N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

विग लावून लग्न केले; पहिल्याच रात्री पतीचे फुटले बिंग, भडकली पत्नी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मेरठ: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका विवाहीत महिलेने आपल्या पतीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या पतीने लावून केले आणि त्याचे असल्याचे सत्य त्याने लपवून ठेवले असा आरोप पत्नीने लावला आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री आपल्या पतीच्या डोक्यावर केस नाहीत हे सत्य आपल्यापुढे उघड झाले, असे पत्नीचे म्हणणे आहे. पतीच्या डोक्यावर केस नाहीत, हे आपल्याला अगोदर माहिती असते, तर अशा व्यक्तीशी आपण लग्नच केले नसते, असे महिलेचे म्हणणे आहे. सध्या महिलेच्या सासरकडील मंडळी महिलेची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र महिला आपल्या निर्णयावर ठाम आहे. हे प्रकरण मेरठमधील नोचंडी पोलिस ठाणे क्षेत्रातील आहे. या भागातील सम्राट हेवन येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची दोनच महिन्यांपूर्वी व्यवसायाने अकाउंटंट असलेल्या महिलेशी लग्न झाले. या व्यक्तीने डोक्याला विग लावूनच लग्न केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. यामुळे पत्नीचा पारा चढला आणि आपण पतीपासून वेगळे व्हायचे, असा निर्णय तिने घेतला. इतकेच नाही, तर अकाउंटट पत्नीने पतीच्या विरोधात फसवणू आणि मानहानी करणे या आधारे खटला दाखल करण्याची धमकी देखील दिली. फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी लग्नापूर्वी जर आपल्याला या व्यक्तीच्या डोक्यावर केस नसल्याचे माहीत पडले असते, तर अशा व्यक्तीशी आपण लग्नच केले नसते असे महिलेचे म्हणणे आहे. रागावलेल्या पत्नीने पतीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. क्लिक करा आणि वाचा- लोकलाजेस्तव पतीने घाबरून पत्नीची माफी मागितली. मात्र पत्नी पतीला माफ करण्यास तयार नाही. दोन्ही कुटुंबीय एकमेकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. कसेतरी महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
November 04, 2020 at 12:52PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा