N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

रुग्णवाहिकेसाठी दोन किलोमीटरची धाव, लेकीनं पित्याचं असं केलं कौतुक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
: तेलंगणाच्या हैदराबादमध्ये वाहनांच्या गर्दीत रस्त्यावर अडकून पडलेल्या करून देण्यासाठी एका पोलीस कॉन्स्टेबलनं तब्बल दोन किलोमीटरची धाव घेतली. हा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होतानाच संबंधित पोलिसावर कौतुकाची उधळण होतेय. यांना हैदराबाद पोलिसांकडूनही सन्मानित करण्यात आलं. परंतु, एक शुभेच्छा त्यांच्यासाठीही खास ठरली... ती म्हणजे, लेकीनंच आपल्या पित्याचं केलेलं कौतुक! जी बाबजी यांचा हा सोमवारी सायंकाळी ६ - ७ वाजल्याच्या सुमाराचा आहे. शहरात असतानाच जी बाबजी यांनी एका रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण मृत्यूशी लढाई देत असताना नजरेस पडला. रुग्णवाहिकेचा चालक वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. परंतु, समोर दिसणाऱ्या ट्राफिकमुळे तोही हताश होता. वाचा : वाचा : हे पाहताच जी बाबजी यांनी लगेचच रुग्णवाहिकेसाठी रस्ता खुला करायला सुरूवात केली. तब्बल दोन किलोमीटरपर्यंत लोकांना आणि वाहनांची रांग बाजुला करत त्यांनी रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला. रुग्णवाहिकेत बसलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी जी बाबजी यांचा हा प्रामाणिक प्रयत्न व्हिडिओद्वारे रेकॉर्ड केला. 'रुग्णवाहिकेला पाहिल्यावर मला काहीतरी करायला हवं, हे लक्षात आलं. मी पुढे झालो आणि वाहन चालकांना गाड्या बाजुला घेण्याची विनंती केली. याला वाहन चालकांनीही प्रतिसाद दिला. अनेकांनी माझ्या पाठिवर शाबासकीची थापही दिली' असं सांगताना जी बाबजी यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. परंतु, बाबजी यांना यापेक्षाही मोठा आनंद घरी पोहचल्यानंतर मिळाला. अवघ्या काही वेळातच जी बाबजी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्या सात वर्षीय चिमुरडीनंही आपल्या पित्याचा हा व्हिडिओ पाहिला. रात्री ११ वाजेपर्यंत ती वडिलांची वाट पाहत जागीच राहिला आणि जी बाबजी घरात आल्यानंतर तिनं वडिलांना एक कागद हातात दिला. आपल्या वहिच्या एका पानावर 'कॉन्ग्रॅच्युलेशन्स डॅडी' असं या चिमुरडीनं लिहिलेलं होतं. आपल्याच मुलीकडून झालेलं हे कौतुक जी बाबजी यांच्यासाठीही खास होतं आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू उभे राहिले. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
November 06, 2020 at 12:03PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा