N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

नेपाळचा आडमुठेपणा, बिहारला पुराचा धोका!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
पाटणा : भारतासोबत सीमा वादादरम्यान नेपाळ सरकारकडून भारताला चुचकारण्याचं काम सुरू आहे. नेपाळ सरकारनं पूर्व चम्पारणच्या ढाका उपविभागातील नदीवर सुरू असलेलं धरण दुरुस्तीच्या कामाला हरकत घेतलीय. नेपाळकडून दुरुस्तीच्या कामाला परवानगी नाकारली जातेय, असं बिहारचे जल संधारण मंत्री संजय कुमार झा यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, लालबाकेया नदी 'नो मॅन्स लँड'चा भाग आहे. लालबाकेय नदीवरच्या धरणासोबतच नेपाळकडून इतर ठिकाणच्या कामांनाही रोखण्यात येतंय. पहिल्यांदाच भारतीय अधिकाऱ्यांना अशा पद्धतीच्या समस्येचा सामना करावा लागतोय. धरणाच्या दुरुस्तीसाठी सामानाचा पुरवठा करणंही अधिकाऱ्यांना कठीण होऊन बसलंय. इंजिनियर्सला कामासाठी सामन पोहचू शकलं नाही तर दुरुस्तीच्या कामाला फटका बसेल. तसंच नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि गंडक नदीच्या पाण्यात वाढ झाली तर एखादी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. वाचा : वाचा : वाचा : गंडक धरणाला ३६ दरवाजे आहेत यातील १८ दरवाजे नेपाळमध्ये आहेत. भारतीय बाजुला असलेल्या १७ दरवाज्यांपर्यंत दुरुस्तीचं कामकाज पूर्ण झालंय. परंतु, नेपाळच्या बाजुला असलेल्या १८ दरवाजांचं मात्र काम अद्याप झालेलं नाही. नेपाळकडून या धरणाच्या दुरुस्तीचं सामानालाही परवानगी नाकारण्यात येतेय. उल्लेखनीय म्हणजे लालाबकेया नदीच्या पश्चिम भागातील तटबंदीला २०१७ साली आलेल्या जलप्रलयामुळे मोठी हानी पोहचली होती. त्याच्या दुरुस्तीचंही काम सुरू आहे. याआधी, अशी परिस्थिती कधी उद्भवलीच तर भारतीय आणि नेपाळी अधिकारी एकत्र बैठक घेऊन या प्रश्नावर मार्ग काढत असतं. परंतु, यावेळी मात्र हा प्रश्न गंभीर रुप घेत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. पाटबंधारे विभागाचे अभियंते बबन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ सरकारनं जवळपास पाचशे मीटर धरणाच्या जमिनीवर आक्षेप व्यक्त केलाय तसंच कामही रोखण्यात आलंय. या धरणामुळे पूर्व जम्पारण जिल्ह्यातील ढाका आणि पताहीमध्ये पुराचा धोका टाळता येऊ शकतो. नेपाळच्या या आडमुठेपणामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केलाय. वाचा : वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
June 22, 2020 at 02:48PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा