N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

लग्नात अडथळा आणत होता, संतप्त तरुणाने शेजाऱ्याची दुकाने जेसीबीने केली भुईसपाट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
कन्नूर: केरळच्या कन्नूरमध्ये एक 'सिनेस्टाइल' प्रकार घडला आहे. एका तरुणाने शेजाऱ्याची दुकाने जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केली. तरुणाचे कुटुंब आणि शेजाऱ्यामध्ये वाद होता. या तरुणाच्या लग्नात तो अडथळे आणत होता. त्यामुळे त्याने संतापाच्या भरात दुकाने पाडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जेसीबीच्या साह्याने दुकाने पाडणाऱ्या ३० वर्षीय एल्बिन मॅथ्यू याने या घटनेचा व्हिडिओही तयार केला. शेजारी सोजीच्या दुकानांमध्ये अवैध धंदे सुरू होते. या दुकानांमध्ये अवैध दारू विक्री आणि जुगाराचा अड्डा चालवण्यात येत होता. त्यामुळे परिसरातील तरूण त्रस्त होते. तसेच लग्नासाठी प्रस्ताव येत होते. मात्र सोजी त्यात अडथळे आणत होता, असा आरोप तरुणाने केला आहे. चेरुझुपाचा रहिवासी मॅथ्यू याच्या म्हणण्यानुसार, अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांसंबंधी वारंवार तक्रार करूनही पोलीस आणि प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. अखेर आम्हालाच पुढाकार घेऊन हे पाऊल उचलावे लागले. शेजारी असूनही दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद होते. दुसरीकडे सोजीने मॅथ्यूचे सर्व आरोप फेटाळले आहेत. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली आहे. जेसीबीच्या साह्याने दुकाने पाडणाऱ्या मॅथ्यूला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बेकायदा दुकाने पाडल्याचा आरोप आहे. आरोपी मॅथ्यूला पयन्नूरच्या कोर्टात हजर करण्यात आले.

https://ift.tt/3fcy07h
October 29, 2020 at 10:23AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा