N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

तेव्हा शिवसेनेनं 'हा' कार्यक्रम साजरा व्हायला हवा होता: भाजप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या फोटोला जोडे मारणाऱ्या शिवसेनेवर भाजपनं जोरदार हल्लाबोल केलाय. 'कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याकडून आलेल्या धमकीच्या अनुषंगानं भाजपनं हा टोला हाणला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ठाकरे सरकार व मुंबई पोलिसांवर आरोप करणाऱ्या कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर अचानक वातावरण तापलं. शिवसेनेनं ही संधी साधत कंगनाला घेरलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगना आपल्या राज्यात जाण्याचा सल्ला दिला. तर, आमदार प्रताप सरनाईक यांनी थोबाड फोडण्याची भाषा केली. कंगनानं शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर शिवसैनिक रस्त्यावर उतरले व कंगनाविरोधात 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आलं. वाचा: शिवसेनेच्या या आंदोलनाची भाजपचे आमदार यांनी अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे. 'मातोश्री बॉम्बने उडवून द्यायची धमकी मिळाल्यावर कमीत कमी दाऊदच्या फोटोला काळे फासून त्याला चपला मारण्याचा एखादा ब्रम्हांडव्यापी कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता,' असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीवरून मुख्यमंत्री यांनी काल विधानसभेत बोलताना त्यांना टोला हाणला होता. 'जी कामं करायची ती आम्ही दिवसाढवळ्या करतो. रात्रीच्या अंधारात नाही,' असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचाही भातखळकर यांनी समाचार घेतला आहे. 'पोस्टमॉर्टेम दिवसाढवळ्या करण्याचा कायदा असतानाही सुशांतसिंहचं शवविच्छेदन रात्रीच्या अंधारातच झालं,' असा दावा भातखळकर यांनी केला आहे. वाचा:

https://ift.tt/3fau8np
September 09, 2020 at 11:21AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा