N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

अर्णब गोस्वामी अटक : गृहमंत्री अमित शहांचा ठाकरे सरकारवर निशाणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली : व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणात '' चॅनेलचे संपादक यांना एका अटक करण्यात आल्यानंतर भाजपकडून महाराष्ट्रातील सरकारवर टीका केली जातेय. याच दरम्यान आता गृहमंत्री अमित शहादेखील अर्णब गोस्वामींच्या मदतीसाठी धावून आले आहेत. अर्णब गोस्वामी यांची पाठराखण करताना अमित शहा यांनी हा '' असल्याचं सांगत महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. या घटनेवरून अमित शहा यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. इतकंच नाही तर या घटनेची तुलना गृहमंत्री अमित शहा यांनी इंदिरा गांधी यांच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या आणीबाणीच्या घटनेशी केली आहे. 'काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लज्जित केलं आहे. रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात राज्यात शक्तीचा प्रयोग व्यक्तीगत स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट हल्ला आहे. आम्हाला यामुळे आणीबाणीच्या दिवसांची आठवण करून दिली. स्वतंत्र पत्रकारितेवर अशा प्रकारच्या हल्ल्याचा विरोध व्हायला हवा आणि होणार', असं ट्विट गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही टीका करत घेरण्याचा प्रयत्न केलाय. हा 'स्वतंत्र पत्रकारितेवर हल्ला' असल्याची टीका भाजपकडून करण्यात येतेय. दुसरीकडे, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा आणि पत्रकारितेचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात येतंय. संबंधित बातम्या: वाचा : वाचा : काय आहे प्रकरण इंटेरिअर डिझायनर प्रकरणात गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मे २०१८ मध्ये नाईक यांना आत्महत्येला भाग पाडल्याचा आरोप गोस्वामींवर करण्यात आला होता. अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडिओच्या इंटेरियर डिझाईनचं काम केलं होतं. त्यासाठी त्यांना अर्णब यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपयांचा मोबादला मिळणं बाकी होतं. परंतु वारंवार बिल मागूनही गोस्वामी यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या अन्वय नाईक यांनी मानसिक तणावात अलिबागजवळच्या कावीर गावात आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आईनंदेखील आत्महत्या केली. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या तक्रारीनंतर अलिबाग पोलिसांनी ३०६ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा हिनं मे महिन्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणाची नव्यानं सीआयडी चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांकडून देण्यात आले होते. वाचा : वाचा : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये येऊन जबाब नोंदवण्यासाठी अर्णब यांना पोलिसांनी अनेकदा नोटिसा पाठवल्यानंतरही 'मी पोलिसांशी बोलणार नाही' अशी भूमिका घेणाऱ्या गोस्वामींवर आज पोलिसांनी थेट कारवाई केली. आता, या प्रकरणी चौकशीसाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वरळी येथील घरातून आज (बुधवारी) सकाळी गोस्वामी यांना ताब्यात घेतलं. या अगोदर अर्णब गोस्वामी टीआरपी घोटाळ्यातही चर्चेत आले होते. गोस्वामींसोबत इतर दोघांनाही अटक मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अन्वय नाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासहीत तिघांवर पैसे थकवल्यामुळं आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचा म्हटलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतलंय. यातील, नितेश सारडा यांच्यावर ५५ लाख रुपयांच्या थकबाकीचा तर फिरोज शेखवर ४ कोटी रुपयांच्या थकबाकीचा आरोप मृत्यूपूर्वी अन्वय नाईक यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला होता. इतर बातम्या : वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
November 04, 2020 at 01:29PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा