'सरकार नामर्द... मला अरब देशात पाठवा, पाकिस्तानात नाही'
N4U
११:१६ AM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
लखनऊ: कोणीतरी साधारण शिक्षण घेतलेली व्यक्ती येते आणि मला पाकिस्तानात जा असे म्हणते. हे मर्दांचे नाही, नामर्दांचे सरकार आहे. अन्यथा त्या व्यक्तीने सिद्ध करावे की पाकिस्तानी आहे. मला जर सरकारला कोठे पाठवायचेच असेल तर अरबस्थानात पाठवावे, तेथूनच आम्ही आलो आहोत. पाकिस्तानशी आमचा काही संबंध नाही. पाकिस्तानशी संबंध हाच की तो भारताचा भाग होता आणि या भागाचे राजकीय मूर्खपणामुळे तुकडे-तुकडे झाले, अशा शब्दांत प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फ्रान्समधील हिंसेचे समर्थन केल्याप्रकरणी मुनव्वर राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर बोलताना त्यांनी उत्तर प्रदेश पोलिस, उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्र सरकरवर टीकेचे जोरदार प्रहार केले. 'आम्ही आग विझवणाऱ्यांपैकी आहोत' मुनव्वर राणा म्हणाले की, 'या गुन्ह्याचा माझ्या वक्तव्याशी काहीही संबंध नाही. जर माझ्या वक्तव्यात कोणता दोष असला असता तर योग्य व्यक्तीने माझ्या विरोधात तक्रार दाखल केली असती. नक्कल करून जो उत्तीर्ण झाला असेल अशा एका पोलिस निरीक्षकाने माझ्या विरोधात तक्रार दाखल केली. गेल्या ५० वर्षांच्या माझ्या अनुभवावर जर तो गुन्हा दाखल करत असेल तर हे लज्जास्पद आहे. आमचे डीजीपी आणि पोलिस आयुक्त यांच्यासाठी देखील ते लज्जास्पद आहे. तू तक्रार दाखल करण्यासाठी कोठून आलास, हे त्याला विचारायला हवे होते. अशी तक्रार दाखल करणे हे त्याचे काम नाही. त्याच्या मागे त्याचे वरिष्ठ, त्यांच्यापेक्षा मोठे अधिकारी, या अधिकाऱ्यापेक्षाही मोठे अधिकारी अनेक लोक आहेत. अशा प्रकारे मला झुकवले जाऊ शकत नाही. माझे व्यक्तिमत्व वादग्रस्त नाही. मी आयुष्यात प्रेमाची कविता केली. आईच्या कविता केल्या, मात्र मी खरे बोललो. तुम्ही हे तपासून पाहा. आम्ही आग विझवणाऱ्यांपैकी आहोत.' क्लिक करा आणि वाचा- 'मी मुसलमान आहे हे माझे दुर्दैव' धर्माची आग मोठी असते, या आगीत हात टाकता कामा नये. भारतात गायीच्या नावावर इतके लोक मारले गेले, मग किती लोकांना तुम्ही फाशी दिले?. तुमच्या केंद्रातील 'वजीर' खुन्यांना हार घालतो. माझे वक्तव्य वादग्रस्त वाटते. कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर यांनी कशा प्रकारची वक्तव्ये केलेली आहेत. दिल्ली जाळून टाकली. दिल्ली जाळणाऱ्यांवर खटला दाखल झाल्यानंतर न्यायाधीशांचीच बदली केली गेली. तुम्ही कोणत्या तमाशात बसलात? एका कवीचे दुर्दैव हे आहे की, तो मुसलमान आहे, असे राणा म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
https://ift.tt/3fcy07h
November 04, 2020 at 09:50AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा