N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

'ही' आहे करोना लशीची भारतातील स्थिती; आरोग्य मंत्रालयाने केले स्पष्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: भारत जगातिक दुसरा सर्वाधिक करोनाचा () संसर्ग झालेला देश बनला असून अशाच गतीने संसर्ग सुरू राहिल्यास भारत लवकरच प्रथम क्रमांकावर पोहोचू शकतो. भारतात आतापर्यंत ७३००० लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. हे पाहता सर्वांनाच करोनावरील लशीची () प्रतीक्षा आहे. नीती आयोगाचे सदस्य () यांनी लशीच्या स्थितीबाबत भाष्य केले आहे. सध्या देशात तीन कंपन्या तयार करत असून या सर्व लशी क्लिनिकल ट्रायलमध्ये असल्याची माहिती डॉ. पॉल यांनी दिली आहे. आणि भारत बायोटेकच्या लशीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झालेली आहे. मंगळवारपासून या लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही स्वदेशी लस आहे. कॅडिलाची लशीची पहिल्या टप्प्यातील चाचणी देखील संपलेली आहे. आता या लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ही लस देखील स्वदेशी आहे. देशात तिसरी चाचणी ही सीरम इन्स्टिट्यूटच्या लशीची सुरू आहे. ही ऑक्सफर्डची प्रसिद्ध लस आहे. या कंपनीची ही लस आहे. मात्र या कंपनीची ही लस सीरम इन्स्टीट्यूट देखील तयार करत आहे. सीरम इन्स्टीट्यूट आणि देशासाठी ही गौरवाची बाब असल्याचे म्हटले जात आहे. सीरम इन्स्टीट्यूटची लस तयार करण्याची क्षमता चांगली असल्याचे मानले जाते. सीरम इन्स्टीट्यूटमध्ये एका महिन्यात ७.५ कोटी ते १० कोटी डोस बनवण्याची क्षमता आहे. ब्रिटन, अमेरकिका आणि ब्राझीलमध्ये या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. भारतात देखील या लशीची चाचणी सुरू होणार आहे. पुढील आठवड्यात दिल्ली, चेन्नई, पुणे अशा १७ ठिकाणी या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होत आहे. ही चाचणी भारतीय स्वयंसेवकांवर होईल. भारतात सुमारे १,६०० स्वयंसेवकांवर या लशीची चाचणी होईल. इतर देशांमध्ये स्वयंसेवकांची संख्या भारताच्या तुलनेत खूपच जास्त आहेत. अमेरिकेत ३० हजार स्वयंसेवक, तर ब्राझीलमध्ये ५ हजार स्वयंसेवकांवर लशीची चाचणी होत आहे. क्लिक करा आणि वाचा- या व्यतिरिक्त रशिया आपल्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतासह अन्य देशांमध्ये करणार असल्याचे रशियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
September 09, 2020 at 10:53AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा