मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; टीव्ही पत्रकाराविरोधात हक्कभंग
N4U
२:०५ PM
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे टीव्ही पत्रकार यांच्याविरोधात शिवसेनेनं हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव आणला. हा प्रस्ताव येताच शिवसेनेचे सदस्य प्रचंड आक्रमक झाले. अर्णब गोस्वामी हे सुपारीबाज पत्रकार आहेत, अशी तोफ शिवसेनेच्या आमदारांनी डागली. विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या व शेवटच्या दिवशी शिवसेनेनं गोस्वामी यांना लक्ष्य केलं. प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडताना गोस्वामी यांच्यावर जोरदार टीका केली. 'गोस्वामी हे जाणीवपूर्वक वाईट भाषा वापरून बोलतात. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी कुठल्याही नेत्याचा संबंध नसताना कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी,' अशी जोरदार मागणी सरनाईक यांनी यावेळी केली. वाचा: परिवहन मंत्री अनिल परब यांनीही सरनाईक यांचे म्हणणे उचलून धरले. 'अर्णब गोस्वामी हे स्वत: न्यायाधीश असल्यासारखे वागतात. स्वत: खटला चालवतात आणि स्वत: निकाल देतात,' असा संताप परब यांनी व्यक्त केला. वाचा:
https://ift.tt/3fau8np
September 08, 2020 at 11:58AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा