धक्कादायक! शुद्धिकरणासाठी तरुणीला निर्वस्त्र करून गाववाल्यांसमोर घातली आंघोळ
N4U
१:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
सीकर: राजस्थानच्या जिल्ह्यात हादरून टाकणारी घटना घडली आहे. येथील खाप पंचायतीच्या आदेशानंतर नेछवा ग्रामपंचायतमधील सोला गावात एका तरूण-तरुणीला अपमानास्पद वागणूक दिली आहे. या तरूण-तरुणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खाप पंचायतीने ४०० लोकांसमोर आंघोळ घालण्याचा आदेश दिला. शुद्धिकरण करण्याच्या नावाखाली पंचांनी हा आदेश दिला. तरुणीला निर्वस्त्र करून आंघोळ घालण्यात आली. त्यावेळी अनेकांनी त्यांच्या मोबाइल कॅमेऱ्यात त्यांचे व्हिडिओ आणि फोटो काढले. मात्र, कुणीही या अमानवीय घटनेची माहिती पोलिसांना दिली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्टला ही घटना घडली आहे. मात्र, या घटनेबाबत पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती. अखिल सांसी समाज सुधार आणि विकास न्यासाचे प्रदेश अध्यक्ष सवाईसिंह मालावत यांनी सीकरच्या पोलीस अधीक्षकांकडे या घटनेची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे पीडित कुटुंबीयांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी कोविड १९ अंतर्गत नियमांचे उल्लंघन आणि इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. ५३ हजार रुपयांचा दंड मिळालेल्या माहितीनुसार, खाप पंचायतीने फर्मान सोडल्यानंतर माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. दुसरीकडे शिक्षा सुनावणाऱ्या खाप पंचायतीच्या पंचांनी दोघांच्याही कुटुंबीयांना दंड ठोठावला आहे. त्यानुसार तरुणाकडून ३१ हजार रुपये आणि तरुणीच्या कुटुंबीयांकडून २२ हजार रुपये वसूल करण्यात आले.
https://ift.tt/3fcy07h
September 02, 2020 at 12:51PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा