N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

चीनचा तिळपापड; भारतावर LAC उल्लंघनाचा केला उलटा आरोप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील (Ladakh) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न असफल झाल्यानंतर चीन अस्वस्थ झाला आहे. अंगाचा तिळपापड झाल्याने आता चीनने (China) भारतावर कराराचे उल्लंघन करण्याचा उलटा आरोप (china's counter accusation) केला आहे. भारतीय सैनिकांनी ३१ ऑगस्टला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर () अतिक्रमण केले आहे असा आरोप भारतातील चीनच्या दूतावासाने चीनी परराष्ट्र मंत्रालयाचा राग आलापत केला आहे. ( against india) पूर्व लडाखमध्ये त्सो सरोवराजवळ झालेल्या सैनिकी हालचालींबाबतच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना चीनी दूतावासाचे प्रवक्ता जी रॉन्ग यांनी हे वक्तव्य केले आहे. ३१ ऑगस्टला भारतीय सैन्यदलांनी चीन आणि भारतादरम्यान बहुस्तरीय चर्चेदरम्यान झालेल्या सहमतीचे उल्लंघन करत पेंगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणी भागात आणि रेकिन पासजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अतिक्रमण केले, असे जी रॉन्ग यांनी म्हटले आहे. रेकिन दर्रा हा चीन-भारत सीमेचा पश्चिमेकडील भाग आहे. चीनी दूतावासाचे प्रवक्ता पुढे म्हणाला की,'भारतीय सैनिकांनी अतिक्रमण केल्यानंतर डिवचण्याची कारवाई केली. त्यामुळे सीमाभागात पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.' भारताने चीनच्या क्षेत्रीय सार्वभौमत्वाला आव्हान दिले असल्याचेही ते म्हणाले. भारताने उचललेल्या या पावलामुळे चीनच्या सार्वभौमत्वाचे मोठे उल्लंघन झाले आहे. यामुळे दोन्ही देशांदरम्यान झालेल्या संबंधित सहमतीची, प्रोटोकॉल्स आणि महत्वाच्या सहमतींचे गंभीर उल्लंधन केले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. इतकेच नाही, तर सीमेजवळील शांतता आणि स्थिर वातावरण बिघडवून टाकल्याचा गंभीर आरोपही त्यांनी भारतावर केला आहे. वाचा- भारताने उचललेल्या या पावलांमुळे भारत आणि चीनच्या सीमाभागातील शांती आणि स्थिरतेला नुकसान झाले आहे. भारताने केलेली ही कारवाई दोन्ही देशांदरम्यान परिस्थिती सामान्य होण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या विपरीत आहे आणि चीन याचा जोरदार विरोध करत आहे, असेही चीनी दूतावासाचे प्रवक्ता जी रॉन्ग यांनी म्हटले आहे. वाचा- वाचा-

https://ift.tt/3fcy07h
September 01, 2020 at 01:10PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा