N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

'एन्काऊन्टरमध्ये मारलं नाही त्याबद्दल धन्यवाद', सुटकेनंतर डॉ. कफील खान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मथुरा : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टर यांची मथुरा तुरुंगातून सुटका करण्यात आली. उच्च न्यायालयानं तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिल्यानंतर कफील खान यांच्या सुटकेचं नाट्यही रात्री उशिरापर्यंत रंगलं. १ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती गोविंद माथुर यांच्या खंडपीठानं कफील यांच्यावर सरकारकडून लावण्यात आलेला रद्द करण्याचे आदेश दिले. सुटकेनंतर डॉ. कफील खान यांनी न्यायपालिकेचे आभार मानतानाच योगी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरही सुटकेचं नाट्य 'कफील खान यांचं भाषण कोणत्याही अर्थानं द्वेषपूर्ण किंवा दंगल घडवून आणणारं नव्हतं. कफील खान यांच्या भाषणामुळे अलीगढमध्ये शांती व्यवस्थेला कोणताही धोका नाही' असं म्हणत डॉ. खान यांच्यावरील रासुका रद्द करण्याचे तसेच त्यांच्या तत्काळ सुटकेचे आदेश सकाळीच न्यायालयाकडून दिले गेले होते. आदेशानंतर खान यांचे नातेवाईक त्यांच्या सुटकेसाठी मथुरा तुरुंगात दाखल झाले. परंतु, अधिकाऱ्यांनी आदेश न मिळाल्याचं सांगत खान यांना सोडण्यास नकार दिला. सायंकाळपर्यंत अलीगढ जिल्हा प्रशासनाकडून सुटकेसंबंधी कोणतेही आदेश मथुरा तुरुंगात पाठवले गेले नव्हते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत डॉ. कफील खान यांची सुटका होत नव्हती. मध्य रात्री मथुरा तुरुंगात पोहचलेल्या सुटकेच्या आदेशानंतर डॉ. कफील खान यांची सुटका करण्यात आली. संबंधित बातम्या : वाचा : वाचा : 'मी न्यायपालिकेचा आभारी आहे की त्यांनी इतके चांगले आदेश दिले. मी १३८ कोटी देशवासियांचे आभार मानतो ज्यांनी संघर्षात मला साथ दिली' असं म्हणत सुटकेनंतर डॉ. कफील खान यांनी न्यायपालिकेचे आणि जनतेचे आभार मानले. 'उत्तर प्रदेश सरकारकडून माझ्यावर खोटा आरोप केले होते. कोणत्याही कारणाशिवाय खटला भरून आठ महिने मला तुरुंगात डांबलं गेलं. तुरुंगातही मला पाच दिवसांपर्यंत जेवण - पाण्याशिवाय माझा छळ करण्यात आला' असं म्हणताना त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सोबतच, 'मी उत्तर प्रदेश एसटीएफ (Special Task Force) चे आभार मानतो की त्यांनी मुंबईहून मथुरा आणताना एन्काऊन्टरमध्ये मला मारलं नाही' असंही त्यांनी म्हटलंय. सात वर्षांपूर्वी म्हणजेच, २०१३ साली अलीगड मुस्लीम विद्यापीठात चिथावणीखोर भाषण देण्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सनं डॉ. कफील खान यांना जानेवारी महिन्यात मुंबईतून अटक केली होती. तेव्हापासून ते मथुरा तुरुंगात बंद होते. इतर बातम्या : वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
September 02, 2020 at 09:51AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा