N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

पार्ट्या करताना मराठी अस्मिता कुठे होती?; भाजप आमदाराचा सवाल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: हिच्या वक्तव्यावरून सुरू झालेला शाब्दिक कलगीतुरा सुरूच आहे. कंगनावर टीकेची झोड उठवणाऱ्या शिवसेनेवर भाजपचे नेते, आमदार तुटून पडले आहेत. कंगनाला 'उपरी' म्हणणाऱ्या शिवसेनेवर भाजपचे आमदार यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचं अवघ्या दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. दोन दिवसांच्या या अधिवेशनात राज्यापुढील प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा शिवसेनेनं ''च्या अग्रलेखातून व्यक्त केली आहे. त्याचबरोबर, मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणावत हिचा सर्व पक्षीयांनी मतभेद विसरून निषेध करायला हवा. मुंबई पोलिसांना माफिया म्हणणाऱ्या कंगनाची चौकशी व्हायला हवी, अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे. कंगनाला शिवसेनेनं 'उपरी' म्हणून हिणवलं आहे. वाचा: शिवसेनेच्या याच टीकेचा नीतेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून समाचार घेतला आहे. 'कंगनासारखे लोक उपरे आणि दिनो मोरिया, गोमेज, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी हे अस्सल मराठी आहेत का,' असा प्रश्न नीतेश राणे यांनी केला आहे. 'महापालिकेच्या कामाचे टेंडर काढताना आणि पार्ट्या करताना मराठी अस्मिता कुठे होती,' असा सवालही नीतेश यांनी केला आहे. नीतेश यांच्या टीकेचा रोख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडं आहे. आदित्य ठाकरे यांचे बॉलिवूडमध्ये अनेक मित्र आहेत. त्यांना विचारूनच मुंबईतील कोविड सेंटरचे टेंडर काढले जात असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी नीतेश राणे यांनी केला होता. त्याच अनुषंगानं नीतेश यांनी ही टीका केली आहे. वाचा:

https://ift.tt/3fau8np
September 07, 2020 at 10:32AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा