दहशतवादासोबत भूकंपानंही हादरतंय जम्मू काश्मीर!
N4U
१२:१६ PM
India News
,
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

जम्मू : जम्मू काश्मीरच्या भागात मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचं हादरे जाणवले. या ४.० रिश्टर स्केलवर मोजण्यात आली. सकाळी लोक गाढ निद्रेत असताना अचानक आलेल्या या भूकंपानं रहिवाशांचा थरकाप उडवला. जीव वाचवण्यासाठी लोक आपल्या घराच्या बाहेर धावत आले. सकाळी जवळपास ८ वाजून ५६ मिनिटांनी हा भूकंपाचा हादरा बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू कटरापासून पूर्वेत जवळपास ८४ किलोमीटर दूर होता. 'नॅशनल सेंटर फॉर सिस्मलॉजी'च्या म्हणण्यानुसार, भूकंपाचं केंद्र जमिनीपासून जवळपास १० किलोमीटर खोलवर होता. 'भारतीय मानक ब्यरो'नं वेगवेगळ्या एजन्सीकडून प्राप्त झालेल्या वैज्ञानिक माहितीच्या आधारे संपूर्ण भारताला चार भूकंपीय झोनमध्ये विभागलं आहे. यामध्ये सर्वात धोकादायक '' असल्याचं सांगितलं जातं. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, या क्षेत्रात ९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसू शकतो. 'झोन ५'मध्ये संपूर्ण ईशान्य भारत, जम्मू काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरातचं कच्छ, उत्तर बिहारचा काही भाग आणि अंदमान निकोबार बेटांचा समूह यांचा समावेश होतो. या क्षेत्रात अनेकदा जाणवत राहतात. वाचा : वाचा : एका महिन्यात सहा भूकंपाचे धक्के उल्लेखनीय म्हणजे, जून २०२० या एका महिन्यात जम्मू काश्मीरला बसलेला हा सहावा भूकंपाचा धक्का आहे. गेल्या १५ जून आणि १६ जून रोजी दोन दिवसांच्या आत जम्मू काश्मीरनं चार भूकंपाचे धक्के सहन केले आहेत. याआधीही एका महिन्यात भारतात तब्बल ११ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते. हे भूकंपाचे धक्के दिल्ली - एनसीआर परिसरात बसले होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिमालयाच्या जवळपास धरतीच्या खाली खूप बदल होत आहेत. त्यामुळे हे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तज्ज्ञांकडून मोठ्या भूकंपाची चेतावणीही देण्यात आली आहे.
वाचा : वाचा : वाचा :
तारीख | तीव्रता | केंद्र |
१३ एप्रिल | २.७ | दिल्ली |
१६ एप्रिल | २ | दिल्ली |
३ मे | ३ | दिल्ली |
६ मे | २.३ | फरीदाबाद |
१० मे | ३.४ | दिल्ली |
१५ मे | २.२ | दिल्ली |
२८ मे | २.५ | फरीदाबाद |
२९ मे | ४.५ आणि २.९ | रोहतक |
१ जून | १.८ आणि ३ | रोहतक |
३ जून | ३.२ | फरीदाबाद |
८ जून | २.१ | गुरुग्राम |
https://ift.tt/3fcy07h
June 30, 2020 at 11:49AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा