नितीश कुमारांवर भरसभेत कांदे फेकले, तेजस्वींकडून निंदा
N4U
११:१६ AM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
पाटणा : (Bihar Assembly Elections 2020) मध्ये आता दोन टप्प्यांतील मतदान पार पडलंय. आता केवळ तिसऱ्या टप्प्यातील मतदान बाकी असतानाच मंगळवारी मुख्यमंत्री यांच्या अंगावर भरसभेत कांदे फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना मधुबनीमध्ये घडली. या घटनेचा एनडीएसोबतच आणि नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदासाठी टक्कर देणारे आरजेडी नेते यांनीही निंदा केलीय. 'एक निवडणूक सभेत कुणीतरी आदरणीय मुख्यमंत्री श्री नितीश कुमार यांच्या दिशेने . ही घटना निंदनीय, लोकशाहीविरोधी आणि अनिष्ट घटना आहे. लोकशाहीमध्ये विरोधाची अभिव्यक्ती केवळ मतदानामध्ये असायला हवी आणि याशिवाय इतर कोणतीही पद्धत स्वीकार्य असू शकत नाही' असं ट्विट तेजस्वी यादव यांनी केलं. मधुबनीच्या हरखाली भागात आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कांदे फेकण्यात आल्याची घटना घडली. मुख्यमंत्री नोकऱ्यांबद्दल बोलत असतानाच गर्दीतून अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या दिशेनं कांदे भिरकावले. यावर नितीश कुमार यांनी मंचावरूनच नाराज व्यक्त केली. 'खूप फेक, फेकत राहा, यामुळे कोणताही फरक पडणार नाही' असंही त्यांनी म्हटलं. नितीश कुमार यांच्या दिशेनं कांदे फेकणाऱ्याला सभेतील जमावानं पकडल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी 'त्याला जाऊ द्या, त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही' असं म्हणत त्याला सोडून देण्याची विनंती जमावाला केली. वाचा : वाचा : दरम्यान, बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान २८ ऑक्टोबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातलं मतदान ३ नोव्हेंबर पार पडलं. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान २३ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. मंगळवारी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १७ जिल्ह्यातील ९४ मतदारसंघांचा समावेश होता. सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत जवळपास ५४ टक्के मतदान पार पडलं. आता उरलेल्या तिसऱ्या टप्प्यात १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांचा समावेश आहे. १० नोव्हेंबर रोजी या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. वाचा : वाचा :
https://ift.tt/3fcy07h
November 04, 2020 at 10:11AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा