'लॉकडाऊन'चा ९८ वा दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय बोलणार?
N4U
११:१६ AM
India News
,
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

नवी दिल्ली : करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात २४ तारखेला सायंकाळी उशिरा पंतप्रधानांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. आज या लॉकडाऊनचा ९८ वा दिवस आहे. लॉकडाऊनचा पाचवा टप्पाही आता संपत आलाय. याच दरम्यान, आज सायंकाळी ४.०० वाजता पुन्हा एकदा आहेत. त्यामुळे, आज पंतप्रधान काय घोषणा करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. पंतप्रधान मोदी आज आपल्या भाषणातून अभियानावर आणखी भर देणार का? देशात करोनाचे रुग्ण ५ लाखांवर गेले आहेत. यामुळे जनतेला करोनाच्या संसर्गाबाबत अधिक जागरूक करणार का? लॉकडाऊनमध्ये आणखी सूट मिळणार का? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. वाचा : वाचा : वाचा : ३० जून रोजी करोना आकडेवारी करोनाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार सध्या २ लाख १५ हजार १२५ रुग्णांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. देशभरात केवळ गेल्या २४ तासांत करोनाचे १८ हजार ५२२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांत एकूण ४१८ रुग्णांचे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलीय. त्यामुळे देशातील एकूण मृत्यूंची संख्या आता १६ हजार ८९३ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत ५ लाख ६६ हजार ८४० रुग्ण करोनाच्या तावडीत सापडले आहेत. यातील ३ लाख ३४ हजार ८२२ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले. वाचा : वाचा : वाचा : एका दिवसात २,१०,२९२ चाचण्या गेल्या २४ तासांत २ लाख १० हजार २९२ चाचण्या पार पडल्या. आतापर्यंत देशभरात घेतलेल्या एकूण करोना चाचण्यांची संख्या ८६ लाख ०८ हजार ६५४ इतकी आहे. करोना चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या आता १०४९ झाली असून त्यात ७६१ सरकारी, तर २८८ खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. वाचा :
https://ift.tt/3fcy07h
June 30, 2020 at 10:14AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा