करोनावर कशी बनणार लस?; हा विषाणू सतत बदलतोय स्वरूप
N4U
९:१६ AM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली: भारतात करोनाचा () संसर्ग अतिशय तीव्र गतीने वाढत आहे. अशा परिस्थितीत करोनावर (Corona vaccine latest update)कधी येईल, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. लस आल्याशिवाय लोकांचे जीवन रुळावर येणार नाही हे स्पष्ट आहे. मात्र, तज्ज्ञांनी अभ्यासात करोना विषाणूचे सतत बदलते स्वरुप ( ) पाहिलेले आहे. हा अतिशय चिंतेचा विषय बनला आहे. जर सतत आपले स्वरुप बदलत राहिला, तर लशीच्या ( ) काम करण्यावर त्याचा परिणाम होईल आणि संभवत: लस निघाली तरी ती या विषाणूचा संसर्ग रोखू शकणार नाही. (sars cov 2 virus which causes covid 19 has undergone multiple mutations) अनेकदा विषाणू्च्या प्रोटीनमध्ये बदल SARS-CoV-2 हा विषाणू मुळे तयार होतो असे एका मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनावरील लेखातून स्पष्ट झाले आहे. या विषाणूच्या 'स्पाइक प्रोटीन'मध्ये अनेक बदल झालेले आहेत. या प्रोटीनमुळेच या विषाणूला मानवी कोशिकांमध्ये घुसखोरी करण्याची क्षमता मिळते. या विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर संसर्ग पसरवणे सुरू करतो. त्यानंतर अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात. संशोधनात झाला खुलासा जर्नल ऑफ लॅबोरेटरी फिजिशियनच्या एका आहवालातील माहिती १,३२५ जीनेम, १,६०४ स्पाइक प्रोटीन आणि २७९ आंशिक स्पाइक प्रोटीनच्या विश्लेषणावर आधारित होती. हे चाचणीचे नमुने १ मेपर्यंत अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनमध्ये (NCBI) ठेवण्यात आले. आणि तेथेच त्यावर संशोधन करण्यात आले. या स्पाइक प्रोटीनमध्ये (SARS-COV-2) १२ म्यूटेशन सापडल्याची माहिती या संशोधनाचे प्रमुख डॉ. सरमन सिंह यांनी म्हटले आहे. यात ६ नॉव्हेल म्यूटेशन होते. Indian strain (MT012098.1) विषाणूच्या संक्रमणात देखील अनुवंशिक बदल आढळले. वाचा- हा विषाणू स्वत:ला बदलू शकतो अमेरिकेत SARS-CoV-2 च्या जीनोममधून मिळालेल्या प्राइक प्रोटीनमध्ये अधिकांश अनुवंशिक बदल पाहायला मिळाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. हा विषाणू वेगेगळ्या प्रकारच्या वातावरणात संपर्कात आल्यानंतर आपल्या अनुवंशिक संरचनेत बदल घडवतो असे स्पष्ट झाले असल्याचे सिंह म्हणाले. तसेच हा बदल देखील अतिशय तीव्र गतीने होत आहे. मात्र यामुळे या संसर्गाच्या प्रसारावर किती परिणाम होतो हे सांगता येत नसल्याचे सिंह म्हणाले. वाचा- वाचा-
https://ift.tt/3fcy07h
September 02, 2020 at 08:58AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा