coronavirus in india: पाहा, देशात अशी आहे करोना संसर्गाची ताजी स्थिती
N4U
१:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली: भारतासह जगभरात १८० हून देशांमध्ये करोनाचे (Coronavirus) संकट घोंघावत आहे. आतापर्यंत ४.७३ कोटींहून अधिक लोकांना करोनाची लागण झालेली आहे. करोनामुळे आतापर्यंत १२.१३ लाखांहून अधिक लोकांचा बळी गेलेला आहे. भारतात देखील करोनाचे रुग्ण वाढतच आहेत. देशात बाधितांची संख्या ८३ लाखांहून अधिक झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ८३ लाख १३ हजार ८७६ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे ४६ हजार २५३ इतके नवे रुग्ण वाढले आहेत. गेल्या २४ तासांत ५३,३५७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५१४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण ७६,५६,४७८ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ लाख २३ हजार ६११ इतकी झाली आहे. सध्या कोरोनाच्या संक्रिय रुग्णांची संख्या ५.५ लाखांपेक्षा कमी आहे (). २ ऑगस्टनंतर ही संख्या प्रथमच खाली आली आहे. सध्या देशात ५ लाख ३३ हजार ७८७ सक्रिय रुग्ण आहेत. रिकव्हरी दराबद्दल बोलायचे झाल्यास त्यात थोडीशी वाढ होत तो ९२.०९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर पॉझिटिव्हीटीचा दर ३.८२ टक्के आहे. मृत्युदर १.४८ टक्के आहे. ३ नोव्हेंबर रोजी १२,०९,६०९ कोरोनाच्या नमुना चाचण्या घेण्यात आल्या. तर आतापर्यंत एकूण ११,२९,९८,९५९ नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा- करोना संसर्गात भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर प्रथम स्थानी आहे अमेरिका. अमेरिकेत आतापर्यंत एकूण ९३,७९,६०० रुग्ण आहेत. तेथे सक्रिय रुग्णांची संख्या आहे ५४,४१,९१७. आतापर्यंत २,३२,५५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलचा क्रमांक तिसरा आहे. तेथे ५५,६६,०४९ रुग्ण आहेत. आतापर्यंत १,६०,४९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारत, अमेरिका आणि ब्राझील या तीन देशांमध्ये करोना रुग्णांची संख्या ५० लाखांहून अधिक झाली आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
https://ift.tt/3fcy07h
November 04, 2020 at 11:52AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा