पेटलेल्या 'न्यू डायमंड' जहाजातून २२ जणांना वाचविण्यात यश
N4U
२:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली : श्रीलंकेच्या पूर्व समुद्र किनाऱ्याजवळ एका तेल टँकरला गुरुवारी आग लागल्यानंतर सुरू झालेलं रेस्क्यू ऑपरेशन अद्याप सुरू आहे. या जहाजातून २२ जणांना सुखरुप वाचविण्यात यश आलंय तर चालक दलातील एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. आणि नौदलाची एका टीमनं या जहाजाला जाड दोरखंडानं बांधून श्रीलंकेच्या तटापासून ७० किलोमीटर दूरवर पाण्यात खेचून नेलंय. श्रीलंकेच्या क्रूड कॅरिअर '' या जहाजात २,७०,००० टन तेल भरलेलं होतं. गुरुवारी अचानक जहाजातील तेलानं भरलेल्या टँकरनं पेट घेतला. जहाज समुद्राच्या मध्यभागी असताना ही घटना घडली. श्रीलंकेच्या समुद्र तटापासून दूर पूर्वेला ३२ मैल अंतरावर आग लागली. वाचा : वाचा : या ऑपरेशनसाठी इंडियन कोस्ट गार्डनं आपली तीन जहाजं, एक डोर्नियर विमान तैनात केलेत. न्यू डायमंड कुवैतहून भारतात येत कुवैतहून भारतात येत असताना हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, तेल टँकर न्यू डायमंडच्या मध्यात दोन मीटर लांब भेग पडलीय. कोस्टगार्ड अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जहाजातून प्रवास करणाऱ्या २२ जणांना वाचवण्यात यश आलंय. परंतु, चालक दलाचा एक सदस्य अद्यापही बेपत्ता आहे. आग पसरण्याचा धोका आता थांबलाय. आग एका भागापर्यंत सीमित करण्यात यश आलंय. लवकरच आगीवर नियंत्रण मिळवण्यात येईल. याशिवाय ऑन सीन कमांडर 'आयएनएस सह्याद्री' तेल टँकरला एस्कॉर्ट करत आहे. वाचा : वाचा :
https://ift.tt/3fcy07h
September 05, 2020 at 01:04PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा