डान्सरला बर्थडे पार्टीसाठी बोलावलं, हॉटेलमध्ये केला बलात्कार
N4U
१२:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
मुरादाबाद: उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये दिल्लीतील एका महिला डान्सरवर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिला दिल्लीहून एका बर्थडे पार्टीत नृत्य सादर करण्यासाठी बोलावण्यात आले होते. बर्थडे पार्टीचे आयोजन एका हॉटेलात करण्यात आले होते. त्याच हॉटेलमध्ये तिच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पीडित महिला ही दिल्लीतील वसंत कुंजमध्ये राहते. ३० ऑगस्टला बुध बाजारातील एका हॉटेलमध्ये तिला नृत्य सादर करण्यासाठी बोलावण्यात आले होते. तिथे एका बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्याच हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. नृत्य सादरीकरणानंतर काही जणांनी बलात्कार केला. कुणाकडे याबाबत वाच्यता केली तर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे पीडितेने सांगितले. मुरादाबादचे एसएचओ रवी कुमार यांनी सांगितले की, पीडित महिला २७ वर्षांची आहे. तिने केलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचा मालक आणि केअर टेकर घटना घडली त्यावेळी तिथे होते, मात्र त्यांनी मदत केली नाही, असा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दीपक आणि मनोज या दोघांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी असलम फरार आहे. पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत. पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.
https://ift.tt/3fcy07h
September 03, 2020 at 11:07AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा