N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

'मोदी विरुद्ध मनमोहन'; चीनच्या मुद्द्यावर राहुल गांधीनी काढले 'हे' अस्त्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: भारत आणि चीनदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सतत यांना घेरत आहेत. ते दररोज ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. दरम्यान चीनच्या ५९ अॅपवर भारतात बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या आज दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज संध्याकाळी ४ वाजता पंतप्रधान मोदी देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी आज ट्विट करत सरकारच्या काळात चीनशी होणारा व्यापार आणि सामान खरेदीचा तुलनात्मक ग्राफ शेयर केला आहे. राहुल गांधी यांनी या ग्राफ द्वारे माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालाची तुलना करत चीनकडून खरेदी करण्या येणाऱ्या सामानाचा ग्राफ शेयर केला आहे. राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणतात, 'संख्या खोटे बोलत नाही. भाजप म्हणतो: मेक इन इंडिया, मात्र भाजप कृतीतून दाखवते- बाय फ्रॉम चायना (चीनमधून खरेदी करा)' वाचा: राहुल गांधींचा मोदी सरकारवर नित्याचा हल्ला राहुल गांधी गेल्या अनेक दिवसांपासून मोदी सरकारवर सतत हल्ले करत आहेत. भारतीय भूमीत चीनने आक्रमण केले असून त्यांच्यासमोर पंतप्रधान मोदी यांनी आत्मसमर्पण केले आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली होती. चीनने भारतीय भूमीत कोणत्याही प्रकारची घुसखोरी केलेली नाही, अशा पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांनी ही टीका केली होती. वाचा: राहुल गांधींना इतर विरोधी पक्षांचा पाठिंबा नाही राहुल गांधी सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असताना इतर विरोधी पक्षांचे राहुल गांधी याना मात्र सहकार्य मिळताना दिसत नाही. चीनच्या मुद्द्यावर देशातील प्रमुख पक्षांनी एक-दुसऱ्यावर आरोप करता कामा नयेत असे बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे. या आपसातील लढाईमुळे सर्वात जास्त देशातील जनतेचे नुकसान होत असते. या मुद्द्यावर बहुजन समाज पक्ष केंद्र सरकारच्या सोबत आहे, असे मायावती यांनी स्पष्ट केले आहे. वाचा:

https://ift.tt/3fcy07h
June 30, 2020 at 11:14AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा