मी मोदींना हेच तर विचारतोय!; चिदंबरम यांनी 'त्या' ट्विटद्वारे पंतप्रधानांना घेरले
N4U
१:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली: देशात करोनाचे संकट () घोंघावत असून भारतीय अर्थव्यवस्थेवर () देखील या संकटाचा मोठा परिणाम झाला आहे. जीडीपी (GDP) देखील तीव्र गतीने २४ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस सतत केंद्रातील मोदी सरकारवर ()हल्लाबोल करत आहे. आज बुधवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P Chidambaram)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक जुने ट्विट शेयर करत मोदींवर निशाणा साधला आहे. (former fm tweets on data questioning pm narendra modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जुन्या ट्विटमध्ये जे म्हटले आहे, तेच मी पंतप्रधानांना सांगू इच्छित आहे, असे पी. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सन २०१३ मधील हे जुने ट्विट शेअर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या वेळी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते, 'अर्थव्यवस्था संकटात, तरुणांना नोकरी हवी आहे, अशात राजकारणावर नाही तर अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करा. चिदंबरमजी, तत्काळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या वेळी ट्विट केले त्या वेळी पी. चिदंबरम हे केंद्रात अर्थमंत्री होते. आता नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. या व्यतिरिक्त पी. चिदंबरम यांनी बुधवारी ट्विट करत पीएम केअर्स फंडाबाबतही (pm cares fund) प्रश्न उपस्थित केले आहेत. पीएम केअर फंडाला २६ ते ३१ मार्च २०२० या काळात केवळ ५ दिवसांमध्ये ३०७६ कोटी रुपये मिळाले असल्याचे ऑडिटर्सनी स्पष्ट केले असल्याचे पी. चिदंबरम यांनी लिहिले आहे. ज्या लोकांनी पीएम केअर्स फंडाला सढळ हस्ते मदत केली, त्या दयाळू दात्यांची नावे मात्र प्रसिद्ध केली गेली नाहीत, असे का, असा प्रश्नही मादी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधानांना विचारला आहे. इतर सर्व एनजीओंना एका मर्यादेनंतर पैसा वाढल्यानंतर दानकर्त्यांची नावे प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. या जबाबदारीतून पीएम केअर्स फंडाला मुक्त का करण्यात आले आहे?, ज्याला दान मिळाले आहे तो सर्वांना माहीत आहे, मात्र ज्यांनी दान दिेल आहे, त्याच्याबाबत मात्र कोणालाही माहिती नाही. ट्रस्टी दात्यांची नावे जाहीर करण्यास का घाबरत आहेत?, असे प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत. क्लिक करा आणि वाचा- पीएम केअर्स फंडाची निर्मिती करोना संकटकाळात करण्यात आली आहे. मात्र, या फंडात दान देणाऱ्या दात्यांची नावे उघड करण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. यावरून काँग्रेसने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
https://ift.tt/3fcy07h
September 02, 2020 at 01:08PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा