मॉब लिंचिंग; चोर समजून जमावाने मरेपर्यंत मारले, तरुणाचा रुग्णालयात मृत्यू
N4U
२:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
बरेली: उत्तर प्रदेशच्या जिल्ह्यात मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. एका गावात चोरीच्या संशयावरून ३२ वर्षीय तरुणाला जमावाने झाडाला बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. बासिद खान असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याला दारूचे व्यसन होते. मात्र, तो चोर नव्हता असे सांगितले जाते. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा शुक्रवारी संध्याकाळी बरेलीच्या एका रुग्णालयात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बासिद हा दारूच्या नशेत होता. तेथील एका सुरक्षा रक्षकाने त्याला चोर समजून पकडले. त्यानंतर आरडाओरड केली. ते ऐकून तिथे लोक जमले. त्यांनी बासिदला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एका झाडाला बांधले. झाडाला बांधल्यानंतरही जमावाने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. जमावाने बासिदला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरोधात कुणीही तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिले. जखमी झालेल्या बासिदला कुटुंबीयांनी एका रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. भीतीपोटी मृताच्या भावाने स्वतःला खोलीत कोंडून घेतले या घटनेनंतर बासिदचे कुटुंबीय घाबरले आहेत. बासिदला मारहाण होत असल्याचे समजल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी लहान मुलाला पाठवले. मात्र, तो इतका घाबरला होता की, स्वतःला खोलीत कोंडून ठेवले होते. जमावाने मारहाण केल्यानंतर पोलिसांनी मुलाला घरी रिक्षात पाठवले. तो जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात नेले असता, तेथे त्याचा मृत्यू झाला, असे त्याच्या आईने सांगितले. आणखी बातम्या वाचा:
https://ift.tt/3fcy07h
September 05, 2020 at 11:33AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा