N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

कंगनाला Y दर्जाची सुरक्षा; रोहित पवारांना 'ही' शंका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
अहमदनगर: मुंबई व मुंबई पोलिसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं टीकेच्या रडारवर असलेली अभिनेत्री हिला Y दर्जाची सुरक्षा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी शंका उपस्थित केली आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कंगना राणावत सुरुवातीपासूनच वेगवेगळी वक्तव्य करत आहे. सुरुवातीला बॉलिवूडमधील घराणेशाहीकडे बोट दाखवणारी कंगना कालांतरानं राजकीय नेत्याच्या थाटात वक्तव्य करू लागली. राज्यातील ठाकरे सरकारवर ती टीका करत होते. मुंबई पोलिसांवर तिनं अकार्यक्षमतेचे आरोप केले. गुंड व माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असं वक्तव्य तिनं केलं होतं. त्यावरून तिच्यावर टीकेची झोड उठताच तिनं आणखी काही वक्तव्ये केली. शिवसेना व मनसेनं तिला आपल्या राज्यात जाण्याचा सल्ला दिला होता. त्याचं निमित्त करून आपल्याला धमक्या येत असल्याचं ती म्हणत होती. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटतेय, असंही ती म्हणाली होती. त्यामुळं आगीत तेल ओतलं गेलं. शिवसेना, मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादीनंही कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला. तिचं थोबाड फोडण्याची भाषा केली गेली. त्यामुळं वातावरण तापलं होतं. वाचा: कंगनाची बाजू घेऊन शिवसेनेवर टीका करणाऱ्या केंद्रातील सत्ताधारी भाजपनं थेट कंगनाला 'वाय' दर्जाची सुरक्षा देण्याची घोषणा केली. तिला देण्यात आलेल्या सुरक्षेवरून आता उलटसुलट चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे. 'मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा दिली गेलीय. , बेकारी व आर्थिक संकटावरून लक्ष हटवण्यासाठी तू बोलत रहा, आम्ही तुला सुरक्षा पुरवू', असं तर सत्ताधारी पक्षाला सुचवायचं नाही ना, अशी शंका रोहित पवार यांनी व्यक्त केलीय. दिशाभूल करणाऱ्या अशा ड्रामेबाजांना महत्त्व न देता दुर्लक्ष केलेलंच चांगलं. ही सुरक्षा फुकट नसेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. वाचा: वाचा:

https://ift.tt/3fau8np
September 08, 2020 at 01:58PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा