N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

लॉकडाऊनमध्ये आर्थिक तंगी; एकाच कुटुंबातील ५ जणांची आत्महत्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
अहमदाबाद: करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अनेक खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. त्याचवेळी गुजरातच्या दाहोदमध्ये शुक्रवारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष पिऊन केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृताच्या वडिलांनी सांगितले की, मेहुणीकडून सोने घेतल्यानंतर त्यांचा मुलगा सौफी दुधियावाला हा आर्थिक दबावात होता. त्यांनी आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या केली असावी, असे दाहोदचे पोलीस अधीक्षक हितेश जईसर यांनी सांगितले. दाहोदच्या सुजाई बाग परिसरात सौफी दुधियावाला (वय ४२), त्याची पत्नी मेजबिल दुधियावाला (वय ३५), मुलगी अरवा (वय १६) आणि दोन मुले जैनब (वय १४) आणि हुसैन (वय ७) हे राहत होते. गुरुवारी रात्री या सर्वांनी विष पिऊन आत्महत्या केली. कुटुंबात फक्त आता सौफी यांचे वडील शब्बीरभाई दुधियावालाच आहेत. त्यांनी पोलिसांना सांगितले की, सकाळी त्यांचा मुलगा आणि कुटुंबातील सर्व सदस्य बेशुद्धावस्थेत पडले आहेत. त्यांनी तात्काळ ही माहिती शेजाऱ्यांना दिली. कुटुंब आर्थिक तंगीचा सामना करत होता. त्यामुळे त्याने कर्ज घेतले होते. कर्जाचे ओझे वाढल्याने सौफी हा चिंतेत होता, असेही वडिलांनी सांगितले. दाहोदचे पोलीस अधीक्षक हितेश यांनी सांगितले की, एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केली आहे. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपास सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करणार आहे. मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. आणखी बातम्या वाचा:

https://ift.tt/3fcy07h
September 05, 2020 at 12:44PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा