करोना संक्रमणात भारत दुसऱ्या क्रमांकावर, ब्राझीललाही मागे टाकलं
N4U
११:१६ AM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली : भारतात करोना संक्रमितांचा आकडा ४२ लाखांच्या पुढे गेलाय. सलग दुसऱ्या दिवशी करोनाचे ९० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत १०१६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे तर गेल्या २४ तासांत करोनाचे तब्बल ९० हजार ८०२ नवीन रुग्ण आढळले आहेत. भारतात आत्तापर्यंत करोनाचे एकूण ४२ लाख ०४ हजार ६१४ रुग्ण आढळले आहेत. यातील ८ लाख ८२ हजार ५४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ३२ लाख ५० हजार ४२९ जण संक्रमणमुक्त झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, कोविड १९ प्रभावित जगभरातील देशांच्या यादीत भारतानं आता गाठलाय. या बाबतीत भारतानं ब्राझीलला मागे टाकलंय. ब्राझीलमध्ये एकूण संक्रमितांची संख्या ४१ लाख ३७ हजार ६०६ वर आहे. तर मृतांची संख्या १ लाख २६ हजार ६८६ वर आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेत ६४ लाख ६० हजार २५० रुग्ण आढळलेत. तर इथे मृतांची संख्या १ लाख ९३ हजार २५० वर पोहचलीय. भारतात ६ सप्टेंबरपर्यंत एकूण ४ कोटी ९५ लाख ५१ हजार ५०७ करोना चाचण्या पार पडल्या आहेत. यातील ७ लाख २० हजार ३६२ चाचण्या कालच्या २४ तासांत करण्यात आल्याची माहिती 'आयसीएमआर'कडून देण्यात आलीय. वाचा : वाचा : रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७.३२ टक्के रविवारी देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७.३२ टक्क्यांवर आहे तर मृत्यूदरही १.७२ टक्क्यांपर्यंत आला असून, जगातील हा सर्वांत कमी करोना मृत्यूदर असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं होतं. अनलॉक ४ अंतर्गत काही सेवांना प्रारंभ दरम्यान अनलॉक ४ अंतर्गत आज काही शहरांत मेट्रो सेवेलाही प्रारंभ करण्यात आलाय. कोविड १९ च्या कारणानं गेल्या पाच महिन्यांहून अधिका काळ मेट्रो सेवा बंद होत्या. अनलॉक ४ अंतर्गत आणखी काही सेवा सुरू झाल्या असल्या तरी नागरिकांना मात्र करोना नियमांचं पालन काटेकोरपणे करावं लागणार आहे. मास्कचा वापर करूनच घराबाहेर पडणं असो किंवा सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणं तुमच्या आरोग्यासाठीच महत्त्वाचं ठरणार आहे, असं आवाहन 'महाराष्ट्र टाईम्स'च्या वाचकांना करण्यात येतंय. वाचा : वाचा :
https://ift.tt/3fcy07h
September 07, 2020 at 10:20AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा