'महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान भाजपवाले कसा सहन करू शकतात?'
N4U
११:०५ AM
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
मुंबई: 'महाराष्ट्र जितका , काँग्रेस व राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायला हवा. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात,' असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे. राज्य विधिमंडळांचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. राज्यासमोर करोनासह पूर्व विदर्भातील पुरासारखे अनेक गंभीर प्रश्न आहेत. त्यावर विधिमंडळात चर्चा व्हायला हवी. केंद्राने शे-पाचशे कोटी रुपयांची मदत राज्याला करावी, अशी एकमुख मागणी विधिमंडळात व्हायला हवी, पण विरोधी पक्ष अशा विधायक कार्यावर बोलतील काय, अशी शंका शिवसेनेनं व्यक्त केली आहे. 'विरोधी पक्षांकडून सुशांतसिंह राजपूत, अशा राष्ट्रीय हितांच्या विषयांवर प्रश्न उपस्थित केले जातील,' असा टोला सेनेनं हाणला आहे. वाचा: कंगना राणावत हिनं मुंबईला 'पाकव्याप्त काश्मीर' असं म्हणून समस्त मराठी जनांचा व मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अपमान केला आहे. या उपऱ्या व्यक्तीविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायला हवा आणि त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा,' अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे. वाचा: मुंबईत खाऊन, पिऊत तरारलेली ही महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्याच टाकते हे सहन करता येणार नाही. राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा व्हायलाच हवी. मुंबईचा व मुंबई पोलिसांचा अवमान करणाऱ्या त्या 'मेंटल' महिलेस महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असं राज्याचे गृहमंत्री सांगत असतील तर तीच महाराष्ट्राची लोकभावना आहे हे मान्य करावं लागेल. गृहमंत्री देशमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त व संपूर्ण पोलीस दलावर विधानसभेनं विश्वास व्यक्त करणं गरजेचं आहे. मुंबई पोलीस माफिया आहेत असं म्हणणाऱ्यांची चौकशी व्हायलाच हवी,' अशी आग्रही मागणीही शिवसेनेनं केली आहे.
https://ift.tt/3fau8np
September 07, 2020 at 09:15AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा