'मोदींची सरकारी कंपन्या विक्री मोहीम... एक लज्जास्पद प्रयत्न'
N4U
१:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार () यांनी सरकारी कंपन्यांतील सरकारी भागीदारी विक्रीचा मुद्दा उचलून धरत मंगळवारी मोदी सरकारवर टीका केलीय. पंतप्रधान '' मोहीम चालवत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. सोशल मीडियावर एका बातमीचा हवाला देत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी () आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. 'मोदीजी सरकारी कंपन्या विक्री मोहीम चालवत आहेत. स्वत: निर्माण केलेल्या आर्थित समस्यांच्या भरपाईसाठी देशाची संपत्ती थोडी थोडी करून विकली जात आहे. जनतेचं भविष्य आणि विश्वास टांगणीला लावत विक्रीचा मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न आहे' असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर ताशेरे ओढलेत. 'एलआयसी'मध्ये असलेली सरकारी २५ टक्के भागीदारी विकून केंद्र सरकार पैसे जमा करणार असल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. वाचा : वाचा : याअगोदरही राहुल गांधी यांनी खासगीकरण, करोना संक्रमण, बेरोजगारी, घाईघाईत लावण्यात आलेलं लॉकडाऊन, स्थगित करण्यात आलेल्या परीक्षा, अर्थव्यवस्था अशा अनेक मुद्यांवरून मोदी सरकारला जबाबदार धरत सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. सोमवारीही सार्वजनिक उपक्रमांच्या खासगीकरणावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. 'आज देश मोदी सरकारनिर्मित अनेक समस्यांचा सामना करत आहे. त्यातीलच एक म्हणजे अनावश्यक खासगीकरण. तरुणांना नोकरी हवीय पण मोदी सरकार केवळ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचं (PSUs) खासगीकरण करून रोजगार आणि गुंतवणूक नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. यात कुणाचा फायदा? केवळ काही 'मित्रां'चा विकास, जे मोदीजींचे खास आहेत' असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणावर टीका केली होती. वाचा : वाचा :
https://ift.tt/3fcy07h
September 08, 2020 at 12:34PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा