नवरात्रोत्सव येतोय; भाजपची ठाकरे सरकारकडे अत्यंत महत्त्वाची मागणी
N4U
१२:०५ PM
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात उत्सवाची नियमावली, चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय व अन्य मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजपनं आता सरकारला नवरात्रोत्सवाची आठवण करून दिली आहे. भाजपचे आमदार अॅड. यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्रच लिहून एक महत्त्वाची मागणी केली आहे. शेलार यांनी पत्राद्वारे मूर्तीकारांना दिलासा देण्याची मागणी सरकारकडं केली आहे. 'गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. मूर्तीकार देवीची मूर्ती घडविण्यास सुरुवात करत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तीची उंची किती असणार? नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार? गणेशोत्सवाचे नियम या उत्सवालाही लागू असतील की त्यात बदल होणार? याबाबत मूर्तीकारांना वेळीच माहिती मिळण्याची आवश्यकता आहे,' असं शेलार यांनी म्हटलं आहे. वाचा: 'करोनामुळं आधीच मूर्तीकारांना मोठा फटका बसला आहे. मूर्तींच्या उंचीबाबत स्पष्टता होण्यास उशीर झाल्यानं चार फूटांपेक्षा उंच असलेल्या अनेक मूर्ती कारखान्यात शिल्लक आहेत. मोठ्या संख्येने मूर्तीकार व कारखाने असलेल्या पेणमधील दोहे, हरामपूर, केळवे या गावांचे आर्थिक नुकसान २० ते २५ कोटींचे आहे. तेच मूर्तीकार आता देवीच्या मूर्ती घडविणार असल्यानं वेळीच सरकारनं स्पष्टता आणणं गरजेचं आहे. मुंबई शहरात देवीच्या मूर्ती घडवणारे ५ हजार मूर्तीकार व कारखाने आहेत. मूर्तीच्या उंचीच्या बाबतीत त्यांच्या मनात संभ्रम आहे. मूर्तीकार ही एक छोटी इंडस्ट्री असून हजारो कामगार, कारागिरांचा उदरनिर्वाह त्या उद्योगावर अवलंबून आहे. इतर उद्योगांप्रमाणे या उद्योगालाही करोनाची झळ बसली आहे. त्यांचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून उत्सवाच्या नियमावली सरकारनं वेळीच जाहीर करावी. त्यासाठी सर्व संबंधितांची तातडीची बैठक घ्यावी,' अशी मागणी शेलार यांनी पत्रातून केली आहे. वाचा:
https://ift.tt/3fau8np
September 03, 2020 at 11:25AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा