'आत्मनिर्भर यूपी रोजगार' अभियानाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन; ५ लाख रोजगार मिळणार
नवी दिल्ली: यांनी सरकारच्या स्वावलंबी यूपी अभियानाचे ऑनलाइन उद्घाटन केले. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या अभियानांतर्गत स्थलांतरित मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून या सोबतच या अभियानामुळे स्थानिक उद्योगांनाही चालना मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटद्वारे या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन केले. आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात ५ लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. या बरोबरच ५० लाख कामगारांना लघु तसेच मोठ्या उद्योगांमध्ये सामावून घेतले जाणार आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात विविध राज्यांमधून परत आलेल्या ३० लाख ४३ हजार स्थलांतरित मजुरांची कौशल्य चाचणी घेण्यात आली असून हे सर्व मजूर २४ लाख ७५ हजार कृषी कार्य, तसेच बांधकाम कार्याशी जोडले गेले होते, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील ३१ जिल्ह्यांमध्येच २५ हजारांहून अधिक परतले आहे. विशेषत: या अभियानांतर्गत या ३१ जिल्ह्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
June 26, 2020 at 11:23AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा