल्याने नीरजने बेड खोलला, त्यावेळी त्याला शिवानीचा मृतदेह दिसला.
https://ift.tt/3fcy07h
June 30, 2020 at 11:44AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा