N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

भाजपचा डॉ. मनमोहन सिंहांवर पलटवार; नड्डांचे जहरी टीकास्त्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या टीकेनंतर भारतीय जनता पक्षाने पलटवार केला आहे. डॉ. सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना शब्दांची 'बाजीगरी' दाखवली असून स्वत: सिंह हे पंतप्रधान असताना त्यांनी चीनला शेकडो किमीची जमीन समर्पित केलेली आहे आणि याची चिंता त्यांना असायला हवी होती, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी माजी पंतप्रधान डॉ. सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. चीनने सन २०१० ते २०१३ दरम्यान ६०० पेक्षा अधिक वेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर () अचानक आक्रमण केले, असेही नड्डा म्हणाले. काँग्रेस तर सैन्यावरच प्रश्न उपस्थित करतो: नड्डा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर पंतप्रधानांनी तोलून मापून बोलले पाहिजे, असा सल्ला डॉ. सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला होता. डॉ. सिंह यांचे वक्तव्य आल्यानंतर काही वेळातच नड्डा यांनी ट्विट केले. ते ट्विटमध्ये म्हणतात, 'माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे वक्तव्य ही शब्दांची 'बाजीगरी' आहे. दुर्दैवाने, काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे आचरण पाहून कोणताही भारतीय त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणार नाही. आमच्या सशस्त्र सेनेवर ज्याने सतत प्रश्न उपस्थि केले, त्यांचा उत्साह मारण्याचा प्रयत्न केला, तो हाच काँग्रेस पक्ष आहे, हे लक्षात ठेवा.' भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्णपणे विश्वास असून संपूर्ण देश पंतप्रधान मोदींचे समर्थन करतो, असेही जे. पी. नड्डा पुढे म्हणाले. वाचा: डॉ. सिंह यांचे विचार निदान काँग्रेस पक्ष तरी ऐकेल; नड्डांचा निशाणा डॉ. मनमोहन सिंह यांनी उपस्थित केलेला एकतेचा मुद्दा योग्य आहे. मात्र, कागदावरील त्यांचे शब्द वास्तवात प्राणहिन वाटतात आणि एकतेचे वातावरण कोण बिघडवत आहे हे स्पष्ट होते, असे भाजप अध्यक्ष नड्डा यांनी म्हटले आहे. डॉ. सिंह यांचे म्हणणे निदान त्यांचा पक्ष तरी ऐकेल अशी आशा आहे. वाचा: डॉ. सिंह यांच्यावर टीकास्त्र सोडताना नड्डा पुढे म्हणाले की, डॉ. सिंह हे त्याच पक्षाचे नेते आहेत ज्या पक्षाने भारताची ४३,००० किमीची जमीन चीनच्या हवाली केली. यूीपीएच्या काळात भारताने कोणतीही लढाई न करता रणनीतिक आणि भौगौलिक समर्पण केले. डॉ. सिंह हे अनेक मुद्द्यांवर आपली मते व्यक्त करू शकतात, मात्र पतंप्रधान कार्यालयाच्या जबाबदारीवर नाही. यूपीएच्या काळात त्या कार्यालयाचे प्रतिष्ठा घसरली आणि आमच्या सशस्त्र सेनेचा अपमान झाला. मात्र एनडीएने ते बदलले आहे. वाचा:

https://ift.tt/3fcy07h
June 22, 2020 at 03:39PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा